• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मृत्यूशय्येवरची शपथ

- सचिन परब (प्रबोधन १००)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 6, 2023
in प्रबोधन १००
0

छत्रपती शाहू महाराजांच्या अखेरच्या रात्री प्रबोधनकारांनी त्यांच्या इच्छेनुसार छत्रपती प्रतापसिंहांचा इतिहास लिहिण्याची शपथ घेतली. ही घटना फक्त प्रबोधनकारांच्याच नाही तर महाराष्ट्राच्याही आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग होता.
– – –

सातार्‍यात शिवजयंतीनिमित्त छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांच्याविषयी तीन व्याख्यानं देऊन प्रबोधनकार मुंबईत परतले. त्यानंतर ५ मे १९२२च्या रात्री घडलेल्या प्रसंगाची महाराष्ट्राच्या इतिहासाला नोंद घ्यावी लागली आहे. रंगो बापूजी चरित्रग्रंथाच्या मनोगतात आणि माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी या घटनेची हकीकत वेगवेगळी सांगितली आहे. त्यातल्या तपशीलात थोडीफार तफावत दिसते. ती फार महत्त्वाची नाही. कारण या तफावतीनंतरही उलगडणारी कहाणी छत्रपती शाहू महाराजांच्या थोरवीने अचंबित करणारी आहे. ती अशी-
सातारहून परतल्यानंतर प्रबोधनकारांना दोन तीन दिवसांनी कळलं की शाहू महाराज बडोद्याहून मुंबईच्या पन्हाळा लॉजमध्ये आले आहेत आणि हृदयविकाराने अत्यंत अत्यवस्थ आहेत. कळताच प्रबोधनकार पन्हाळा लॉजवर गेले. तिथे त्यांना सगळी बडोद्याचीच मंडळी दिसली. कोल्हापूरचे नेहमीचे ओळखीचे लोक दिसेनात. महाराज आजारी आहेत, डॉक्टरांनी सगळ्या गाठीभेटी बंद केल्याचं सांगितलं. त्यामुळे हिरमुसले होऊन प्रबोधनकार घरी परतले.
५ तारखेच्या रात्री दिवेलागणीनंतर साधारण ८ वाजता एका कारमधून काही जण दादरच्या लेडी जमशेदजी रोडवर चौकशी करत फिरत होते, `इथे कुणी कोदंड राहतात का?’ भेटणारा प्रत्येकजण माहीत नाही, असं उत्तर द्यायचा. ते स्वाभाविकच होतं, कारण `कोदंडाचा टणत्कार’ लिहिणार्‍या प्रबोधनकारांना शाहू महाराज कोदंड म्हणत असतील, हे कुणाला माहीत असण्याचं कारणच नव्हतं. प्रबोधनकार लिहितात, `दादरला शाहू महाराजांचा संबंधी फक्त ठाकरे, हे सगळ्यांना माहीत होतं. पण शाहू महाराज मला कोदंड नावाने हाक मारीत, हे कोणालाच माहीत नव्हतं.’ तेवढ्यात तेव्हा कीर्तिकर चाळीत राहणारे प्रबोधनकारांचे एक मित्र भास्कर हरी ठाकूर गाडीवाल्यांना भेटले. आम्ही कोल्हापूरच्या महाराजांकडून आलो आहोत, असं सांगताच ठाकूर यांना कोदंड शब्दाचा अर्थ बरोबर लागला. ठाकूरांनी त्यांना `ठाकरे, मिरांडाची चाळ’ असा पत्ता सांगितला. त्यांनी खूण सांगितली, `मिरांडाच्या चाळीकडे जा आणि ज्या खोलीत भरपूर उजेडाची बत्ती दिसेल तेथे नेमके जा. म्हणजे तुम्हाला कोदंड भेटतील.’ महाराजांची माणसं शोधत आली. म्हणाली, छत्रपती महाराजांनी तुम्हाला लगोलग बोलावले आहे. प्रबोधनकार लगेचच त्यांच्या गाडीत बसून पन्हाळा लॉजवर पोचले.
