• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कंटोळी आणि फोडशी

- शुभा प्रभू साटम (चला खाऊ या)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 23, 2021
in चला खाऊया!
0

पावसाळा सुरू झालाय आणि हाच हंगाम आहे पावसाळी रानभाज्यांचा. शेकडो प्रकारच्या पावसाळी भाज्या या सुमारास येतात. शहरात कमी पण गावाकडे आणि त्यातही आदिवासी वस्ती जिथे आहे तिथे तर रग्गड! सध्या जागतिक अन्न-नकाशावर ‘स्थानिक खा’ हा विचार प्रबळ होत आहे. स्थानिक आणि मोसमातील अन्न खाणे कधीही हितावह असते.
पावसाळ्यात ज्या भाज्या येतात त्या चवदार असतात आणि औषधी गुणधर्म पण भरपूर असतात त्यांच्यात. पावसाळा हा एकूणच साथीच्या किंवा पाण्यातून होणार्‍या संसर्गजन्य विकारांचा काळ. योग्य आहार असेल तर त्यावर नैसर्गिकरित्या मात करता येते. मांसाहार करणारे असाल तर हे लक्षात घ्या की या सुमारास माश्यांच्या विणीचा हंगाम असतो, त्यामुळे मासे कमी प्रमाणात किंवा न खाणे गरजेचे असते. निसर्गाचा समतोल साधणे आवश्यक आहे.

मांसासाठी कापल्या जाणार्‍या प्राण्यांनी नवा चारा खाल्लेला असल्याने प्राण्यांचे मांस पचायला जड होऊ शकते. त्याकरता काही काळ शाकाहार उत्तम ठरतो आणि तेव्हाच या रानभाज्या आहारात असणे उपयुक्त होते.
इथे कंटोळी आणि फोडशी या दोन पावसाळी भाज्यांच्या कृती सांगणार आहे. दोन्ही अतिशय चवदार आणि बनवायला सोप्या भाज्या आहेत.

कंटोळी/ फागले भाजी

साहित्य :
कंटोळी- पाव किलो
कोवळी पाहून घ्यावी.
कांदा- १ मध्यम
हळद
लाल तिखट
मीठ
गूळ
ओले खोबरे.

कृती :
कंटोळी धुवून मधून चिरून घ्यावी. आतील जून बिया चमच्याने काढून टाकाव्यात. तेल तापवून राई, हिंगाची फोडणी करून त्यात कांदा लालसर करावा. आता चिरलेली भाजी, हळद, तिखट, गूळ, मीठ घालून ढवळून मंद आगीवर शिजवावी. शेवटी ओले खोबरे टाकावे.
यात आवडीप्रमाणे सुकी करंदी/ सोडे पण घालू शकता. मग गूळ वगळून कोकम चुरडून टाकावे.
किंचित तुरट अशी ही भाजी पोटाला उपकारक असते.

फोडशी भाजी

ही गवताप्रमाणे दिसते.

साहित्य :
फोडशी जुडी १
कांदे २ मध्यम
भिजवलेली चणा/मूग डाळ : अर्धी वाटी
हिरवी मिरची
लसूण पाकळ्या ४/५
ओले खोबरे थोडे
मीठ
गूळ

कृती :
भाजी सुटी करून, मुळाकडील जून पांढरा भाग काढून, पाण्यात थोडावेळ बुडवून ठेवावी. भाजीला आत माती चिकटलेली असते ती जाते.
चाळणीवर निथळून घ्यावी. कांदा आणि मिरची बारीक चिरावे. तेल तापवून, राई + हिंग + लसूण यांची फोडणी करून कांदा आणि मिरची घालून थोडा वेळ परतावे.
त्यात भिजवलेली डाळ घालून, झाकण ठेवून बोटचेपी शिजवून घ्यावी.
डाळ शिजेतो भाजी चिरून घ्यावी. फार बारीक चिरू नये, बुळबुळीत होते.
शिजलेल्या डाळीत भाजी + गूळ घालून, ढवळून झाकण ठेवून द्यावे.
पाच मिनिटांनी ओले खोबरे + मीठ घालून चरचरू द्यावी.

यापैकी कोणतीही भाजी आणि भाकरी हे जेवण फार समाधान देणारे आहे नक्की.

– शुभा प्रभू साटम

(लेखिकेचे पारंपरिक अन्न या विषयावर प्रभुत्व आहे.)

Previous Post

कारोना इलो हा

Next Post

नानांच्या घरात धबधबा

Related Posts

चला खाऊया!

फ्राईड राईस

May 15, 2025
चला खाऊया!

मजेदार मेडिटेरियन!

May 5, 2025
चला खाऊया!

सॅलेड्स : एक पूर्ण आहार

April 18, 2025
चला खाऊया!

मूर्तिमंत माधुर्य, चिरोटे!!

April 11, 2025
Next Post
नानांच्या घरात धबधबा

नानांच्या घरात धबधबा

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.