• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

सारवासारवीचे दिवस

- सई लळीत (विचारवंतीण)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 29, 2022
in मी बाई विचारवंतीण
0

शेवटी काल महाराणी द्वितीय एलिझाबेथला भावपूर्ण निरोप दिला गेला. सम्राज्ञीच ती.. ती सहज गडबडीत थोडीच जाणार..? ती अत्यंत दिमाखात गेली. अमर रहे अमर रहे.. अमके तमके अमर रहे अशा घोषणाही कोण देत नव्हतं. तीस किमीपर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या. कमीतकमी चौवीस तास रांगेत उभं राहावं लागत होतं. रांगेत जाण्यासाठी अजून एक रांग लागली होती. त्या सर्वांशी सम्राज्ञीचा नातू हात मिळवत होता. हलकंफुलकं बोलत होता. हास्याची लकेर उठत होती. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असावा.
राजघराण्याबद्दल तिथे अजूनही सर्वांना खूप आदर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ते राजकारणात जावून पद अडवत नाही हे असावं. ते आर्मीत, एअरफोर्समधे किंवा नेव्हीत दाखल होतात. आपला आब राखूनच ते वावरतात. त्यांच्यात अपक्ष राहता येत नाही. ही एक नवीनच माहिती मला कळली. म्हणजे स्वत:ची अस्मिता बिस्मिता वगैरे काही भानगडच नाही. एकतर आहे त्या पक्षात सामील व्हा… किंवा घरी फक्त तावातावाने चर्चा करत राहा. आपल्याकडे ती मात्र धमाल असते. कोणालाही उठून निवडणुकीला उभं राहता येतं. कोण कोण तर एखाद्या सभेत सहज उठून उभे राहात नाहीत, एवढ्या सहज निवडणुकीला उभे राहतात. खूपजण कोण अर्ज मागे घ्यायला सांगतं का याची वाट बघत असतात. कोण कोण मुळात जिंकण्यासाठी नव्हे तर कुणाची तरी मते खाण्यासाठी उभे राहतात. एकदा तर मतं खाण्यासाठी ज्याला उभं केलं होतं, त्याने खाताना एवढा ताव मारला की तोच निवडून आला. भारतात ही सगळी मजा आहे.
सगळ्यात मजा येते ती निवडणूक चिन्हं वाटतात तेव्हा. कुणाला फ्रीज मिळतो, कुणाला कपबशी, कुणाला सिंह, कुणाला शिट्टी. मला तर कोणीतरी हौशी माणूस खेळणी वाटतोय असंच वाटतं (तोच तो हौशी निवडणूक आयोग). पक्षाचं चिन्ह लोकांच्या गळी उतरवेपर्यंत उमेदवाराची दमछाक होते. मग चिन्हासाठी गाणी रचावी लागतात.
गोष्ट नाही.. अशीतशी. लक्षात ठेवा कपबशी..
इत्यादी इत्यादी.. आपण अमुक लोकांपर्यंत पोचलो हे लाखमोलाचं समाधान उरी बाळगून (आणि लाखो रुपये गमावून) उमेदवाराला हात चोळत शांत बसावं लागतं. बर्‍याच वेळा लोकं चिन्ह लक्षात फक्त ठेवतात आणि मत दुसर्‍यालाच देतात.
हुजूर पक्ष किंवा मजूर पक्ष या दोनच पक्षांत ब्रिटनमधे राजकारण ठासून भरलेलं असतं. आपल्याकडे कोणकोण एका जन्मात चार चार पक्ष बदलण्याची संधी घेतात… तडे तशी मिळत नाही. आपल्याकडे एकदा एका उमेदवाराने भरसभेत सवयीने जुन्याच पक्षाचा जयजयकार केला. मग नव्या मित्रांना त्याला भानावर आणावं लागलं. शेवटी पक्षासाठी एवढं तरी करावच लागतं.
ब्रिटिश लोकांना आपल्या परंपरांचा मात्र भयानक कडवा अभिमान आहे. निरोपासाठी सज्ज असलेलं अत्यंत रुबाबदार वेषातलं पूर्ण लष्कर बघून थक्कच थक्क व्हायला झालं. हजारो सैनिकांची शिस्तबद्ध परेड होती. पाच सहा तास सोहळा सुरु होता. एकापाठोपाठ एक सगळ्या सूत्रबध्द हालचाली होत होत्या. एवढी प्रॅक्टीस केली कधी? ही घटनाच बर्‍याच वर्षांनी घडली आहे. सगळंच अतर्क्य वाटत होतं. कुठेही कॅमेरे दिसले नाहीत. अकारण धावपळ नाही. मी आता वर्णन करु शकत नाही. केलं तर पूर्ण लेख या वर्णनानेच भरेल. आणि मग तुम्ही तो वाचालच याची अजाबात गॅरंटी नाही.
सम्राज्ञीचा जांभळा कोहिनूर असलेला मुकुट मात्र बर्‍याच वेळा दाखवला. हा हिरा आमचा आहे, असं मी प्रत्येक वेळी मोठ्याने म्हटलं. अगदी बिनधास्तपणे. घाबरायचं कशाला आणि कुणाला? मी काही लेचीपेची नाही.
तूच एक हिरा आहेस, नवरा गमतीत म्हणाला.
