• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

खर्‍या हिंदुत्वाचे खणखणीत नाणे!

- योगेश त्रिवेदी (चौफेर)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 25, 2024
in विशेष लेख
0

२०१९च्या २८ नोव्हेंबरला जसे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेतली. तेव्हापासून भाजपचे नेते अस्वस्थ झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची कोल्हेकुई सुरू केली. ही कोल्हेकुई शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडून बेकायदेशीरपणे सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी अद्यापही सुरूच आहे.
मोगलांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी जसे संताजी धनाजी दिसत होते, तद्वतच या लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्रीसुद्धा जागेपणी झोपल्यावरही यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिसत आहेत. त्यांना ते जनाब, मौलाना अशी बिरुदावली लावायलाही मागेपुढे पाहात नाहीत. खरं पहायला गेले तर १९८७च्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने सर्वप्रथम हिंदुत्वाचा मुद्दा घेतला. तेव्हा भाजपने जनता दलाच्या प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता. शिवसेना या निवडणुकीत जिंकली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी डॉ. प्रभू यांच्या विरोधात याचिका दाखल करताना धर्माच्या आधारे प्रचार केल्यामुळे शिवसेनेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. परिणामी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. प्रभू या दोघांना सहा वर्षांसाठी मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. डॉ. प्रभू यांची आमदारकी रद्द ठरविण्यात आली. हिंदुत्वासाठी ही किंमत शिवसेना, शिवसेनाप्रमुख आणि डॉ. प्रभू यांना मोजावी लागली. भाजपचे चाणक्य प्रमोद महाजन यांना या निवडणुकीमुळे हिंदुत्वाचे कार्ड चालू शकते अशी उपरती झाली आणि मग त्यांनी शिवसेनेबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली.
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद धराशायी झाल्यावर पत्रकारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते सुंदरसिंह भंडारी यांना, ‘बाबरी किसने गिराई?’ असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सरळसरळ काखा वर केल्या आणि ‘नहीं वह बीजेपी के नहीं थे, आरएसएस के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, व्हीएचपी के नहीं थे’ असे उत्तर दिले. तेव्हा पुन्हा विचारणा केली की ‘फिर वह कौन थे? त्यावर ‘वे शायद शिवसेना के होंगे!’ असे सांगितले. याच वेळी कलानगर, मातोश्री येथून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी डरकाळी फोडली आणि सुस्पष्ट शब्दांत सुनावले की, बाबरी उद्ध्वस्त करणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. याचवेळी ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे लिहिलेली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र असलेले बाबरी उद्ध्वस्त होतानाची दिनदर्शिका प्रकाशित केली. त्यावर बंदी घालण्यात आली.
हिंदुत्वासाठी नेहमीच बाळासाहेबांनी स्वत: नमते घेत भाजपला मोठेपणा दिला. इतकेच काय, तर अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना २००२ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्रा प्रकरणी वक्रदृष्टी करताच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मोदी को हात मत लगाओ, मोदी गया तो समझो गुजरात से भाजप गया’, असा सुस्पष्ट निरोप लालकृष्ण अडवाणी यांच्यामार्फत वाजपेयी यांना दिला. त्याच सुमारास शंकरसिंह वाघेला हे भाजप सोडून शिवसेनेत यायला आणि शिवसेनेचे गुजरातचे मुख्यमंत्री व्हायला तयार झाले होते. मातोश्री येथे येऊन वाघेला यांनी ही आर्जवे केली. परंतु आम्ही वाघ आहोत, वाघेला नव्हेत, असे ठणकावून सांगत मोदी यांची पाठराखण केली होती. त्यांनी सातत्याने भाजपला साथ दिली आणि दिल्ली तुम्ही सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, आपण दोघे मिळून राष्ट्र आणि राज्य चालवू, अशी सामंजस्याची भूमिका घेतली.
२०१२पर्यंत व्यवस्थित सुरू होते प्रमोद महाजन यांची दुर्दैवी हत्या झाली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे महानिर्वाण झाले. २४ सप्टेंबर २०१४ रोजी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ खडसे यांनी शिवसेनेबरोबरची पंचवीस वर्षे जुनी युती तोडण्याची घोषणा केली. श्रेष्ठींच्या सांगण्यावरून आपल्याला ही घोषणा करावी लागल्याची कबुली खडसे यांनी दिली आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे लढविल्या आणि उद्धव ठाकरे हे अभिमन्यूप्रमाणे एकटेच लढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आनंदीबेन पटेल, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आदी सर्वच नेत्यांना अंगावर घेऊन त्यांनी एकहाती ६३ जागा जिंकल्या. मोदी यांची लाट होती. तरीही भाजपच्या वाट्याला १२३ जागा आल्या. उठता बसता शरद पवार यांच्या नावे बोटे मोडणार्‍या भाजपचे अल्पमतातले सरकार शरद पवार यांनी वाचविले. