• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

शुद्ध पाक पोहोचवणारी जिलबी

- वैभव भाल्डे (सुग्रास)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 19, 2024
in खानपान
0

कोरोनाकाळात टाळेबंदीमुळे सर्वांनाच वेळ मिळाला होता. अशातच एका मित्राने काही जुन्या जाहिरातींच्या यूट्यूबच्या लिंक्स पाठवल्या. त्या जाहिरातीच लहानपणी मुख्य कार्यक्रमापेक्षाही जास्त आवडायच्या!! त्यातलीच एक, धारा तेलाची. लहानसं निरागस लेकरू घरी सगळे रागवतात म्हणून रूसतं व जमेल तसं दप्तर सांभाळत रेल्वे स्टेशनवर जातं. कावरीबावरी नजर एक जागा शोधते व बाकड्यावर बसतो तो गोंडस मुलगा. त्याला ओळखणारे एक आजोबा येऊन विचारतात की कारे, एकटाच कुठे आणि का निघालास? सगळे रागावतात म्हणे मला मी चाल्लोय दुसरीकडे. मग ते आजोबा त्याला सांगतात की पण घरी तर आज जिलबी बनतेय!! जिलबीचं नाव घेताचं चेहेर्‍यावर असं काही हसू खुलतं आणि डोळ्यात अशी काही चमक येते की बघत राहावं!! पठ्ठा त्या जिलबीच्या मोहापायी तयार होतो आणि आजोबांबरोबर सायकलवर बसून घरी येतो. घरी गरमागरम जिलबी तयार असते. ते बघून हा मुलगा रूसवा विसरतो आणि सगळाच आनंदीआनंद पसरतो!! धाराच्या तेलाबरोबरच लक्षात राहतो तो लहान निरागस मुलगा आणि अर्थात जिलबी!!
भारतात सर्वत्र व इतर आशियाई देशांतही पूर्वापार बनणारा हा बहुदा सर्वांचाच आवडता गोड पदार्थ. रस्त्याच्या कडेला जशी एखाद्या गाडीवर जिलबी खाण्यासाठी गर्दी होते तशीच पंचतारांकीत ठिकाणीही जिलबीच्या स्टॉलवर गर्दी होतेच. त्या त्या ठिकाणचे काही ना काही वैशिष्ट्य असले तरी प्रत्येक गावचा एकेक नावाजलेला जिलबीवाला असतोच. मला आठवतंय, अलिबागला वर्मांकडची जिलबी फार छान मिळायची आमच्या लहानपणी. सांगितलं की खास तुपातली द्यायचे ते काढून, आता पुरोहित आहेतच!! पुण्यात चितळे व काका हलवाईंची, नागपूरला हल्दीरामची, नाशिकच्या बुधा हलवायाची तसंच धुळ्याच्या छत्रभुज नानजीकडची पण फार छान असते नाही का मंडळी जिलबी! अर्थात बाकी ठिकाणीही असणारच कोणी तरी विशेष हलवाई. सध्या अशी दुकानं बंद असली तरी फार कठीण नाहीये बरं जिलबी खाणं, अर्थातच बनवणं हो!!
घरी बनवलेली जिलबी म्हटलं की आमच्या शेठकाकूंची आठवण अनिवार्य!! बिनरक्ताच्या नात्यांमधले हे एक हक्काचे कुटुंब. जिलबी घरी बनवून गरमागरम खाऊ घालण्याचा काकूंचा उत्साह दांडगा, अर्थात सगळेच पदार्थ करायची व खाऊ घालायची आवड आणि आम्ही शेजारीच राहात असल्याने सगळ्यावर आमचे नाव तर असायचेच!! काकूंच्याच शब्दात सांगायचं तर, काही कठीण नसते हो जिलबी बनवणे. तयारी पाहिजे थोडी, आयत्यावेळी नाही व्हायची. अर्थात आजकाल इन्स्टंट जिलबी बनवतात लोकं पण आमची पारंपरिक पद्धत बरं.
