अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल मेषेत, मंगळ वृषभेत, केतू तुळेत, बुध धनु राशीत, रवि-प्लूटो मकर राशीत, शुक्र-शनि-नेपच्युन कुंभ राशीत, गुरु मीन राशीत, चंद्र मेषेत, त्यानंतर वृषभ आणि मिथुन राशीत. दिनविशेष – १ फेब्रुवारी रोजी जया एकादशी.
मेष : आगामी काळ प्रेमी युगुलांसाठी गडबडीचा राहील, थोडी सावधानता बाळगा. कर्म भावात मकरेचा रवि, राश्यांतर करून आलेला शनी, त्याबरोबर असणारे शुक्र आणि नेपच्युनची पंचम भावावर असणारी दृष्टी त्यामुळे सतर्कता बाळगावी लागेल. फसवणूक अथवा लुबाडणूक होऊ शकते. मन खिन्न करणारी घटना घडू शकते. व्ययातील गुरूमुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. नोकरी-व्यवसायात सबुरीने घ्या. व्यवसायविस्ताराचा निर्णय लांबणीवर टाका. पैशाचे नियोजन काळजीपूर्वक करा. सरकारी सेवेत चांगले लाभ मिळतील.
वृषभ : कौटुंबिक आणि वैवाहिक विवंचनेत मार्ग सापडत नसल्यामुळे संभ्रम निर्माण करणारी अवस्था निर्माण होईल. शनिसोबत असणार्या शुक्रामुळे नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहील. अनपेक्षित लाभ होतील. आठवड्याची सुरुवात आळसावलेली राहील. दोन दिवसांनी उत्साहाने कामाला लागाल. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील. चैनीसाठी पैसे खर्च होईल. फोटोग्राफर, चित्रकारांसाठी लाभदायक काळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : चांगले लाभ मिळवून देणारा काळ आहे. अडलेली कामे झटपट मार्गी लागतील. आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक स्तरांवर चांगले यश मिळेल. शनि भाग्यात,साथीला शुक्र-नेपच्युन त्यामुळे योगसाधना, धार्मिक क्षेत्रात रमणार्यांसाठी उत्तम काळ आहे. तीर्थयात्रा होतील. भाग्यकारक घटना घडून नशीब बदलू शकते. आरोग्याची काळजी घ्या. डोळ्याची समस्या निर्माण होऊ शकते.
कर्क : आठवड्याच्या सुरुवातीला चिंताग्रस्त राहाल. मानसिक दडपण राहील. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नको. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. मनाने औषधे घेऊ नका. व्यवसायात जम बसणार नाही. योगकारक मंगळामुळे अनपेक्षित लाभ मिळतील. संततीसाठी त्रासदायक काळ. खेळाडूंसाठी उत्तम काळ. सामाजिक क्षेत्रात महत्वाच्या संस्थेवर चांगले पद मिळेल. पत्नीकडून चांगले सहकार्य मिळेल.
सिंह : रवीचे मकरेत होणारे षष्ठातील भ्रमण, सप्तम भावात शुक्र-नेपच्युन शनी त्यामुळे विवाहेच्छुकांनी सावध पावले उचलावी. फसवणूक होऊ शकते. भागीदारीत गुंतवणूक करताना काळजी घ्या. हितशत्रूंमुळे त्रास होऊ शकतो. अपचन-गॅस असे विकार होऊ शकतात. पत्रकार, संपादक, लेखकांना उत्तम आठवडा आहे. नवीन कामाच्या संधी मिळतील. संततीच्या बाबतीत आशादायक काळ आहे. प्रॉपर्टी ब्रोकर, एजंटांसाठी लाभदायक काळ आहे. कौटुंबिक विषयात समंजसपणा दाखवा. कोर्टात यश मिळणार नाही.
