ग्रहस्थिती : रवि, शुक्र मेषेत, हर्षल वृषभेत, गुरु मिथुनेत, मंगळ, बुध, शनि, नेपच्युन मीनेत, केतु सिंहेत, प्लूटो मकरेत, राहु कुंभेत. दिनविशेष : २७ एप्रिल मोहिनी एकादशी, २९ एप्रिल प्रदोष, ३० एप्रिल श्री नृसिंह जयंती, १ मे बुद्धपौर्णिमा आणि महाराष्ट्र दिन.

मेष : उधार उसनवारी टाळा. नोकरी-व्यवसायात द्विधा मन:स्थिती होईल. तरुणांना जास्त कष्ट पडतील. घरात ज्येष्ठांशी वाद होतील. विवाहेच्छुंना चांगला काळ. नोकरीचे प्रयत्न यशस्वी होतील. आठवडा संपताना चिंता निर्माण होईल. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. प्रवासात काळजी घ्या. जुने आजार डोके वर काढतील. कामाच्या ठिकाणी मोजकेच बोला. राग आवरा. घरातील वातावरण आनंदी राहील. संततीकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांबरोबरचे जुने वाद संपतील. मुलांना यश मिळेल. भागीदारीत बदल स्वीकारा. आर्थिक व्यवहारात, गुंतवणुकीत काळजी घ्या.

वृषभ : नोकरीत चिंतेची स्थिती राहील. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. व्यवसायात निर्णय चुकतील. तरुणांची शैक्षणिक प्रगती होईल. स्पर्धेत यश मिळेल. कलाकारांना यश व मानसन्मान मिळेल. वाहन चालवताना जपून. हातातली कामे पूर्ण करा. कोण काय म्हणते याकडे लक्ष देऊ नका, मनस्वास्थ्य खराब होईल. कामासाठी प्रवास कराल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. लहान कारणामुळे नाराज होऊ नका. घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल. व्यवसायवृद्धीसाठी नव्या कल्पना सुचतील.

मिथुन : निर्णयात घाई, व्यवसायात जुगार आणि मोठे आर्थिक व्यवहार टाळा. बुद्धिजीवींना अपेक्षित यश मिळेल. प्रिय व्यक्तींकडून सुवार्ता कळेल. भागीदारीत वाद होतील. प्रवासात भांडणे टाळा. नोकरीत मागे पडलेली कामे पुढे सरकतील. आर्थिक बाजू मनासारखी राहणार नाही. विदेशात व्यवसायविस्ताराची चर्चा पुढे सरकेल. महत्वाच्या निर्णयात घाई टाळा. अतिफायद्याच्या प्रलोभनांपासून दोन हात दूर राहा. सरकारी काम पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्या. घरात किरकोळ वाद होतील.

कर्क : महिलांना, तरुणांना यश मिळेल. कलेतून नवा व्यवसाय सुचेल. कोर्ट-कचेरीचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरीत आनंदाची बातमी कळेल. आठवड्याअखेर खर्च वाढेल. शिक्षणक्षेत्रात उत्साह वाढेल.घरात आनंदसोहळा होईल. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी भेटतील. नव्या गुंतवणुकीतून चांगले फायदे मिळतील. अचानक खर्च पडतील. कलाकार, खेळाडू, संगीतकारांसाठी चांगला काळ. पत्नीशी बोलताना काळजी घ्या. मनाची अस्वस्थता वाढवणारा प्रसंग घडेल. ध्येयपूर्तीसाठी जास्त मेहनत घ्या.

सिंह : अपेक्षित कामे होणार नाहीत. वेळ व कामाचे गणित सांभाळा. आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. तरुणांना उत्तम नोकरीची संधी मिळेल. महिलांना आरोग्याचे प्रश्न सतावतील. घरातला निर्णय ज्येष्ठांच्या सल्ल्यानेच घ्या. जुना आजार डोके वर काढेल. आर्थिक नियोजन करा. सामाजिक कार्यातून समाधान मिळेल. मन प्रसन्न ठेवा. मित्रांना आर्थिक मदत करताना काळजी घ्या. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. प्रवासाचे नियोजन फिसकटेल. नोकरीत जास्त कष्ट करा.

