• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कसा पण टाका…

तुमचे प्रश्न आणि त्यावर हृषिकेश जोशींचे खुमासदार उत्तर

हृषिकेश जोशी by हृषिकेश जोशी
July 28, 2021
in कसा पण टाका
0

तुमच्या फोनवर कोणाची पाळत नाही ना, याची खात्री करून घेतली आहेत ना तुम्ही? आजकाल काही भरवसा नाही.
– प्रीतेश अत्रे, डोंबिवली
मला त्याची काडीचीही भिती नाही. एकतर मौज मस्ती, निंदा याची ऐकणार्‍यांना चटक तरी लागेल किंवा कलाकारांच्या व्यथा समजल्यावर परत फिरकायचं त्यांचं धाडसच व्हायचं नाही.

‘मेरी फिल्म में आप काम करना चाहोगे?’ असा मेसेज तुम्हाला राज कुंद्राकडून आला तर काय कराल?
– अभिषेक साळवी, चेंबूर
गेल्या दीड वर्षात मी एकही दिवस शूट केलं नसलं तरी या अडीअडचणीत माझं एकूण उत्तम चाललेलं आहे आयुष्यात.

या देशात हुकूमशाहीला पर्याय नाही, असं लोकशाही मार्गांनी निवडून आलेल्या अनेकांना वाटायला लागतं निवडून आल्यानंतर… तुमचं मत काय?
– गणेश शिंदे, धनकवडी, पुणे
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या जनतेला शिस्त लावण्यासाठी पहिली दहा वर्ष हुकूमशाही असायला हवी; असं एका खूप मोठ्या नेत्यानं जाहीर विधान मांडलं होतं. ते झालं नाही पण नंतर पुढे प्रत्येकवेळी सत्तेत असलेल्यांना तरी असं वाटत आलंय किंवा ही हुकूमशाहीच आहे असं विरोधकांना तरी वाटत आलेलं आहे.

बाई आणि बाटली यांची सांगड ज्याने कुणी घातली ती का बरं घातली असेल?
– विद्याधर संवत्सरकर, दादर
प्रेमातलं यश किंवा वैफल्य अवाजवी झालं की, या दोघीना एकमेकींशिवाय त्यांना करमत नाही. क्रम काहीही असो.

माझे दोन प्रश्न आहेत…
१. पावसाळा आला की मराठी मनांना ‘गारवा’ची आठवण होतेच… या आल्बममधलं तुमचं आवडतं गाणं किंवा कविता कोणती?
२. हिंदी सिनेमांमध्येही अनेक पावसाळी गीतं चित्रित झाली आहेत. त्यातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं?
– श्रद्धा भोंडवे, सांगली
१. ‘गारवा’मधली आवडती कविता ‘बघ तुला माझी आठवण येते का?’ आणि बहुतांशी सगळीच गाणी आवडतात.
२. हिंदी सिनेमातली आवडती पावसाळागीतं खूप आहेत. मधुबालाचं ‘एक लडकी भिगी भागी सी’; नर्गिस यांचं ‘प्यार हुआ इकरार हुआ’; ‘बरसात में हम से मिले तुम’; अमिताभ बच्चन मौसमी चॅटर्जी यांचं ‘रिमझिम गिरे सावन’; स्मिता पाटील, ‘आज रपट जाये’; सरफरोश ‘जो हाल दिल का’ अशी पाच पन्नास अनेक.

शाकाहारी मंडळीही जीवहत्या करतातच. जिवंत भाज्या उकडून, परतून खातात. तरीही त्यांच्यात श्रेष्ठत्त्वाचा दर्प कुठून येत असेल?
– बबन नेवरे, नागपूर
भाजीपाला आणि प्राणी यातला एक महत्वाचा फरक असा आहे की माणूस त्याच्या इच्छेनं शेती स्वत: निर्माण करत असतो. पण तो स्वत: प्राण्यांना जन्म देत नसतो. प्राण्यांचं त्यांचं त्यांचं या निसर्गात असण्याचं स्वतंत्र काहीतरी प्रयोजन आहे. माणसांच्या पोटात जाणे एवढंच त्यांचं नैसर्गिक जीवितकार्य नाही. त्यांचं भक्षण करण्याव्यतिरिक्तही माणूस जिवंत राहू शकतो.

सगळीकडे टॅलेंट हंट कार्यक्रम इतक्या प्रमाणात बोकाळले आहेत, इतकं टॅलेंट खरोखरच आहे सगळीकडे की गंदा है पर धंदा है ये?
– मैथिली गावडे, वसई
प्रसिद्ध सगळ्यांनाच व्हायचं असतं. भले ती तात्कालिक असेल. ‘जेमतेम’ एवढ्याच क्वालिफिकेशनवरही ते शक्य असतं. त्याचा टॅलेण्टशी सम्बन्ध असायलाच हवा असं काही नसतं. प्रसिद्धी मिळवायची असेल तर तुम्हीही संधी सोडणार नाही.

या वर्षीचा पावसाचा भयंकर तडाखा पाहिल्यानंतर तरी लोक यापुढे हवामान बदलांना गांभीर्याने घेऊ लागतील असे वाटते का?
– प्रणय दरेकर, भायंदर
पाऊस एवढाच पडत आलाय नेहमी. पण गेल्या दोन दशकांपासून आपली दाणादाण उडत चालली आहे याची कोणतीही कारणं आपल्याला तपासून घ्यायचीच नाहीयेत, असं एकदा ठरवून टाकलेलं असल्याने गेली अनेक वर्ष आपण फक्त हेच म्हणत आलोय. यावरून घ्या समजून.

डोळे कशासाठी, तुला साठवून मिटून घेण्यासाठी, असं अरूण दाते म्हणतात; डोळे कशासाठी, मारण्यासाठी, असं शिरीष कणेकर म्हणतात, डोळे कशासाठी, या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय?
– रिझवान शेख, बदलापूर
आजच्या काळात अनेक अनावश्यक गोष्टी टाळण्यासाठी मिटून घेण्यासाठी.

तुमचा सगळ्यात नावडता नट कोणता? नावडती नटी?
– सोनिया घोटगाळकर, कोल्हापूर
अहो या यादीसाठी इथे एवढी जागाच नाही.

Previous Post

टोक्या-पोक्या आणि पॉर्न!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

Related Posts

कसा पण टाका

कसा पण टाका… 9-10

October 14, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका… 9-10

October 7, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका…

September 30, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका..

September 23, 2021
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

काही मोजके भारतीयच माझे बांधव आहेत!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.