□ गोविंदाच्या एकीचे थर कोसळले; दहीहंडी समन्वय समिती फुटली.
■ मराठी माणसाला लागलेला शाप आहे… तो हे राज्य खिळखिळं करून टाकेल, हीच भीती वाटते.
□ मतदान करायची संधी मिळेल तेव्हा लोक धडा शिकवतील – शरद पवार यांचा इशारा.
■ म्हणून तर निवडणुका पुढे पुढे ढकलून ती संधी नाकारली जाते आहे… काही विशिष्ट मतदारांना निवडणुकांच्या वेळीही ही संधी नाकारली जाऊ शकते, हे विरोधी पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे पवार साहेब!
□ राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत वसुंधराराजेंचे नाव वगळले.
■ म्हणजे पुन्हा हे राज्य काँग्रेसच्या हाती सोपवण्याचीच व्यवस्था झाली म्हणायची. घ्या आणखी पायावर दगड मारून.
□ हिंदुस्थानातील मुस्लीम आधी हिंदूच होते – गुलाम नबी आझाद यांचे विधान.
■ मग तुम्ही कधी घरवापसी करताय? निदान उघडपणे भारतीय जनता पक्षात तरी जा. बाहेरून कशाला इतकी खुशामत करताय?
□ बिल्कीस बानो खटल्यातील दोषींना माफी का दिली, सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला खडसावले.
■ गुजरात सरकार, गुजरात न्यायालय हे सगळे भारतीय संविधानाच्या चौकटी उल्लंघून वेगळ्याच संहितांनुसार राज्य आणि कायदा चालवू लागलेले आहेत. ते काय उत्तर देणार?
□ शिर्डीतील कार्यक्रमासाठी शाळांच्या एसटी वळवल्या; मिंधे सरकारमुळे हजारो विद्यार्थ्यांची शाळा बुडाली.
■ पढेगा इंडिया, तो इनको निकाल बाहर फेकेगा इंडिया… मग कशाला मुलांच्या शिक्षणाची सोय पाहतील?
□ मिंधे सरकारचा आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव ठरला ‘फ्लॉप शो’; कोट्यवधींचा चुराडा करूनही शून्य प्रतिसाद.
■ लोकांना वेगळा पाऊस अपेक्षित असणार… गद्दारांवर पडलेला… तो काही आंबोलीत पडायचा नाही, मग कसे जाणार?
□ शिवसेनेमुळे खड्डेमुक्तीच्या कामाला वेग; आमदार अजय चौधरींकडून पाहणी.
■ शिवसेना खड्डे भरून घेईल, पण ते नंतर पडणारच आहेत पुन्हा, त्यावर कायमचा उपाय काय?
□ चाकरमान्यांच्या वाटेत खड्डे; बस डेपोंच्या दुरवस्थेचा प्रश्न पोहोचला हायकोर्टात.
■ सगळ्या मंत्रिमंडळाला एसटीमधून मुंबईच्या रस्त्यांवरून किंवा मुंबई गोवा महामार्गावरून फिरवून आणलं पाहिजे काही तास… आपोआप खड्ड्यांचा प्रश्न कायमचा सुटून जाईल.
□ महाराष्ट्रात मिंधे सरकारची गाडी गडगडणार; काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अंदाज.
■ त्याला सर्वेक्षणाची गरज नाही, लोकांच्या मनात खदखदत असलेला संताप दिसतोच आहे. म्हणून तर सतत जाहिरातबाजी करत आणि रेवड्या वाटत सुटलेत.
□ आता छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रिपद नको – आमदार बच्चू कडू.
■ ज्याला काही नको असतं, त्याला त्याच्या सारख्या उचक्या पण लागत नाहीत बच्चूभाऊ! कशाला नको तिथे गोड व्हायला गेलात?
□ राज्यभरात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी; १३ संघटनांचे निषेध आंदोलन यशस्वी.
■ आता पुन्हा एखाद्या पत्रकाराने सत्तेच्या विरोधात लिहिले की काय होते ते पाहिल्याशिवाय या आंदोलनाची यशस्विता कशी ठरवता येईल?
□ पालकमंत्र्यांअभावी १७ जिल्ह्यांमधील प्रशासकीय यंत्रणा ठप्प.
■ प्रशासकीय यंत्रणेला हैक हैक करायला पालकमंत्री लागतात का? आपली आपण कामंच नाही करता येत?
□ कल्याणमध्ये भाजप आमदार-मिंधे गट यांच्यात पुन्हा राडा.
■ कल्याण-ठाणे-औरंगाबाद अशा शिवसेनेचे गड असलेल्या सगळ्या ठिकाणी हेच होणार, अखंड शिवसेनेकडून हे हिसकावता येणार नव्हते, म्हणूनच तर पक्षफोडीची कालाकांडी केली गेली.
□ खुन्यांच्या हातातच चौकशी समिती; न्याय काय मिळणार? – विजय वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाला घेतले पैâलावर.
■ सगळ्या सार्वजनिक सेवा सरकारचे मालक असलेल्या उद्योगपतींच्या हातात नेऊन सोपवण्याचीच सुपारी आहे, तर मग न्याय कुठून मिळायचा?
□ नेहरूंची ओळख त्यांचे नाव नाही, त्यांचे कर्तृत्त्व आहे – राहुल गांधी.
■ हे कळायला एक प्रौढ पात्रता लागते राहुलजी. शाळकरी बुद्धीच्या विचारधारेला नावं पुसण्यात बालसुलभ आनंद मिळतो, तो घेऊ द्यात.
□ शिंदे एकट्याच्या जिवावर नव्हे, तर आमच्या ४० जणांच्या जिवावर मुख्यमंत्री – भरत गोगावले यांची खदखद बाहेर.
■ मग आता करताय का उप-बंड? गोगावले सेना काढताय?
□ भाजपचे दुकान जोरात, पण गिर्हाईकं सगळी नवीन- नितीन गडकरी यांचा टोला.
■ दुकान हा शब्द तुम्हीच वापरलात ते बरं झालं… इतरांनी वापरला असता तर दुकानदार आणि दुकानातली रोजंदारीवरची पोरं हे अंगावर धावून आले असते!
□ सरकार आपल्या दारी, निवडणूक घ्यायला घाबरी- आदित्य ठाकरे यांचा हल्ला.
■ कारण त्यांना कल्पना आहे पुरी की जनता आपल्याला बसवणार आहे घरी!
□ ‘आयुष्मान भारत’सह सात योजनांमध्ये मोठा घोटाळा –
कॅगच्या अहवालात पोलखोल.
■ सगळ्यात भ्रष्ट सरकार अशी इतिहासात नोंद होईलच, भले ५० वर्षांनी का होईना!
□ राष्ट्रवादीतील फूट हा कौटुंबिक विषय नाही – खासदार सुप्रिया सुळे.
■ ही कौटुंबिक जिव्हाळ्याची सिरीयल आता तरी संपवा सुप्रियाजी; जिव्हाळा असता तर बंड झाले नसते ना? उगाच लोकांना जिभा लांब करायची संधी कशाला द्यायची?