तिथेही डॉक्टरांची परवानगी मिळेपर्यंत प्रबोधनकारांना रात्री १० वाजेपर्यंत वाट बघत बसावं लागलं. तिथल्या वातावरणाविषयी त्यांनी नोंदवलंय, `महाराजांची छावणी असताना जो पन्हाळा लॉज गडबडीने गजबजलेला असायचा, तोच आता मला निहूप शांत पाहून चमत्कारिक वाटले.’ एका हुजर्‍याने प्रबोधनकारांना पहिल्या मजल्यावर नेलं. तिथे एका दिवाणखाण्यात निळा मंद प्रकाश होता. तो प्रबोधनकारांना उदासीन वाटत होता. धिप्पाड देहाचे महाराज पलंगावर उताणे झोपलेले होते. एक हुजर्‍या कशाने तरी महाराजांची छाती शेकत होता. दोन तीन डॉक्टर पलंगाभोवती बसलेले होते.
प्रबोधनकार उजव्या बाजूने महाराजांच्या जवळ गेले. हात जोडून नमस्कार केला. शाहू महाराजांनी पुढे केलेल्या हाताच्या पंजावर त्यांनी मस्तक ठेवलं. `काय काय केलंस सातार्‍याला जाऊन?’ इतकं विचारताच डॉक्टर उठले आणि म्हणाले, `महाराज, बिलकुल बोलायचं नाही.’ त्यावर महाराज हसून म्हणाले, `छे छे, प्रश्न विचारला. आता सारे हाच बोलणार आणि मी फक्त ऐकणार.’ प्रबोधनकारांनी पाच दहा मिनिटं सातार्‍याची सगळी हकीकत सांगितली. महाराजांना आनंद झाला. ते म्हणाले, `छान. या विषयाला तोंड फुटलं. ठीक झालं. बरं, आता तू हा इतिहास केव्हा लिहिणार? मी उद्या कोल्हापूरला जातोय. तू चल माझ्याबरोबर आणि तिथं बसून लिही. तिथेच पुढचे बातबेत ठरवू.’ प्रबोधनकार त्यावर म्हणाले, `सध्या मला रजा नाही. मी मागाहून येईन.’ महाराज म्हणाले, `थापबाजी नाही ना करणार? तू वांड आहेस. छत्रपतीच्या हातावर हात मारून ग्रंथ लिहेन अशी घे पाहू शपथ.’ महाराजांनी हात पुढे केला. त्यांच्या उजव्या हातावर प्रबोधनकारांनी हात ठेवला आणि मोठ्याने शपथ घेतली, `सत्वधीर छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी हा ग्रंथ लिहून मी पुरा करीन, अशी शपथ घेतो.’ महाराजांच्या चेहर्‍यावर समाधान होतं. प्रबोधनकारांनी त्यांना पुन्हा नमस्कार केला आणि ते निघाले. गाडीवाल्यांनी त्यांना दादरला घरी पोचवलं. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. त्यानंतर ते जेवले, नेहमीप्रमाणे थोडा वेळ वाचन केलं आणि झोपले. सकाळी सातच्या सुमारात रमाबाईंनी प्रबोधनकारांना हलवून जागं केलं. घाबरत घाबरत उठवलं. म्हणाल्या, `अहो उठा, रस्त्यावर लोक जमले आहेत नि शाहू महाराज वारले असं बोलताहेत.’ त्यानंतर प्रबोधनकारांनी त्यांची प्रतिक्रिया अशी नोंदवली आहे, `बाहेर येऊन मी चौकशी केली. बातमी खरी ठरली. मस्तक सुन्न झाले. खलास मामला! कोल्हापूरच्या संबंध कायमचा तुटला. मागासलेल्या बहुजन समाजाचा वाली गेला. त्यांच्या आत्मोद्धाराच्या प्रचंड धडपडीवरील सर्चलाईट विझला !’
