• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पावसाळी प्रयोग आणि पार्टीही!

- विजय कदम

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 23, 2021
in घडामोडी
0

पावसात मी काहीवेळा अडकलो तर होतोच, पण बरेचदा मी तो एन्जॉयही केला आहे.

१९९९ सालातली गोष्ट. साली वाशीला नाटकाचा प्रयोग होता. तेव्हा वाशीला जाण्यासाठी ट्रेन वगैरे काही झाली नव्हती. वाशीला जायचं म्हणजे अंधेरी पूर्वेला यायचं आणि तिथून वाशी डेपोला जाणारी बस पकडायची. हा एक द्राविडी प्राणायाम होता. पण इलाज नव्हता. तेव्हा वाशीला जाणा-या ट्रेन्स नव्हत्या. टू व्हीलरही फारशा नव्हत्या. तेव्हा मी आणि रसिका (जोशी) आम्ही भर पावसात निघालो. बघता बघता पावसाचा जोर इतका वाढला, की पाणी साचायला लागलं ठिकठिकाणी. पण काहीही करून आपण प्रयोगाला जायला पाहिजे, वाशी गाठायला पाहिजे म्हणून कंबरेएवढ्या पाण्यात उड्या मारत मारत आम्ही चाललो होतो. एक वेळ तर अशीही आली की आम्हाला वाटलं आता आम्ही वाशीपर्यंत जाऊच शकणार नाही. कारण टॅक्सी मिळत नव्हती.

लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं की, उड्या मारत पाण्यातून जात असताना खाली एखादा मेनहोल ओपन असेल तर गेलो असतो ना.. पण आम्हाला पोपटाचा डावा डोळा दिसत होता फक्त.. की वाशीला पोहोचायचेय, प्रयोग रद्द होता कामा नये. शेवटी प्रयोगाला पोहोचू शकलो नाहीच. पण हा फार मोठा कठीण प्रसंग मला चांगला लक्षात राहिला आहे आणि तो पाऊसही..

याच्या बरोब्बर उलटा प्रसंगही लक्षात राहिला आहे. वर्ष होतं १९८१. भारत सरकार, एअर इंडिया, टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आणखी एक कंपनी यांनी मिळून इंडियन फूड फेस्टिवल हाँगकाँगला आयोजित केला होता. त्यासाठी माझीही निवड झाली होती. त्यावेळी शफाअत खानचं नाटक मी छबिलदासला करत होतो. त्यानंतर दोनच दिवसांनी मी हाँगकाँगला जाणार होतो. आपल्यातलाच एकजण सरकारी खर्चाने परदेशी जाणार म्हणून पार्टी द्यायची ठरवली. ती नेमकी कुठे? पनवेलला जाताना मध्ये एक अभयारण्य लागते ना, तिथे. सगळेजण पुढे गेले होते आणि मी एक प्रयोग होता म्हणून मागून येणार होतो. प्रयोग संपवून मी एकटाच त्या अभयारण्यात जायला निघालो. मला खूण सांगण्यात आली होती की अभयारण्याच्या स्टॉपवर उतर. तिथे तुला कुणीही सांगेल.

बघा हं, त्यावेळी जीपीएस नव्हता, पाऊस मुसळधार पडत होता. त्या पावसात मी एकटाच. सोबतीलाही कुणी नाही. पण कसातरी मी तेथे पोहोचलो. तेथे एका ठिकाणी लोकांचा आरडाओरडा म्हणजे हसणं खिदळणं ऐकू आलं. मिणमिणता दिवा दिसला. तेथे शफाअत खानपासून अजित भगत, नागेश मोरवेकर, जगदीश कदम वगैरे २५ ते ३०जण माझी वाट बघत होते. म्हटले आलास, बरं झालं. आता आपण सुरू करू या. म्हणजे आम्ही सुरू केलंच आहे तू जॉईन हो. त्यावेळी लक्षात आलं की तेथे पावसामुळे ब-याच गोष्टी भिजल्या होत्या. मुख्य म्हणजे स्टोव्ह भिजला होता. त्यामुळे आम्ही २५ मेणबत्त्या पेटवून त्याच्यावर हाताने टोप धरून आम्ही जेवण गरम केलं. हेही लक्षात राहिलंय.

दुसरं म्हणजे एकदा डिसेंबर महिन्यात प्रयोग होता जेएनपीटीमध्ये. तिथे जाण्यासाठी मी वाशीला उतरलो. तेथून मिळेल ती बस पकडायची. आता डिसेंबरचा महिना. पावसाचा काय संबंध? म्हणून मी सफेत रंगाची सलवार, त्याच्यावर सदरा आणि जॅकेट घातलं होतं. माझ्याबरोबर आणखी एकजण कास्टिंगवाला होता. वाशीवरून उरणला जायला काय मिळणार? अशी परिस्थिती होती. अशात बस कंडक्टरने एका ठिकाणी आम्हाला मध्येच उतरवलं. रात्रीचा मिट्ट अंधार. समोरचं काही दिसत नव्हतं. त्याचवेळी समोरून येणारी एक बाईक दिसली. ती दिसताच मी ओरडून सांगितलं, माझं नाव विजय कदम आहे. मी नाटकातून काम करतो. मी तुम्हाला काहीही करणार नाही. फक्त मला तुम्ही नेऊन सोडा. मी बोलत असतानाच ती मोटारसायकल थांबली. कसातरी मी त्याच्यामागे बसून गेलो आणि त्या ठिकाणी पोहोचलो.

– विजय कदम

ज्येष्ठ अभिनेता

Previous Post

पण हाय… प्रियेची माझ्या लाईन हार्बर होती!

Next Post

हव्यास

Next Post
हव्यास

हव्यास

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.