एक वाटी मैद्याला प्रत्येकी एक चहाचा चमचा बारीक रवा, बेसन व दही घेऊन कोमट पाण्यात भज्याच्या पिठासारखं भिजवायचं नी कमीत कमी सातआठ तास आंबू द्यायचं. नंतर आवडीनुसार पिठात खाण्याचा रंग मिसळून पसरट कढईत तूप घालून त्यात जिलब्या तळायच्या आणि गरम जिलबी साखरेच्या एकतारी पाकात सोडायची. जिलबी पाकात मुरली की पाकातून बाहेर काढायची. पुढे काय ते घरातले बाकीचे करतातच, चट्टामट्टा हो त्या ताज्या कुरकुरीत व पाकाची गोड चव मिळालेल्या जिलबीचा!!
पाकात पडेपर्यंत मूळ जिलबीला स्वत:ची खास अशी काही चव नसते, कुरकुरीतपणा व पोकळपणा या दोन गोष्टी असतात आणि पाक शब्दशः आत शिरतो या जिलबीत. जिलबीचा तुकडा चोखून बघा, पाक जसाच्या तसा उतरतो जिभेवर!! याच गोष्टीमुळे जिलबी बाकी पाकातल्या पदार्थांपेक्षा वेगळी वाटते मला. स्वत:मध्ये पाक मुरवून ती गोडी पोहोचवणारे गुलाबजाम किंवा लाडवांसारखे प्रकार वेगळे. जिलबी मात्र तो शुद्ध पाक जसाच्या तसा सांभाळते व पोहोचवते खाणार्‍यापर्यंत!!
माणूसपणाच्या वाटचालीत आपल्याला ज्येष्ठांकडून लाभणारी अनेक तत्त्वं अशीच मूळ स्वरूपात पुढे देण्याने आपणही त्या शृंखलेचे वाटेकरी ठरतो. ज्ञान, सहिष्णुता, प्रेम जेही मला लाभलंय ते तसंच्या तसं जर प्रवाहित केलं ना, तर त्याची अव्याहत शक्ती मला तर मिळतेच, पण पुढे पोहोचवल्याचे पुण्यही पदरी पडते.
शिकागोच्या व्याख्यानाच्या वेळी किंवा इतरही अनेक वेळी स्वामी विवेकानंद सांगतात की ‘मी केवळ माध्यम होतो, बोलाविता धनी तर साक्षात ठाकूर म्हणजेच रामकृष्ण परमहंस होते. त्यांच्या विचारांना मी शब्दांत मांडले एवढेच काय ते माझे!!’ हीच परंपरा अनेक वर्ष रामकृष्ण भावधारेत सुरू आहे म्हणूनच हे साहित्य वाचताना किंवा ऐकताना त्यातले मूळ तत्व एकच असल्याची खूण पटते. कोणताही विषय किंवा कोणताही वक्ता म्हणूनच मूळ स्त्रोतातून मिळालेली ओंजळच आपल्याकडे रिती करतोय याचे समाधान असते. यथामती यथाशक्ती परंतु मूळ तत्वात फेरफार किंवा तडजोड न करता आपणही आपल्या सर्वांगीण समृद्ध परंपरेचा वारसा जपण्यात व तो पुढे पोहोचवण्यातच या मानवी जन्माचा व नरदेहाचा वापर केला तर हे आयुष्य उजळून निघेल नाही का? जिलबीसारखंच… उजळ केशरी रंगाचं व पाकाच्या गोडव्याने भरलेलं नी चकाकणारंही!!

Previous Post

हरहुन्नरी दामुअण्णा मालवणकर

Next Post

पोलिसांच्या नावाने बनवाबनवी

Related Posts

खानपान

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
खानपान

निर्मळ, पारदर्शक बदाम हलवा

April 25, 2025
खानपान

मांस आणि भाज्यांचा ‘स्ट्यू’

April 4, 2025
खानपान

पारंपारिक वन डिश मिल

April 4, 2025
Next Post

पोलिसांच्या नावाने बनवाबनवी

राशीभविष्य

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.