कन्या : प्रवासात लुबाडणूक होणे, वस्तू हरवणे, असे प्रसंग घडू शकतात. संततीकडे लक्ष द्या. सप्तम भावात हंसयोगात असणार्या गुरुमुळे नोकरी-व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. खिशात पैसे राहतील. १७ जानेवारी रोजी बदलेल्या शनीमुळे शुभकार्य निर्विघ्न पार पडेल. उधळपट्टी टाळा. नवीन गुंतवणुकीचा मोह टाळा.
तूळ : वैयक्तिक नात्यांमध्ये, मैत्रीत दुरावा निर्माण होऊ शकतो. शुक्राच्या शनी व नेपच्युनसोबत होणार्या भ्रमणामुळे प्रेम प्रकरणात भेटी टाळा. संततीसाठी काळ चांगला राहील. घरात शुभकार्ये होतील. कामे पूर्ण होण्यास विलंब झाल्याने चिडचिड होईल. पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला लाभ मिळेल. प्रवासात नव्या ओळखी होतील. पत्रव्यवहार, ई-मेल यामधून मोठी कामे पूर्ण होतील.
वृश्चिक : व्यावसायिक वर्गासाठी अत्यंत धावपळीचा आठवडा आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले काम निश्चितपणे पूर्ण होईल. विदेशात कामानिमित्ताने प्रवास घडतील. मामाचे सहकार्य मिळेल. २८ आणि २९ या तारखा मनस्ताप देतील. संभाषण कलेच्या क्षेत्रातील मंडळींना चांगली अर्थप्राप्ती होईल. संततीला परीक्षेत चांगले यश मिळेल. शत्रूपासून व चोरीपासून सावधान. शनि-मंगळ केंद्रयोगामुळे धावपळ वाढलेली दिसेल.
धनु : संततीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या. शनीची दृष्टी पंचमस्थानवर असल्याने शिक्षणात व्यत्यय येऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या, अपघात होऊ शकतो. कलागुणांना चांगला वाव मिळेल. त्यातून चांगली कमाई होईल. सुखस्थानातील, हंस योगातील गुरुमुळे नवीन वास्तू घेण्याचे योग जुळून येतील. जिवलग मित्रांच्या गाठीभेटी होतील. नवीन खरेदी होईल. नव्या कामाची प्रेरणा मिळेल. गर्भवतींनीr काळजी घ्यावी.
मकर : पैसे मिळवण्याच्या संधी चालून येतील. नवीन कल्पना सुचतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. व्यसनापासून दूर राहा. प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होईल. राजकारणात उत्तम काळ आहे. विवाहेच्छुकांसाठीही चांगला काळ आहे. कापड उद्योग, शेतकरी, शेती उत्पादन विक्रेते यांना चांगला लाभ मिळेल. अचानक धनलाभ होईल. पण आलेले पैसे जपूनच वापरा.
कुंभ : आगामी काळात उत्तम रिझल्ट मिळतील. शुकाचे लग्नातील भ्रमण व शनि-शुक्र नेपच्युन योगामुळे उद्योजक, शिल्पकार, शेतकरी, कुंभार काम करणारे यांना चांगला फायदा होईल. अडकलेले पैसे हातात पडतील. काही मंडळींना त्रासदायक काळ आहे. काम होण्यात विलंब होईल, प्रेमात निराशा येईल. आर्थिक बाजू मात्र भक्कम राहील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबासाठी सहलीचे आयोजन होईल.
मीन : खबरदारी घ्या. धनस्थानावर शनीची दृष्टी असल्याने बचत करणे हिताचे राहील. वायफळ खर्च टाळा. कर्ज, जामीन यापासून दोन हात दूरच राहा. गुरूकडून चांगली मदत मिळेल. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्याचे धाडस अंगाशी येऊ शकते. शनी-मंगळाची संयुक्त दृष्टी षष्ठम भावावर असल्याने नोकरावर विसंबून राहिल्यास नुकसान होईल. प्रवास टाळा. संतती, वैवाहिक सौख्यात कोणतीही कमतरता राहणार नाही. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात चांगली प्रगती कराल.