• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

राजकारणातला ‘समाजकारणी’ उद्धव ठाकरे!

- योगेश त्रिवेदी (विशेष लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 21, 2022
in विशेष लेख
0
राजकारणातला ‘समाजकारणी’ उद्धव ठाकरे!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले आणि समस्त राजकारण्यांना एक गहन प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? बाळासाहेबांचा ‘कर्तबगार’ पुतण्या शिवसेनेला अखेरचा ‘राम राम’ करुन बाहेर पडला. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांच्यासारखी ‘निष्ठावंत’ मंडळी शिवसेनेत नाहीत. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी आणि ज्वलंत हिंदुत्वाचा प्रसार/प्रचार करणारी बाळासाहेबांची शिवसेना अर्धशतक पूर्ण केलेली संघटना आता कशी चालणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र घेऊन १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. भल्या भल्या रथी महारथींना बाळासाहेबांमुळे मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागले, मातोश्रीवर यावे लागले. कुणी स्वार्थासाठी, कुणी प्रेमासाठी, कुणी कर्तव्यापोटी असे अनेक जण मातोश्रीवर आले. पण बाळासाहेबांच्या महानिर्वाणानंतर मातोश्रीचे काय होणार, असा ‘बालिश’ प्रश्न समोर आणण्यात आला. पण बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या सर्वच प्रश्नांना ज्या पद्धतीने निरर्थक ठरवून मार्गक्रमण सुरू केले त्यामुळे संपूर्ण देशात त्यांच्या कर्तृत्वाला वेगळीच झळाळी मिळाली.
बाळासाहेबांच्या हयातीत उद्धव यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष/कार्यप्रमुख म्हणून शिवसेनेच्या महाअधिवेशनात मान्यता देण्यात आली, त्याचवेळी बाळासाहेबांनी स्पष्टपणे म्हटले होते की माझा मुलगा म्हणून मी उद्धवला पुढे आणणार नाही, त्याच्यात कर्तृत्व असेल तर तो पुढे येईल. तुम्हाला मंजूर असेल तर मी मान्यता देईन. राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या कार्याध्यक्षपदाबाबतचा प्रस्ताव मांडला होता. नंतर काय झाले ते सर्वांनाच माहित आहे. पण बाळासाहेबांच्या महानिर्वाणानंतर उद्धव यांनी ज्या तडफेने शिवसेना पुढे आणली त्याबद्दल त्यांना तमाम मराठी माणसाने आणि समस्त हिंदुंनी मानलेच पाहिजे. २००९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ४५ आमदार निवडून आले होते. तेव्हा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती होती. परंतु २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी युती तोडण्याची घोषणा केली. त्यानंतर उद्धव यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, मनोहर पर्रीकर, आनंदीबेन पटेल, शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे शिंदे आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आदी तमाम नेत्यांच्या प्रचारासमोर अभिमन्यूसारखी लढत देत एकट्याच्या बळावर (अर्थातच पक्षातल्या नेत्यांना सोबत घेऊन) ६३ आमदार निवडून आणले. २८८ सदस्यांच्या सभागृहात दुसरा क्रमांक पटकावला.
ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आहे, अशी संभावना केली होती त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी क्षणार्धात भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची ‘गुगली’ टाकली. पण देवेंद्र फडणवीस यांना ते मंजूर नसल्याने त्यांनी नैसर्गिक मित्रपक्ष या नात्याने मातोश्रीवर दूत धाडून उद्धव यांच्यासमोर दोस्तीचा हात पुढे केला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत जनादेश कोणत्याही एका पक्षाला नव्हता, तर तो भाजप आणि शिवसेना युतीला होता. भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष एकत्र आले, तरच महाराष्ट्रात स्थिर सरकार येऊ शकणार होते. हा समंजसपणा उद्धव यांनी दाखवला आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रतिसाद दिला. त्यामुळेच १२२ + ६३ = १८५ अशी मजबूत युती अस्तित्वात आली.
