• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नॉस्टॅल्जिया जागवणारा ‘गदर-२’

- संदेश कामेरकर (सिने परीक्षण)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 17, 2023
in मनोरंजन
0

१५ जून २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या गदर या सिनेमाने इतिहास घडवला होता. भारतात पाच कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा सिनेमा पाहिला. प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहायला लावणारा हा शोलेनंतरचा सिनेमा असावा. सर्वाधिक प्रेक्षकसंख्या कमावणार्‍या सिनेमांच्या यादीत तो तिसर्‍या क्रमांकावर आहेच. फिल्मी पद्धतीने का होईना, राष्ट्रवाद जागवणार्‍या या सिनेमात भावनांना हात घालणारा मसाला ‘हॅण्डपंपने’ कुटून कुटून भरला होता. पहिल्या सिनेमाची यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी आणि बावीस वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल, गदर टू रिलीज झाला आहे.
प्रेक्षकांच्या गतस्मृती जागवण्यासाठी जुन्या गदरमधील अनेक गोष्टी इथेही आल्या आहेत. सिनेमा सुरू होताना सुरुवातीच्या दोन मिनिटांत गदर १मध्ये काय घडलं होतं हे सांगितलं जातं आणि सिनेमाचा खलनायक पाकिस्तान सैन्यातील मेजर जनरल हमीद इकबाल (मनीष वाजवा) याची ओळख अभिनेते नाना पाटेकर यांच्या आवाजात करून दिली जाते. सिनेमाची कथा १९७१ सालातील आहे. कथा हिंदुस्तान-पाकिस्तानभोवतीच फिरते. तारासिंग (सनी देओल) हा ट्रक ड्रायव्हर असून तो त्याची पत्नी मॅडमजी (अमिषा पटेल) आणि मुलगा चरणजीत उर्फ जीते (उत्कर्ष शर्मा) यांच्यासोबत भारत-पाकिस्तान बॉर्डर जवळील गावात राहतोय. जीतला मुंबईत जाऊन सिनेमाचा हिरो बनायचा आहे, तर तारासिंगची इच्छा आहे की मुलाने आपल्यासारखं ट्रक ड्रायव्हर न होता, अभ्यास करून भारतीय सैन्यातील मोठा ऑफिसर व्हावा. एक दिवस पाकिस्तान सैन्याने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असा संदेश येतो.
बॉर्डरवर लढणार्‍या सैन्याला दारूगोळा पोहोचवण्याची जबाबदारी तारासिंग आणि त्याच्या सहकारी ट्रक ड्रायव्हरवर सोपवली जाते. या धुमश्चक्रीत भारतीय सैनिक आणि ट्रक ड्रायव्हर पाकिस्तानी सैन्याच्या हाताला लागतात. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून वडिलांना सोडवण्यासाठी जीते पाकिस्तानला जातो. या कामात पाकिस्तानी मुलगी मुस्कान (सिमरत कौर) जीतला मदत करते. वडिलांना सोडवण्याच्या प्रयत्नात जीतला अटक होते. इकडे तारासिंग घरी पोहचतो, तेव्हा त्याला जीते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहे हे कळतं आणि मग तो मागील वेळी बायकोला आणायला पाकिस्तानला गेला होता, तसाच यावेळी मुलाला परत आणायला पाकिस्तानला जातो. पुढे काय होतं, ते समजून घेण्यासाठी हा चित्रपटच पाहायला हवा.
कथेत फार नावीन्य नाही, या सिनेमाची नव्वदीच्या दशकातली मांडणी आहे. पाकिस्तानला बोल लावणे, जागा मिळेल तिथे त्यांना चार गोष्टी सुनावणं असे टाळ्याखेचक संवाद सिनेमात येत राहतात. सिनेमा १९७१च्या युद्धाच्या आधी घडतो. त्या युद्धाचे पडसाद सिनेमात दिसले असते तर कथेची खुमारी अजून वाढली असती. पण, मुलगा वडिलांना आणि वडील मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करतात, याभोवतीच ही कथा फिरत राहते.
सनी देओल हा या सिनेमाचा तारणहार आहे. सिनेमामधील त्याच्या एंट्रीला टाळ्या वाजवून स्वागत केलं जाईल. निव्वळ आपल्या वावराने सिनेमागृहातील प्रेक्षकांना संमोहित करू शकेल असे हिरो आज फार कमी उरले आहेत. त्यापैकीच एक सनी देओल आहे. भेदक नजर आणि तारस्वरातील संवादफेक हे सनीचे बलस्थान. या सिनेमातही सनी प्रेक्षकांना निराश करत नाही. शेकडो सैनिक आणि जमावाशी एकटा माणूस लढतोय, हे दृश्य खरं वाटावं इतक्या सफाईने सनी करतो. पहिल्या सिनेमात त्याने जमिनीतील हॅण्ड पंप उखडून दुष्मनांना चोप दिला होता. यावेळी घोडागाडी, महाकाय चक्र, विजेचे खांब, तारा… असं बरंच काही आहे. जोडीला, ‘जर आज पाकिस्तानी जनतेला भारतात परत येण्याची संधी मिळाली, तर अर्धा पाकिस्तान रिकामा होईल’ अशा प्रकारचे टाळीबाज डायलॉग देखील आहेत. पण हे सर्व पाहायला, एन्जॉय करायला जे प्रेक्षक येतात, त्यांना सनी पडद्यावर फार काळ दिसत नाही, हे या चित्रपटाचे दुर्दैव आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा याला हिरो म्हणून आणखी एक संधी देण्यासाठी गरजेपेक्षा जास्त फुटेज दिलं आहे. उत्कर्ष सौदागरमधील विवेक मुश्रानची आठवण करून देते. लव्ह सीनमध्ये तो चागलं काम करतो, पण अ‍ॅक्शन सीनमध्ये त्याने अनेक प्रसंगांत सनी देओलसारखा अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. ओरिजनल समोर असताना लोक डुप्लिकेट का पाहतील, हा प्रश्न दिग्दर्शकाला पडल्याचं इथे दिसत नाही. मनीष वाधवा प्रमुख खलनायक मेजर जनरलच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनात चीड निर्माण होईल, असा अभिनय करण्यात यशस्वी झाले आहेत. सिमरत कौर आपल्या सुंदर दिसण्याने सिनेमाची ग्लॅमरस बाजू प्रेक्षणीय करते. राकेश बेदी, मुश्ताक खान, अनिल जॉर्ज असे जुने जाणते अभिनेते अभिनयाची एक बाजू खंबीरपणे सांभाळतात. गदर १मधील, उड जा काले कावा आणि मैं निकला गड्डी लेकर ही लोकप्रिय गाणी गदर २मध्येही वाजतात, यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. बाकी नवीन गाणी ठीक ठाक आहेत.
सनी देओलच्या आयुष्यातील सर्वात यशस्वी चित्रपटाचा हा सिक्वल आहे. जुनी पिढी सनीच्या प्रेमापोटी या सिनेमाला गर्दी करेलच, पण नवीन पिढीने देखील नव्वदीच्या दशकातील मनोरंजन आणि सनीचा करिश्मा अनुभवण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.

Previous Post

परतफेड!

Next Post

आता बरं वाटेल…

Related Posts

मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
मनोरंजन

रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

April 18, 2025
वन अँड ओन्ली भारत कुमार
मनोरंजन

वन अँड ओन्ली भारत कुमार

April 11, 2025
Next Post

आता बरं वाटेल...

वारसदार

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.