• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य

- भास्कर आचार्य (२६ ते १ सप्टेंबर २०२३)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 24, 2023
in भविष्यवाणी
0

ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, मंगळ, बुध सिंह राशीत, रवि, शुक्र कर्क राशीत, मंगळ बुध सिंहेत, प्लूटो मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्यून मीन राशीमध्ये.
विशेष दिवस : २७ ऑगस्ट पुत्रदा एकादशी, २८ ऑगस्ट सोमप्रदोष, ३० ऑगस्ट नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन.

मेष : साहित्य, कला क्षेत्रात सन्मानयोग. वास्तूचे अडकलेले प्रश्न मार्गी लागतील. तरुणांचा उत्कर्ष घडवणारा काळ. नोकरीत शांत मनाने काम करा. बोलताना संयम ठेवा. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळेल. जुने येणे वसूल होईल. खिशात पैसे राहतील. नियोजन करूनच त्याचा विनियोग करा. नवी गुंतवणूक काळजीपूर्वक करा. निर्णय घाईत घेऊ नका.

वृषभ : नोकरी, व्यवसायात चिंताजनक प्रकार घडल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. व्यसनी मंडळींपासून दूर राहा, पैसे सांभाळा. जुगार खेळण्याचा मोह टाळा. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात कामाची दखल घेतली जाईल, मानसन्मान मिळेल. काहींना अचानक धनलाभ होईल. बँकेची रखडलेली कामे मार्गी लागतील.

मिथुन : नोकरीत कामानिमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना चांगला लाभ मिळेल. नव्या व्यवसायाची संकल्पना डोक्यात येईल. पुढे जाताना काळजीपूर्वक पावले टाका. अडकलेले सरकारी काम मार्गी लागेल. सार्वजनिक जीवनात आचारसंहिता पाळा. नसत्या कटकटी मागे लावून घेऊ नका. तरुणांना नव्या नोकरीची संधी मिळेल. संसर्गजन्य आजारापासून जपा. खाण्यापिण्याचा अतिरेक नको.

कर्क : तरुणांना यश मिळेल. व्यावसायिकांना कामगार वर्गाकडून त्रास होईल. नोकरीत प्रयत्न वाढवा, वरिष्ठांवर चांगला प्रभाव पडेल. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. घरी पूजाअर्चा, छोटेखानी समारंभ होतील. वातावरण आनंदी राहील. पती-पत्नीत किरकोळ वाद घडतील. पर्यटनासाठी जाताना सावधगिरी बाळगा. नव्या गुंतवणुकीसाठी काळ उत्तम आहे. मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या. घाईत काम करणे टाळा.

सिंह : नोकरीत नवीन जबाबदारी येऊ शकते. कोर्ट-कचेरीतून त्रास होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्य खराब होईल. संततीकडून चांगली बातमी कानावर पडल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबासह पावसाळी पर्यटन होईल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. मनासारख्या घटना घडतील. काहींना धनलाभ मिळेल. एखादे थकीत येणे वसूल होईल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. मुलांकडून सुवार्ता कानावर पडेल. कोणाला तोंडी आश्वासन देणे टाळा. नंतर पस्तावाल.

कन्या : नोकरीतल्या धावपळीचा आरोग्यावर परिणाम होईल. जपून राहा. बढती, बदलीचे योग आहेत. काही घटनांमुळे मन विचलित होऊ शकते, पण ध्यानधारणा, योगामध्ये मन रमवा. खाताना उतावळेपणा अंगाशी येऊ शकतो. व्यावसायिकांनी मत मांडताना परखडपणाला आवर घालावा. अचानक खर्च निर्माण करणारे प्रसंग येतील. पण, गुरुकृपेमुळे त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. कुटुंबासाठी वेळ खर्च कराल.

तूळ : रोष ओढवून घेणारे वर्तन टाळा. सार्वजनिक जीवनात अरेरावी नको. पती-पत्नीत छोट्या कारणामुळे मिठाचा खडा पडून घरातील वातावरण बिघडू देऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर सही करताना काळजी घ्या, प्रलोभनाला बळी पडू नका. नवीन ओळखीचा भविष्यकाळात लाभ मिळू शकतो. नोकरीत अचानक नवीन संधी चालून येऊ शकते. व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळवून देणारा काळ आहे. मुलांकडे विशेष लक्ष द्या. शिक्षक, संशोधकांना शुभवार्ता कळेल. धार्मिक कार्याला वेळ द्याल.

वृश्चिक : प्रेम प्रकरणात वादाचे प्रसंग घडतील. मानसिक संतुलन बिघडेल. तरुणांचे अडलेले प्रश्न मार्गी लागतील. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. काहीजणांना कामाचा कंटाळा येईल. मौजमजेवर पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. काहीजणांना नोकरीत विदेशात जाण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी मोजकेच बोला. वरिष्ठांपुढे प्रतिक्रिया देणे टाळा. व्यावसायिकांना त्रासदायक प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. मन शांत ठेवा, ध्यानधारणा करा. त्रास होणार नाही.

धनु : हातातली संधी निसटून जाऊ शकते, थोडे सबुरीने घ्या. डोक्यावर बर्फ ठेवा, काम मार्गी लागेल. व्यवसायात काही कटकटीचे प्रसंग घडू शकतात. योग्य आर्थिक नियोजन करा. उधार उसनवारी टाळा. शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवा. नातेवाईकाना आर्थिक मदत करावी लागेल. मित्रमंडळींबरोबर चेष्टामस्करी नको, गैरसमजातून वितुष्ट निर्माण होऊ शकते. कुटुंबासोबत देवदर्शनाला जाल. दानधर्म कराल. प्रवासात खिसापाकीट सांभाळा. तेलकट खाणे नकोच.

मकर : व्यावसायिकांना नव्या संधी चालून येतील. फक्त घाईने निर्णय नको. शेअर, लॉटरामधून लाभ मिळाला तरी त्याच्या आहारी जाणे टाळा. नोकरदारांचा उत्कर्ष घडवून आणणारा काळ. काहींना बढती मिळेल. वरिष्ठ कामावर खूष होतील. रियल इस्टेट व्यवसायात लाभ मिळवून देणारा काळ. कलाकार, संगीतकार, खेळाडू यांच्यासाठीही चांगला काळ. कोणाला पैसे उधार देणे टाळा. सोशल मीडियावर सावध राहा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ : व्यावसायिकांचा उत्कर्ष होईल. विदेशात शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील. बोलताना काळजी घ्या. कोणाचे विचार पटले नाहीत तर त्यावर वाद घालू नका. घरातील ज्येष्ठांबरोबर संवाद करताना हो ला हो करून वाद टाळा. मुलांकडे लक्ष द्या. समाजसेवेत चांगला अनुभव आल्याने कामाचा हुरूप वाढेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.

मीन : नोकरदारांना चांगला अनुभव देणारा काळ. त्यामुळे ऊर्जा वाढेल, अधिकचे काम होईल, वरिष्ठ खूष होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. नवीन वाहन घेण्याच्या विचारांना गती मिळेल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. प्रेमप्रकरणात जपून. घरात कोणत्याही निर्णयात घाई करू नका. खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. व्यावसायिकाना प्रश्न कौशल्याने सोडवावे लागणार आहेत. महागडी वस्तू खरेदी कराल. मौजमजेवर पैसे खर्च होतील.

Previous Post

हनी ट्रॅप

Next Post

मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे

Next Post

मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.