• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
July 5, 2024
in टपल्या आणि टिचक्या
0

□ महाराष्ट्र रसातळाला; उद्योग व्यवसाय पळवणार्‍या गुजरातने मागे टाकले.
■ गुजरातहित सांभाळण्यासाठीच नेमलेल्या त्रिकुटाने उत्तम कामगिरी करून दाखवली म्हणायची तर!… यांना गुजरातचे सर्वोच्च पुरस्कार देऊन कौतुक तरी करा.

□ संसदेत सेंगोल विरुद्ध संविधान; विरोधक आणि सत्ताधारी भिडले.
■ सत्ताधार्‍यांना जनतेने एवढी मोठी चपराक लगावली आहे, तरी त्यांची सुधारण्याची इच्छा दिसत नाही, हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वर्तनावरूनच दिसून येतंय… लढाई संपलेली नाही… ती अजून सुरूच झालेली नाही.

□ मोदी सरकारची मोगलाई; देवगिरी किल्ल्यावरील भारतमातेच्या पूजेस मनाई.
■ भारतमाता, हिंदुत्व वगैरे कशाशीही या व्यापार्‍यांना काही देणं घेणं नाही, ज्यांनी साक्षात प्रभू रामचंद्रांचा वापर करून नंतर ‘जय जगन्नाथ’ म्हणायला सुरुवात केली, ते भारतमातेचे कसले पांग फेडतील? मुळात ती पारतंत्र्यात खितपत पडली होती, तेव्हा तिचे मालक बनून बसलेल्या ब्रिटिशांच्या चाकर्‍या करणार्‍यांच्या अवलादी आहेत या.

□ नगर महापालिका आयुक्त फरार; कार्यालय सील – एसीबीने केली धडक कारवाई.
■ आणा बुलडोझर आणि टाका पाडून! आयुक्तच फरारी होत असतील तर साधारण काय स्वरूपाचा कारभार चालू असेल, ते वेगळं सांगायला नको.

□ आणखी एका भाजप नेत्याचे सेक्स स्कँडल उघड.
■ हे लोक या पक्षात येतात ते नेमके कशाला? सगळीकडे चारित्र्य आणि संस्कृतीचा टेंभा मिरवत फिरतात आणि वास्तवात यांचेच कासोटे इतके सैल?

□ मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात दंगल.
■ कुठे तरी दंगली पेटल्याशिवाय, लोक एकमेकांच्या उरावर बसल्याशिवाय राज्यकर्त्यांना आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण कसं टाकता येईल?

□ मिंध्यांना रामराम ठोकत पालघरचे डॉ. विश्वास वळवी शिवसेनेत.
■ ही तर फक्त सुरुवात आहे… मिंध्यांनी, गद्दारांनी फितवून नेलेल्या अनेकांचे जीव तिथे घुसमटतायत… योग्य वेळी सगळे परतीच्या वाटेवर दिसतील.

□ महायुती सरकारने महाराष्ट्र कर्जात डुबवला – नाना पटोले यांची टीका.
■ या बंगल्यात मीच बसणार, या खुर्चीतून मीच कारभार चालवणार, अशी नुसती आंधळी आणि क्रूर महत्त्वाकांक्षा असून उपयोग नसतो; योग्यताही असायला लागते, राज्याविषयी, जनतेविषयी प्रेमही असावं लागतं आणि राज्यकारभारावर पकड असावी लागते. मुळात लाचार, गद्दार म्हणून कोणाच्या वळचणीला जाऊन बसलेल्यांकडून राज्याच्या हिताचा कसा कारभार होणार?

□ अजित पवार गटाचे सहा आमदार राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना भेटले.
■ आणखी भेटतील आणि निवडणुकीच्या आधी ते पुन्हा मूळ पक्षात परतलेले असतील… काकांच्या जिवावरच असलेली दादांची दादागिरी संपली. फुलस्टॉप.

□ चौदा वर्षांच्या वनवासानंतरही मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यात.
■ आता गडकरी साहेब हवेत उडणार्‍या बस आणतील तेव्हाच कोकणवासियांचा प्रवास सुकर व्हायचा… पण, सध्याच्या सत्ताधार्‍यांचं काही सांगता येत नाही… मेले हवेत पण खड्डे करून ठेवतील आणि ते बुजवण्याची कंत्राटं काढून कमिशन खातील.

□ हिट अ‍ॅण्ड रन केसमध्ये बिल्डरपुत्र वेदांत अग्रवालला कमी शिक्षा का? – सुनील प्रभू यांचा सवाल.
■ प्रभू साहेब, ज्यांच्याकडे पैसे असतात, सत्ताधार्‍यांबरोबर उठबस असते, त्यांच्या मुलांना कधी शिक्षा होते का? त्याला दाखवण्यापुरती तरी शिक्षा कशी केली गेली, हा खरा प्रश्न आहे.

□ भाजपच्या आठवी पास नरेंद्र मेहतांनी केले कोकण पदवीधरसाठी मतदान.
■ ते म्हणतात, मी फक्त फोटोसेशन केलं. बायको पदवीधर आहे, तिने मतदान केलं. पण, मतदानाशी तुमचा संबंध नव्हता तर गेलात कशाला आणि वर बोट कशाला दाखवत होता हो मेहता?

□ मिंधे सरकारचा अर्थसंकल्प! तिजोरीत खडखडाट, पण घोषणांचा गडगडाट.
■ चद्दर लगी फटने, तो खैरात लगी बटने… पण लोक मूर्ख नाहीत… ते काही असल्या सवंग घोषणाबाजीला भुलायचे नाहीत.

□ मिंधे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण – उद्धव ठाकरे.
■ ताटात अन्न पडेल तेव्हा खरं… ते पडण्याची काही शक्यता तर दिसत नाहीच.

□ ‘नीट’वर बोलताच राहुल गांधींचा माईक ‘स्पीकर’ने बंद केला.
■ लोकसभेचे अहंमन्य आणि पक्षपाती अध्यक्ष ओम बिर्ला हे कोटाचे खासदार आहेत, कोटाचं नीट कनेक्शन लक्षात घेतलं तर त्यांना स्पीकर बंद करायची घाई का झाली होती, ते कळून जायला हरकत नाही.

□ शहापूरकरांची खोके सरकारने केली क्रूर थट्टा, पंचनामा दीड लाखांचा; हातावर टेकवले चार हजार.
■ अब की बार, हातावर फक्त चार हजार!

□ पहिल्याच पावसात रामनगरीच्या विकासाची पोलखोल.
■ प्रभू रामचंद्राचा निव्वळ राजकारणासाठी गेली अनेक वर्षं केलेला वापर आणि मंदिराच्या उद्घाटनातून स्वत:ला रामापेक्षा मोठं ठरवण्याचा उद्योग त्या मर्यादापुरुषोत्तमाला अजिबात आवडलेला नाही… रामराज्याच्या नावाखाली रावणराज्य चालवणार्‍यांवर राम कोपलेलेच आहेत. त्याचीच ही फळं आहेत.

Previous Post

मविआ राज्यात सत्ताबदल घडवणारच!

Next Post

देशांना नेते मिळाले, जगाला नेता नाही…

Next Post

देशांना नेते मिळाले, जगाला नेता नाही...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.