डिसेंबर २०१४मध्ये ही युती आकाराला येण्यापूर्वीच उद्धव यांनी कार्ल्याच्या एकवीरा देवीचे दर्शन ६३ आमदारांसमवेत घेताना लवकरच मी एकशे ऐंशी आमदारांना घेऊन येईन, असे सांगत समयसूचकता दाखवली होती. शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी झाली असली तरी महाराष्ट्राच्या जनतेशी आमची नाळ कायम असल्याचे ठणकावून सांगायला सुद्धा उद्धव ठाकरे विसरले नाहीत. देशात जसा विरोधी पक्ष नामोहरम झाला होता, तसाच तो महाराष्ट्रात सुध्दा सत्ता गमावल्याने अंधारात चाचपडत होता. उद्धव यांनी बरोबर ही बाब हेरली आणि सत्तेत सहभागी असूनही विरोधी पक्षाची कमतरता भरून काढली. बाळासाहेबांचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच तर सूत्र उद्धव अंमलात आणत होते. मग शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न असो, शेतकर्‍यांना पीकविमा मिळण्याची समस्या असो की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा असो, सर्वच सामाजिक बाबतीत उद्धव यांनी फडणवीस यांना पुरेपूर साथ देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे मंत्री जसे झपाट्याने काम करीत होते, त्याप्रमाणेच किंबहुना काकणभर सरस ठरण्याचा प्रयत्न सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला आणि पक्षनेतृत्वाला खंबीरपणे सहकार्यही केले. या मंत्र्यांच्या विविध निर्णयांमुळे पक्षाची सामाजिक बांधिलकी दिसून येते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तसेच संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर अनेक वर्षे काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या छायेतल्या पक्षांनी राज्य कारभार केला. त्यांनी काम केले नाही असे नाही; पण पाच वर्षांत फडणवीस यांनी केवळ उद्धव यांच्या सहकार्यानेच महाराष्ट्रात जे काम उभे केले, विधायक, सामाजिक अधिष्ठानाचा जो आदर्श उभा केला त्यातून उद्धव यांनी स्वतःला राजकारणातला खरा समाजकारणी असल्याचे सिद्ध केले. आपण दूरदृष्टी असलेले परिपक्व राजकारणी आहोत, हेही दाखवून दिले. मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी वाराणसी येथे जाणे, अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरताना अहमदाबादला उपस्थित राहणे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आवर्जून उपस्थित राहून आपली भूमिका मांडणे, याबरोबरच अरविंद सावंत यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाची मोदी सरकारमध्ये वर्णी लावणे ही महत्त्वाची पावले उचलून उद्धव यांनी चाणाक्षपणा आणि चाणक्यनीती दाखवून दिली. ‘वाघ एकला राजा!’ हे शिवसेना गीतच त्यांनी खरे करून दाखविले.
२०१९च्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदलले. शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेल्यांना पंख फुटले. भाजपच्या एका हट्टापायी उद्धव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेना सरकार बनवते म्हणजे काहीही होऊ शकते, असा टीकेचा सूर लावणार्‍यांना २३ नोव्हेंबर २०१९च्या पहाटे काय केले याचा पद्धतशीरपणे विसर पडला. पण उद्धव यांनी बरोबर जागा दाखवून दिली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासमवेत चर्चा केली. अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या सोबतीने महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी आकस्मिक परिस्थितीत उद्धव यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे स्वीकारली. त्यावेळेपासूनच कोरोना, पूर, महापूर, अतिवृष्टी, वादळ, अशा अनेक संकटांचा ‘सामना’ मुख्यमंत्री म्हणून त्यांना करावा लागला. