मुल्ला नसरुद्दीन त्याच्या कुटुंबासह गडावर पिकनिकला गेला होता.
त्याची बायको भण्ण् वाऱ्यात एका कड्याच्या धोकादायक टोकावर उभी होती… जरा तोल गेला असता, तर दरीत भिरकावली गेली असती…
मुल्ला मुलांना घेऊन मागे सुरक्षित अंतरावर बसला होता. त्याने फजलूला आईकडे पाठवलं.
फजलू आईकडे जाऊन म्हणाला, अब्बाजान म्हणतायत की तू दोन पावलं मागे उभी राहणार नसशीलच, तर हातातली चणे-फुटाण्याची पुडी तरी आमच्याकडे दे!
……..