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी अल्पमतातील सरकारचे मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांतदादा पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना मातोश्रीच्या दारात पाठवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपली खुर्ची पाच वर्षे अबाधित राहण्यासाठी पाठिंबा मागितला. उद्धव यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पाठिंबा दिला.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आणि भाजपचे १०५ आमदार निवडून आले. परंतु १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अमित शाह यांनी दिलेला शब्द मोडला. सत्तासंपादनाचे गुर्‍हाळ सुरूच होते. शिवसेना समर्थन देत नाही तोवर सरकार बनविणार नाही असे म्हणणार्‍या भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना सोबत घेऊन २३ नोव्हेंबर २०१९च्या सकाळीच राजभवनावर जाऊन शपथविधी उरकून घेतला. बर्‍याच घडामोडी घडल्या. भाजपने विश्वासघात केल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. संकटे एकापाठोपाठ एक येऊ लागली. कोरोना महामारीने उच्छाद मांडला. स्वत: उद्धव यांच्यावर इस्पितळात दाखल होण्याची वेळ आली. अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांसोबत सर्वोत्तम कामगिरी केली.
आपले वाहन चालविणार्‍या सारथ्याला कोरोना होऊ नये म्हणून स्वतः मोटार चालवत पंढरीच्या पांडुरंगाच्या शासकीय महापूजेचे महत्कार्य त्यांनी केले, १ मे रोजी हुतात्मा चौकातही स्वत: मोटार चालवत हुतात्म्यांना अभिवादन केले. देशपातळीवर एकदा दोनदा नव्हे, तर चक्क चार वेळा पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये गणना झाली, ज्यात भाजपचे एकही मुख्यमंत्री नव्हते. अनाथांची माय म्हणून ओळखण्यात येणार्‍या सिंधुताई सपकाळ यांनी तोंडभरून कौतुक करताना बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचे संस्कार तुझ्यात आहेत, बाळा उद्धव, तू यशस्वी निश्चितच होशील, असा आशीर्वाद दिला. भाजपने या काळात सर्वच प्रथा परंपरा मोडीत काढून शिवसेनेला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून साथ देण्याऐवजी त्रास देण्याचेच काम केले. आणखी पराकोटीला जात शिवसेना फोडण्याचे लोकशाहीचा गळा घोटण्याचे अश्लाघ्य काम केले आणि मग माझा एक जरी सहकारी विरोधात उभा राहिल्यास मी पदावर राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि वर्षा निवासस्थान क्षणार्धात सोडून रात्रीच्या रात्री मातोश्री येथे येणे पसंत केले. अख्खा महाराष्ट्र हळहळला. महाविकास आघाडी सरकार चांगले चालत असताना चालत्या गाडीला खीळ घातली गेली.
स्वतः गोल टोप्या घालून सीरकुरमा ओरपणार्‍यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह तमाम शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा उचललाय. परंतु सुब्रह्मण्यम स्वामींपासून तो ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उद्धव हे खरे हिंदुत्ववादी असल्याचा निर्वाळा दिला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी, उद्धव यांचा विश्वासघात झाला असून ते पुन्हा मुख्यमंत्री होईस्तोवर हे दु:ख दूर होणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. उद्धव यांचा विश्वासघात करणारे हिंदू असूच शकत नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे मातोश्री येथे विधिवत पाद्यपूजन केले गेले. उद्धव यांचे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे हिंदुत्व कसे खणखणीत आहे, यावर धर्माचार्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेला बाकी कुणाच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही.
महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व शेंडीजानव्याचे हिंदुत्व नाही, आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी १९९० साली गिरगाव चौपाटी येथे केलेली हिंदुत्वाची व्याख्या महत्वाची आहे.
उद्धव ठाकरे, आपण बाळासाहेबांचे आणि माँसाहेबांचे सुपुत्र आहात आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या साप्ताहिक ‘मार्मिक’, दैनिक ‘सामना’ आणि ‘दोपहर का सामना’चे संपादक आहात. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान आपल्या नेतृत्वाची प्रतीक्षा करीत आहे. १९६६पासूनचा शिवसैनिक बेलभंडार उचलण्यास सिद्ध झालेला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा आपल्याला आशीर्वाद आहे. बाटग्यांच्या बांगेकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपले हिंदुत्वाचे नाणे कसे खणखणीतच आहे. आपणांस उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, या आई एकवीरा देवी आणि आई तुळजाभवानी मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना.

Previous Post

आंब्राई – २७ जुलै २०२४

Next Post

उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर शंकराचार्यांचे शिक्कामोर्तब

Related Posts

विशेष लेख

आमच्या बाई

May 8, 2025
विशेष लेख

व्यंगचित्रांमधून तेवली विवेकाची ज्योत!

April 17, 2025
विशेष लेख

पिंजर्‍यातल्या पोपटांचे चावे आणि बोचकारे

April 17, 2025
विशेष लेख

आजारी आरोग्यव्यवस्थेवर उपचार कधी होणार?

April 17, 2025
Next Post

उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर शंकराचार्यांचे शिक्कामोर्तब

शाहीर केशवाचे पोवाडे

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.