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर तो जसा तडफडतो त्याच पद्धतीने उद्धव यांनी भाजपच्या तोंडातून सत्तेचा घास हिरावून घेतल्यामुळे तो तडफडत होता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक वाचाळवीर खळखळ करीत उद्धव यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी फडफडतांना सर्वांनी पाहिले. देशातील सर्वांत कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क चार वेळा उद्धव यांची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा करण्यात आली. परंतु हुरळून न जाता, खचून न जाता धीरोदात्तपणे उद्धव यांनी अत्यंत संयमाने जबाबदारी पार पाडली. पराकोटीचा धीरोदात्तपणा आणि सहनशीलता दाखवताना बाळासाहेब आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे या दोघांच्या स्वभावाच्या सुंदर मिलाफाचे दर्शन घडविले. पत्नी सौ. रश्मी आणि पुत्र आदित्य दोघांना कोरोनाने ग्रासले होते, तरीही उद्धव यांनी अत्यंत कुशलतेने राज्यशकट हाकला. याच काळात हिंदुहृदयसम्राट आणि धर्मवीरांच्या विचारांचा कैवारी म्हणून काही लोक पुढे झाले आणि उद्धव यांच्या पाठीत खंजीर खुपसून कमलांकित होत मंत्रालयाचा सहावा मजला बळकावला. आधुनिक चाणक्य म्हणून पुढे आलेल्यांना केंद्रीय नेतृत्वाने त्यांची ‘पायरी’ दाखवताना आमच्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करू नका, असा परोक्ष संदेश दिला. एवढी प्रचंड उलथापालथ होत असताना माझा एक जरी शिलेदार विरोधात उभा राहात असेल तर मी मुख्यमंत्रीपदावर राहणार नाही, असे उद्धव यांनी निक्षून सांगितले आणि चक्क मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडून उद्धव यांचे भर पावसात आणि हजारो शिवसैनिकांच्या उसळलेल्या मानवी सागराच्या साक्षीने मातोश्री या तमाम शिवसैनिकांच्या श्रद्धास्थानी सौ. रश्मी, चिरंजीव आदित्य आणि तेजस यांच्यासह आगमन झाले. जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली. या वसुंधरेवरचे ऐतिहासिक, अभूतपूर्व असे देवदुर्लभ दृश्य जणू बाळासाहेब स्वर्गातून पाहात होते आणि त्यांच्या आसवांच्या धारा वरुणराजाच्या रूपाने बरसत होत्या.
शिवसेना प्रचंड मोठ्या संकटातून मार्गक्रमण करीत असतानाच उद्धव यांनी बाळासाहेबांचा करारीपणा, मनाचा निग्रह आणि माँसाहेबांचा शांत, सुसंस्कृत स्वभाव महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण हिंदुस्थानला दाखवून दिला. यावेळी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या एका इशार्‍यावर झोकून देणारा, पदांची कोणतीही लालसा न बाळगणारा कडवट शिवसैनिक उद्धव यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. वयाची ७५/७५, ८०/८५ वर्षे उलटून गेलेला हा तान्हाजी आणि बाजीप्रभू देशपांडे यांची आठवण करुन देणारा हा वीर भगव्याची शान दिमाखाने फिरविण्यासाठी ताठ कण्याने, निधड्या छातीने आणि ताठ मानेने उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक इशार्‍याची प्रतीक्षा करतोय. रात्र वैर्‍याचीच नाही तर अस्तनीतल्या निखार्‍याला नेस्तनाबूत करण्याची घडी आहे. आई तुळजा भवानी, आई एकविरा आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्धव ठाकरे, उचला तो बेलभंडार आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच शंभर नंबरी सोने असलेल्या हिंदुत्वासाठी कंबर कसा, उभा महाराष्ट्र आपली वाट पाहतो आहे. पुन्हा तो १९ जून १९६६चा दिवस उजाडला आहे. आजवरची वाटचाल लक्षात घेता सर्वच राजकीय परिस्थितीत तावून सुलाखून निघालेल्या आणि खर्‍या अर्थाने राजकारणातल्या समाजकारणी आणि निर्मोही मनाच्या उद्धव यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करावाच लागेल. उद्धवजी, आपण निःसंकोचपणे कार्य करीत रहा. वाघासारखी वाटचाल करा.

Previous Post

बाळासाहेबांचा निगर्वी, अबोल मुलगा

Next Post

धनुष्यबाण शिवसेनेचाच!

Related Posts

विशेष लेख

आमच्या बाई

May 8, 2025
विशेष लेख

व्यंगचित्रांमधून तेवली विवेकाची ज्योत!

April 17, 2025
विशेष लेख

पिंजर्‍यातल्या पोपटांचे चावे आणि बोचकारे

April 17, 2025
विशेष लेख

आजारी आरोग्यव्यवस्थेवर उपचार कधी होणार?

April 17, 2025
Next Post

धनुष्यबाण शिवसेनेचाच!

लंकेची पार्वती

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.