• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सुवर्णपात्रातील मासा

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 24, 2020
in इतर
0
सुवर्णपात्रातील मासा

एका राजाने एका सूफी फकिराला एक सुवर्णपात्र भेट दिलं. त्या सुवर्णपात्रात एक मूल्यवान शोभेचा मासा पोहत होता.

फकिराला तो मासा पाहून दया आली. पात्र सुवर्णाचं असलं म्हणून काय झालं. त्यातही मासा बंदिवानच होता. तलावाची, नदीची, समुद्राची मुक्तता त्या पात्रात नव्हती.

फकिराने माशाला स्वतंत्र करण्याचा निर्धार केला. तो ते पात्र घेऊन तलावाकाठी गेला. त्या माशाला तलावात सोडून दिलं. मग त्याने त्या
पात्राकडे पाहिलं. सोन्याचं पात्र आता माशाचा तुरुंग उरलं नसलं तरी त्याच्या मूल्यामुळे आपल्यासाठी आसक्तीचा तुरुंग बनेल, हे ओळखून त्याने ते पात्रही त्या तलावात भिरकावून दिलं.

दुसऱ्या दिवशी आपण स्वतंत्र केलेला चमचमता मासा त्या स्वातंत्र्याचा  कसा उपभोग घेतो आहे, हे पाहायला फकीर तलावाकाठी गेला… मासा तलावात फेकलेल्या त्या सुवर्णपात्रात पुन्हा जाऊन बसला होता… …त्यातच मुक्त विहरत होता.

Previous Post

फरीद आणि कबीराची मौन वार्ता

Next Post

मुल्ला नसरुद्दीनची पिकनिक

Next Post
मुल्ला नसरुद्दीनची पिकनिक

मुल्ला नसरुद्दीनची पिकनिक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.