मला हे वाक्य खूप आवडलं. पण गंमतीत कशाला म्हणायला हवं?
बाय द वे, सेम तशाच जांभळ्या रंगाची सिल्कची साडी घ्यायची ठरवली आहे मी. बघू आता, त्या दृष्टीने संशोधन करायला सुरुवात करायला हवी. नंतर सावकाशीने.. (म्हणजे याच जन्मात) जांभळा खडा असलेलं पेंडंट घेईन.
सम्राज्ञी एलिझाबेथनंतर प्रिन्स चार्ल्स राजा झाला. राजा आणि राणी दोघेही वृद्ध आहेत. मी आपली राणीला निरखून बघत होते. ती मला शांत सौम्य वाटली. तिला काय सासूचा एक टक्काही जाच असा होत नसणार. कामाचा तर काय प्रश्नच नाही. काटकसरीचा संसार टुकीने करायचाही काही प्रश्न नाही. त्यांच्यात एकतरी फुटकळ भांडण (आपलं आयुष्यात सहज म्हणून चवीला) झालं असेल? राजवाडाच एवढा मोठा की लपाछपी खेळणं सहज शक्य असेल. नकळत खेळली असतील कधी? सम्राज्ञी एलिझाबेथने जर आत्मचरित्र लिहिलं असतं तर जवळपास शतकाचा आढावा त्यात आला असता. कोणीच कसं तिला सुचवलं नाही? बदलत्या जगाबद्दल तिची काय प्रतिक्रिया आहे ते पण लक्षामधे आलं असतं!
हा लेख लिहिता लिहितानाच कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्याची बातमी कळली. खूप वाईट वाटलं. महिन्याहून अधिक काळ त्याने आजाराशी झुंज दिली.
लोकांना हसवण्याचा ताण घेतला होता का त्याने?
कदाचित लोकांना रिलॅक्स करायच्या नादात स्वत: रिलॅक्स राहायचं राहूनच गेलं असेल.
अत्यंत बिझी शेड्यूल आणि कॅमेर्‍याच्या धाकामुळे धावपळीत जपावा लागणारा फिटनेस. सगळं.. अगदी झोप, विश्रांती, टाईमपासही गडबडीत आटपावा लागल्याने शेवटी गडबडीत वेळेआधीच हे जग सोडून जावं लागलं की!
काल टीव्हीवर त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जुने कार्यक्रम दाखवण्यात आले. ‘आप की अदालत’मधला रजत शर्मा यांनी घेतलेला इंटरव्ह्यू दाखवण्यात आला. बरेच परफॉर्मन्स दाखवले.
‘रोडफूडवर बंदी आणण्यात आली आहे. तुझं काय मत आहे त्यावर?’
‘अजिबात बंदी आणता कामा नये. आपण रस्त्यावर उभे राहून वडापाव खात असतो. भेळ खात असतो. तेव्हा नेमकी गावाकडची बस बाजूने जाते.सगळी धूळ त्यात जाते. वो गांव की मिट्टी होती है ना.. उससे खाने की खुशबू बढती है!’ सगळे खळखळून हसले.
आणखी एक परफॉर्मन्स दाखवला गेला. त्यात नेमका तो सिनेमात एखादं माणूस गेल्यावर जो ड्रामा दाखवला जातो, त्याची खिल्ली उडवत होता. डेड बॉडी घरी आल्यावर बायको, मुलं, नातेवाईक कसे रिअ‍ॅक्ट होतात हे तो मोठ्या मिष्कीलपणे सांगत होता. ते बघून मात्र काही केल्या हसू येईना. किमान हसवणार्‍या माणसांनी तरी असं वागता नये.
पितृपक्षात मरण आलं तर खूप भाग्याचं अशी हिंदू धर्मात समजूत आहे. कारण स्वर्गाचा दरवाजा उघडा असतो ना! पितरांची ये जा सुरु असते. मला एका अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आजीने खात्रीने असं सांगितलं.
कोण जाणे उघडा असतो की बंद असतो! पण काहीही असलं तरी स्वर्गात तो असा वेळेआधी आल्यावर कुणालाच बरं वाटलं नसेल आणि कोणीही हसलं नसेल! कधी नाय ती अगदी फ्लॉप एन्ट्री झाली असेल त्याची… काय करणार?… विलाज नाही.
बाकी सर्व ठीक. राजकारण जोशात सुरु आहे. दहा बातम्यांपैकी आठ बातम्या राजकारणाच्याच आहेत. टोले-प्रतिटोले हाणले जाताहेत. समाजकारण मागे मागे पडलं जातंय. जावूदेत.. चालायचंच.. कलीयुग आहे हे!
जसं की… सारवण मागे पडलं तरी… सारवासारवीचे दिवस बळावत चालले आहेत!

Previous Post

जाहिराती आणि स्त्रिया

Next Post

पौष्टिक पथ्यकर रोटी आणि पराठे

Related Posts

मी बाई विचारवंतीण

कोरस

September 16, 2022
मी बाई विचारवंतीण

गणपती इले…

September 1, 2022
मी बाई विचारवंतीण

दगडांच्या देशा…

August 4, 2022
मी बाई विचारवंतीण

कोथिंबीरवाली बाई

July 21, 2022
Next Post

पौष्टिक पथ्यकर रोटी आणि पराठे

अशी ठेचली मस्ती

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.