ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, मंगळ, शुक्र सिंहेत, प्लूटो-मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, रवि, बुध कर्क राशीमध्ये, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीमध्ये. विशेष दिवस : २९ जुलै कमला एकादशी, मोहरम, १ ऑगस्ट अधिक श्रावण पौर्णिमा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी.
मेष : आर्थिक बाजू भक्कम होईल. व्यावसायिकांचा उत्कर्ष होईल. नव्या ऑर्डर मिळतील. व्यवसाय-विस्तार होईल. नव्या संकल्पना यशस्वी होतील, आर्थिक स्थिरता लाभेल. पौर्णिमेच्या जवळपास भाग्योदयाचे अनुभव येतील. नोकरदारांसाठी चांगला काळ, वरिष्ठ खूष राहतील. घरात छोटेखानी समारंभामुळे आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आरोग्याची काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी चीजवस्तू सांभाळा. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. काहीजणांना नव्या नोकरीच्या संधी येतील.
वृषभ : घरात, कुटुंबात, सार्वजनिक जीवनात, नोकरीत वादाचे प्रसंग टाळा. नरमाईची भूमिका घ्या. ध्यानधारणेला वेळ द्या. सप्ताहाच्या मध्यास सुवार्ता कानावर पडल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. खेळाडूंच्या यशाचा आलेख उंचावेल. महिलांबरोबर संवाद साधताना काळजी घ्या. प्रेम प्रकरणात जपून वागा. मौजमजेसाठी वेळ आणि पैसा खर्च होईल.
मिथुन : पैशाचा नियोजनपूर्वक विनियोग करा. शिक्षणक्षेत्रातील प्रलंबित कामे, सरकारी कामे, विदेशात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांचा भाग्योदय घडून येईल. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ आहे. नव्या ओळखींमधून व्यावसायिक संधी चालून येईल. कोणताही निर्णय घेताना घाई टाळा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारपूर्वक आर्थिक मदत करा.
कर्क : नोकरीच्या ठिकाणी स्थिती चांगली राहील. काही नवीन काम सोपवले जाईल. वरिष्ठ खूष राहातील. हातातल्या कामात दुर्लक्ष केल्यास हातून मोठी चूक होईल, ती निस्तरण्यात वेळ आणि पैसे खर्च होतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक वादांकडे फार लक्ष देऊ नका. शब्दाने शब्द वाढवू नका. विदेशात कामासाठी जावे लागेल. आर्थिक नियोजन करून ठेवा. मौजमजेवर तूर्तास खर्च नको. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. उधार-उसनवारी टाळा. भावंडांबरोबर वाद टाळा.
सिंह : नोकरीत उत्कर्ष घडून येईल. बदलीच्या प्रयत्नांत यश मिळेल. मनासारख्या घटना घडतील, घरात आनंदाचे वातावरण राहील. सामाजिक क्षेत्रात वादाचे प्रसंग निर्माण होतील. सुरुवातीपासूनच खबरदारी घ्या. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल, दान-धर्म कराल. शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवा. व्यावसायिकांनी आळस झटकून काम करावे. अपरिचित ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू नये. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. अचानकपणे जुने येणे वसूल होईल.
कन्या : व्यावसायिकांना ‘पाँचो उंगलियाँ घी में’ असा अनुभव येईल. कामाचा ओघ वाढेल. नव्या ऑर्डर आल्याने आर्थिक बाजू भक्कम होईल. अधिक श्रावण महिन्यात कुटुंबासमवेत देवदर्शनाला जाल. नोकरीत वाद टाळा. जुन्या ओळखीचा चांगला फायदा होईल. रेंगाळलेले काम झटपट मार्गी लागेल. त्यामुळे टेन्शन फ्री व्हाल. हातापायाची दुखापत होण्याची असल्याने काळजी घ्या. नवीन गुंतवणुकीसाठी काळ चांगला राहील. जुगार, लॉटरी, सट्टा यापासून दूरच राहा.
तूळ : रेंगाळलेले काम मार्गी लागेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. पैसे जपून खर्च करा. महागडी वस्तू घेण्याचा मोह होईल. नोकरीत भाग्योदय होईल. पौर्णिमा विलक्षण अनुभव देईल. कुटुंबातील वातावरण उत्तम राहील. खेळाडू, कलाकार, संशोधक, शिक्षक, प्राध्यापकांसाठी चांगला काळ आहे. मित्रमंडळींशी बोलताना काळजी घ्या. आध्यात्मिक कार्याला वेळ द्याल. दानधर्म होईल. महिलांनी आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये.
वृश्चिक : व्यावसायिकांना यशदायक नव्या संधी चालून येतील, आर्थिक वृद्धी होईल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळवून देणारा काळ राहील. शुभ घटना घडतील, घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरदारांच्या धावपळीचा आरोग्यावर परिणाम होईल. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवा. सार्वजनिक जीवनात अवांतर बोलणे टाळा. वृद्धांची काळजी घ्या. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. सोशल मीडियावर फसवणूक होण्याची शक्यता आहे.
धनु : कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यावसायिकांनी नव्या प्रोजेक्टला सुरुवात करण्याआधी सगळी कागदपत्रे तपासूनच पुढे जावे. त्याबद्दल शंका असेल जाणकार व्यक्तीचा सल्ला, मार्गदर्शन घ्या; म्हणजे फसवणूक होणार नाही. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. नव्या नोकरीची संधी चालून येईल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. कलाकारांसाठी चांगला काळ आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटाच्या विकाराला निमंत्रण मिळेल. संगीत क्षेत्रात एखादी संधी चालून येईल. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल.
मकर : अडकलेल्या व्यवहारांसाठी मध्यस्थाचा आधार घेऊ नका. आपले काम शांततेने पूर्ण करा, चिडचिड करू नका. मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. नोकरीत स्थिती सुधारेल. जुनी गुंतवणूक चांगला लाभ मिळवून देईल. पैशाचा विनियोग काळजीपूर्वक करा. कुटुंबात दुरावा निर्माण होणे टाळा. छोट्या गोष्टींनी नाराज होऊ नका. जुगारापासून दूरच राहा.
कुंभ : वादग्रस्त आर्थिक व्यवहारात अडकणे टाळा. कोणताही आर्थिक व्यवहार करताना, कागदपत्रावर सही करताना काळजी घ्या. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. भविष्यात चांगला फायदा होईल. काहीजणांच्या बाबतीत शुभघटना घडतील, मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. उधार उसनवारी टाळा. पावसाळी सहलीत काळजी घ्या. आयटीमधील काही मंडळींना विदेशात जाण्याची संधी मिळेल. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल.
मीन : आर्थिक शिस्त पाळा. त्यात चूक केली तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. व्यावसायिकांनी काळजीपूर्वक काम करावे. कामगारवर्गाचा त्रास होऊ शकतो. जुने येणे सहजपणे वसूल होईल. नोकरदारांचा भाग्योदय होईल. धार्मिक कार्यासाठी भरपूर वेळ द्याल. दान धर्म कराल. कोणालाही सल्ला देताना विचार करा. वाद टाळा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. एखादे काम अडून राहिले असेल तर त्यात विनाकारण शक्ती वाया घालवू नका. रिअल इस्टेट व्यवसायात चांगला काळ राहणार आहे.