कन्या : नोकरीत मनासारखी स्थिती राहील. जुनी गुंतवणूक चांगला लाभ मिळवून देईल. सार्वजनिक ठिकाणी वादात पडू नका. पती-पत्नीशी वाद होतील. व्यवसायात कामाचे गणित चुकेल. घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल. नव्या योजनांना यश मिळेल. तरुणांची बेचैनी वाढेल. जनसंपर्क क्षेत्रात नव्या संधी चालून येतील. नवीन मित्रांमुळे कामाच्या नव्या संधी मिळतील. व्यवसायात नव्या योजना यशस्वी होतील. भागीदारीचे व्यवहार नकोत. जुने प्रश्न मार्गी लागतील. सरकारी कामात सबुरीने घ्या.

तूळ : तरुणांचे भाग्य उजळेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. कलाकारांना चांगले यश मिळेल. कुणाला सल्ले देऊ नका. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. मुलांची प्रगती होईल. व्यवसायात मनासारखे यश मिळेल. सरकारी कामे पुढे जातील. हातातली कामे जोमाने पूर्ण करा. मालमत्तेचे प्रश्न सामोपचाराने सोडवा. निर्णयात घाई नको. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. कर्तृत्वामुळे लौकिकात भर पडेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. कामाचे दडपण घेऊ नका. मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होतील. दाम्पत्यजीवनात कुरबुरी होतील. प्रवासात काळजी घ्या.

वृश्चिक : मानसिक संतुलन उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात लाभ होतील. शेजार्यांना मदत करावी लागेल. आर्थिक नियोजन उत्तम ठेवा. अचानक खर्च वाढू शकतो. वाहनदुरुस्तीचा खर्च करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील, खिसा भरलेला राहील. मनासारखे पर्यटन होईल. खेळाडूंना, तरुणांना यश मिळेल. मुलांकडे लक्ष द्या. मधुमेही, हृदयविकारग्रस्तांना आरोग्याचे प्रश्न सतावतील. शिक्षणक्षेत्रात गौरव होईल. व्यवहार चोख ठेवा. मित्रांची मदत मिळेल.

धनु : तरुणांची स्वप्ने पूर्ण होतील. विदेशात काम मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत भाग्योदय होईल. घरासाठी वेळ खर्च होईल. पत्नीची मदत मिळेल. नव्या ओळखींमधून काम पुढे सरकेल. गुरुकृपा राहील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. व्यवसायात वाढ होईल. विस्तार योजना मार्गी लागतील. मालमत्तेच्या व्यवहारात काळजी घ्या. बँकेची कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. नोकरीत सुस्थिती राहील. प्रमोशन होईल. नव्या संकल्पनांचे व्यवसायात रूपांतर होईल. उधारी टाळा. आरोग्य सांभाळा.

मकर : हेकटपणातून घरात वादविवाद टाळा. कलाकारांना नव्या संधी मिळतील. व्यवसायात यश मिळेल. गैरसमज निर्माण होतील अशी विधाने टाळा. घरात महत्वाच्या विषयावर बोलताना खबरदारी घ्या. व्यवहारात काळजी घ्या. सरकारी कामे सुटतील. कामाच्या ठिकाणी अहंकार नको. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल. व्यवसायात ऑर्डर वाढेल, यश मिळेल. मालमत्तेचे व्यवहार करताना काळजी घ्या. तरुणांचा आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील. गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळतील.

कुंभ : मत व्यक्त करताना काळजी घ्या. तरुणांना, खेळाडूंना यश मिळेल.व्यवसायात तेजी राहील. सरकारी कामे पुढे सरकतील. गाठीभेटी उपयुक्त ठरतील. कुणाशीही बोलताना गैरसमज टाळा. आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. मौजमजेवर खर्च होतील. प्रेमप्रकरणात वाद वाढेल. पती-पत्नीत वाद होतील. घरात एखादी घटना मनाविरुद्ध झाली म्हणून नाराज होऊ नका. चांगला विचार करून पुढे चला. सामाजिक कार्यात मोठ्या व्यक्तीचा सहवास लाभेल. मित्रांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका.

मीन : नोकरी-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासात वस्तू गहाळ होतील. मुलांच्या बाबतीत जपून निर्णय घ्या. दूरच्या प्रवासाचे योग येतील. कुटुंबासोबत पर्यटनाला जाल. घरात खूप काम पडेल. नवीन गुंतवणूक करताना दक्षता घ्या. खेळाडूंना यश मिळवण्यासाठी वाढीव कष्ट करावे लागतील. अहंकार दूर ठेवा. सार्वजनिक ठिकाणी टिंगल टवाळी करू नका. घरात आनंदाचे वातावरण राहील. अचानक तीर्थयात्रा घडेल. नोकरीत वाढीव काम करावे लागेल. मित्र, नातेवाईकांशी जपून बोला.

