काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले आहे. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
@ahmedpatel pic.twitter.com/7bboZbQ2A6
— Faisal Patel (@mfaisalpatel) November 24, 2020
आज पहाटे साडे तीनच्या सुमारास पटेल यांची प्राणज्योत मालवली. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली. आज पहाटे मल्टिपल ऑर्गन फेल्युरमुळे त्यांचा मृत्यू झाला.
सौजन्य : दैनिक सामना