अशी आहे ग्रहस्थिती
राहू -हर्षल मेषेत, मंगळ (वक्री)- वृषभेत, केतू- तुळेत, रवि-बुध-शुक्र-धनु राहसीत, रवि-प्लुटो मकरेत, नेपच्युन- कुंभेत, गुरु- मीनेत, चंद्र- धनू राशीत, त्यानंतर मकर आणि कुंभेत, २८ डिसेंबरपासून बुध मकरेत, ३० डिसेंबरपासून शुक्र मकर राशीत. दिनविशेष – २५ डिसेंबर रोजी नाताळ.
मेष – वर्षाअखेरीस एखादी सुवर्णसंधी चालून येईल. आगामी काळ शुभघटनांचा राहील. धार्मिक कार्यात मन रमवाल, दिवस चांगले जातील. नवीन वर्षाची सुरुवात एकदम झकास होईल. सुरुवातीपासूनच कामे मनासारखी होतील. नोकरीनिमित्ताने परदेशप्रवासाची संधी मिळेल. नव्या शिक्षणाच्या संधी चालून येतील. वक्री मंगळाचा त्रास होऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. डोळ्यांचा विकार, दातदुखी यासारखे त्रास निर्माण होऊ शकतात. काळजी घ्या.
वृषभ – अमावस्येच्या आसपास प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. लग्नातील वक्री मंगळामुळे महत्त्वाकांक्षा वाढतील. शनिच्या दशम भावातील राश्यांतराचा चांगला लाभ होईल. व्यापार-उद्योगात अच्छे दिन अनुभवायला मिळतील. नोकरीत उच्चपदावर वर्णी लागेल. काहींसाठी १२ जानेवारीपर्यंतचा काळ खूपच महत्वाचा राहील. जुनी गुंतवणूक, विमा यातून चांगला आर्थिक लाभ होईल. क्लास, सल्लागार मंडळींसाठी उत्तम काळ आहे.
मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला घरात कौटुंबिक वाद घडू शकतात. त्यातून विचारपूर्वक मार्ग काढा. वक्री मंगळ व्यय भावातून सप्तमावर लक्ष ठेवून आहे. काहींना आरोग्याच्या समस्या भेडसावतील. थोडी काळजी घ्या. विवाहेच्छुकांचे लग्न ठरेल. २८ डिसेंबरपर्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्या. नंतर पुढील कामे सुरळीत पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्याची संधी मिळेल. त्यातून चांगले यश मिळेल.
कर्क – येत्या आठवड्यात करो या मरो अशी स्थिती राहील. निरुत्साह आणि धावपळ अशी सांगड असेल. मंगळाच्या वक्री भ्रमणामुळे आर्थिक आवक चांगली राहिली तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. शेअर बाजार, कमिशनमधून लाभ होईल. सुखस्थानातील केतू सप्तम भावात, शनि-प्लूटो युती योग यांच्यामुळे पती-पत्नीत मतभेद होतील. व्यावसायिक भागीदार, राजकारण्यांची ओढाताण होईल. विद्यार्थ्यांना खेळातून यश मिळेल.
सिंह – रविचे पंचम भावात होणारे भ्रमण, त्यासोबत लाभेश बुधाचे भ्रमण त्यामुळे २८ डिसेंबरपर्यंत घबाडप्राप्तीचे योग जुळून येतील. व्यावसायिकांना चांगले लाभ होतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील. दुसर्या नोकरीच्या शोधात असाल तर अशा लोकांना नवीन नोकरीची संधी चालून येईल. व्यवसायात नवीन प्रकल्प हातात पडतील. मेडिकल क्षेत्रात लाभदायक काळ आहे. संततीकडून उल्लेखनीय काम होईल. कलाकारांसाठी मानसन्मानाचे योग आहेत. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या – नववर्षाची सुरुवात आनंदी घटनांची आहे. कोणतेही निर्णय घ्याल ते अचूक ठरतील. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. कलाकारांचे मानसन्मान होतील. नव्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीत बदलाची शक्यता आहे. चांगली मनासारखी नोकरी मिळू शकते. कौटुंबिक, वडिलोपार्जित मालमत्तेमधून चांगला लाभ मिळेल. कागदपत्रे चोख ठेवा. हिशेबात खोट ठेवू नका. भविष्यात त्रास होऊ शकतो.
तूळ – आगामी काळ खूपच धमाकेदार राहील. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात भरपूर लाभ देणारा काळ राहील. अनेक दिवसांपासूनचे घर घेण्याचे स्वप्न आता आकार घेईल. आरोग्याची काळजी घ्या. नव्या ओळखी होतील, त्यातून भविष्यात चांगले लाभ मिळू शकतात. वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरीत अधिकारवाढीचे योग आहेत.
वृश्चिक – ‘पुढे धोका आहे’ हे वाक्य लक्षात ठेवा. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. शेअरबाजार, सट्टा यापासून दूरच राहा. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. व्यवसायात भरभराट होईल, फक्त आलेले पैसे जपून वापरा. लाभदायक काळ आहे. कुटुंबासाठी, मनोरंजनासाठी पैसे खर्च होतील. संततीकडून चांगली बातमी कानी पडेल. नोकरीनिमित्ताने विदेशात जाल.
धनु – नववर्षाच्या सुरुवातीला मानसन्मान मिळेल. नवीन व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल. खिशात पैसे असल्याने थोडी फार उधळपट्टी होईल. उधार देणे टाळा. स्वभावात विचित्रपणा निर्माण होईल, त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होईल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. लाकूड व्यापारी, शेतकरी, मेडिकल क्षेत्रातील लोकांसाठी येणारा काळ फारच उत्तम आहे.
मकर – साहित्यिक, प्रकाशक, मूर्तिकारांना नव्या संधी चालून येतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल, पण सावध राहा. नववर्षाच्या सुरुवातीला अनपेक्षित लाभ मिळतील. कुटुंबासाठी वेळ द्याल. नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल. वाहनखरेदीचा योग येईल. बाहेरचे खाणे आजाराला निमंत्रण देईल. व्यवसायात वादाचे प्रसंग निर्माण होतील. शक्यतो सबुरीने घेतलेले बरे.
कुंभ – जुना वाद डोके वर काढू शकतो. वादविवाद टाळण्यासाठी डोके शांत ठेवा. शक्यतो कुणावर चिडू नका. शत्रूवर विजय मिळवाल. संततीकडून चांगले काम झाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. लेखकांसाठी, करियरसाठी उत्तम काळ आहे. सासुरवाडीकडून लाभ मिळतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. संरक्षणक्षेत्रातील मंडळींसाठी चांगला काळ आहे.
मीन – मित्रमंडळींकडून चांगले लाभ मिळतील. नोकरी किंवा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी प्रवास करावा लागेल. तेव्हा स्वत:ची काळजी घेणे गरजेचे ठरेल. ती काळजी घ्या, म्हणजे झाले. मनासारख्या घटना घडल्याने आनंदी राहाल. घरात, नोकरीच्या ठिकाणी वादाचे प्रसंग होऊ शकतात. ते फार ताणू नका. समाजसेवकांचा सन्मान होऊ शकतो. घरात शुभकार्ये होतील, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. सरकारी नोकरदारांसाठी चांगला काळ आहे.