प्रबोधनकारांचे स्नेही `विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदे यांनी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांचं थोडक्यात चरित्र लिहिलं आहे. त्यात त्यांच्या निधनाचाही वृत्तांत आहे. त्यावरून प्रबोधनकार भेटून गेल्यानंतर नेमकं काय झालं, याचा अंदाज बांधता येईल. श्रीपतराव लिहितात, `श्रीमंत महाराजसाहेबांची स्वारी सावंतवाडीकरांच्या लग्नाकरिता बडोद्यास गेली होती. तेथून ती ता. ४ मे रोजी मुंबईस आली. या दिवशी महाराजांच्या छातीत थोडे थोडे दुखू लागले आणि त्यांची स्थिती काहीशी अस्वस्थ झाली. लागलीच मुंबईचे सुप्रसिद्ध डॉ. शांताराम शिरगावकर- एम.डी., डॉ. देशमुख- एम.डी., डॉ. गार्डनर टक्कर- हार्ट स्पेशालिस्ट इत्यादी डॉक्टरांचे औषधोपचार चालू झाले आणि महाराजांना थोडासा आरामही वाटू लागला. परंतु शुक्रवारी रात्री छातीत भयंकर वेदना होऊ लागून काही वांत्याही झाल्या. औषधोपचार सारखे सुरूच होते. परंतु त्यांचा काहीएक उपयोग न होता पहाटे ५.५५ला महाराज इहलोक सोडून गेले. अगदी अंतकालापर्यंत महाराजांना पूर्ण शुद्धी होती. महाराजांच्या निधनाने भोवतालच्या मंडळीत एकच हाहा:कार उडाला.’
श्रीपतराव शिंदे महाराजांच्या अगदी जवळ होते. महाराजांच्या निधनानंतर दहाच दिवसांनी हा वृतांत प्रसिद्ध झालाय. त्यामुळे यातल्या तपशीलावर विश्वास ठेवता येईल. शुक्रवारी रात्री म्हणजे प्रबोधनकार भेटून गेल्यानंतर शाहू महाराजांना त्रास सुरू झाला आणि ६ जूनच्या पहाटे त्यांचं निधन झालं. त्याआधी थोडं बरं वाटतंय असं बघून महाराजांनी प्रबोधनकारांना बोलावून घेतलं असावं. तब्येत इतकी बरी नसताना आणि मृत्यूशय्येवर असतानाही शाहू महाराजांना त्यांचा चळवळीतला सहकारी आठवला, यातच त्यांचं मोठेपण आहे. सगळ्यांना आपल्या शेवटच्या काळात मृत्यूची भीती तरी वाटत असते किंवा प्रॉपर्टीचं काय होणार याची चिंता तरी असते. पण शाहू महाराजांना चिंता होती ती हरवलेल्या इतिहासाची. जवळपास शंभर वर्षं दडपून ठेवलेला हिंदवी स्वराज्याच्या खुनाचा इतिहास लोकांसमोर यावा, ही त्यांची तगमग होती. तशी शपथ त्यांनी प्रबोधनकारांना घ्यायला लावली आणि नंतर समाधानाने देह ठेवला.
आपला शेवटचा संकल्प पूर्ण करण्याची शपथ घेण्यासाठी छत्रपती शाहूंनी प्रबोधनकारांना बोलावलं, यात प्रबोधनकारांचाही मोठेपणा आहेच. शाहू महाराजांना शपथ दिलेली असूनही त्यांच्या निधनामुळे रंगो बापूजींचं चरित्र लिहिण्याच्या प्रबोधनकारांच्या प्रयत्नांना खीळ बसलीच. त्यानंतर जवळपास २६ वर्षांनी म्हणजे १९४८ साली प्रबोधनकारांचा `प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी म्हणजेच सातार्‍याच्या राज्यक्रांतीचा इतिहास’ हा महाग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथाच्या पहिल्या पानावरच त्यांनी शाहू महाराजांनी इंग्रज सरकारला लिहिलेल्या पत्रातले स्वाभिमानी उद्गार नोंदवले आहेत. त्यानंतर शाहू महाराजांचा फोटो छापून एक प्रकारे हा ग्रंथ त्यांना अर्पण केला आहे.
या सगळ्या घडामोंडींमधलं एक उपकथानकही आहे. ते प्रबोधनकारांनी `शनिमहात्म्य’ या पुस्तकातल्या एका तळटीपेत दिलं आहे. मे १९२२ म्हणजे पाक्षिक प्रबोधन सुरू होऊन आठ महिने झाले होते. प्रबोधन लोकप्रिय होत होतं. पण स्वतःचा छापखाना नसल्याने प्रबोधनकारांना त्याचा अपेक्षित विस्तार करता येत नव्हता. प्रबोधन शाहू महाराजांच्या प्रेरणेनेच निघालं होतं. ते प्रबोधनच्या पाठीशी ठामपणे उभे होतेच. प्रबोधनसाठी मोठा छापखाना उभा करण्यासाठी भांडवल देण्याची तयारीही महाराजांनी दाखवली होती. त्याविषयीची प्रबोधनकारांनी लिहिलेली नोंद अशी…
`कै. शाहू छत्रपती करवीरकर यांच्या मनात पुण्यात एक मोठा अपटुडेट छापखाना काढावयाचा होता. त्यांच्या एस्टिमेटाची वाटावाट एक वर्षभर मजबरोबर त्यांनी केली आणि सुरुवातीचे भांडवल ४० हजार (२० हजार देणगी आणि २० हजार बिनव्याजी कर्जाऊ) देण्याचा बेत कायम ठरला होता. इतकेच नव्हे तर ५ मे १९२१ रोजी रात्री ११ वाजता मला खास भेटीला बोलावून मी उद्या कोल्हापुरास जातो. तू ४-५ दिवसांनी तिकडे ये आणि रक्कम घेऊन जा, आता या कामाला दिरंगाई नको, असे सांगितले. मी घरी परत आलो. सकाळी ८ वाजता निजून उठतो तो सर्वत्र बातमी की शाहू छत्रपती वारले!’
शाहू महाराजांचा असा अकाली मृत्यू झाला नसता तर प्रबोधनकारांची पुढे झालेली फरफट कदाचित थांबली असती. त्यांनी आयुष्यभर आर्थिक स्थैर्य अनुभवलं नाहीच. पुढे तर आत्यंतिक हलाखीची स्थिती आली. हे न होता शाहू महाराजांच्या आश्रयात त्यांच्या कर्तृत्वाला अत्यंत देखणं कोंदण लाभलं असतं. ते महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचं योगदान देऊ शकले असते. शाहू महाराजांना प्रबोधनकारांची योग्यता नेमकी कळली होती. त्यामुळे ते त्यांच्या गुणांना आणि कामाला न्याय देऊ शकले असते. प्रबोधन दीर्घकाळ चाललं असतं. प्रबोधनकार अनेक विषयांवर लिहिते झाले असते. पुढच्या काळात ब्राह्मणेतर आंदोलनात मराठे आणि मराठेतर अशी फूट पडली. त्यामुळे महाराष्ट्रातली समानतेची चळवळ कमजोर झाली. शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना हाताशी धरून हे होऊ दिलं नसतं. पण असं काहीच घडू शकलं नाही. ती फक्त प्रबोधनकारांसाठीची वैयक्तिक शोकांतिका नव्हती, तर महाराष्ट्राचीच मोठी शोकांतिका होती.

Previous Post

मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

Next Post

बुडत्यांना विद्वेषाचा आधार!

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post

बुडत्यांना विद्वेषाचा आधार!

‘कोकणच्या राणी’कडेही लक्ष द्या!

‘कोकणच्या राणी'कडेही लक्ष द्या!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.