अशी आहे ग्रहस्थिती
बुध-राहू वृषभेत, रवी मिथुनेत, मंगल-शुक्र कर्केत, केतू वृश्चिकेत, चंद्र धनुमध्ये आणि सप्ताहाच्या अखेरीस मीनेत, शनि-प्लूटो वक्री मकरेत आणि नेपच्युन कुंभेत.
मेष – आठवड्यात मूड रोमँटिक राहील. मात्र, बोलताना नियंत्रण ठेवा. चुकून कुठे ध चा मा झाला तर चांगलेच महागात पडू शकते. विशेष करून खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, नाहीतर पोटाची समस्या निर्माण होऊ शकते. गुरूकृपा आहे, त्यामुळे यश मिळणार हे नक्की समजा आणि पुढे चालत राहा.
वृषभ – नको ते साहस करू नका, अंगाशी येऊ शकते. कुठे प्रेमप्रकरण सुरू असेल किंवा कुणाच्या प्रेमात पडण्याच्या बेताला असाल तर जरा सांभाळून पाऊल टाका. नाहीतर ‘आ बैल मुझे मार’ अशी परिस्थिती होऊ शकते. वक्री गुरूमुळे व्यवसायाला चांगली चालना मिळेल. योगकारक शनीची चांगली कृपा राहील. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका.
मिथुन – पैसे खर्च करताना नियंत्रण ठेवा, जास्तीचे पैसे खर्च झाले तर चिडचिड होऊ शकते. कुटुंबासाठी वेळ द्याल, त्यामुळे आठवडा आनंदात जाईल. पर्यटनाला जाण्याचे बेत बनू शकतात. एखाद्या धार्मिक कार्यात रमाल. कामातून समाधान आणि आनंद मिळेल.
कर्क – येत्या आठवड्यात तुमची गाडी रुळावरून घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे काम करताना योग्य ती खबरदारी घ्या. खासकरून जोडीदार, व्यावसायिक यांच्याबरोबर बोलताना योग्य खबरदारी घ्या. अपेक्षेप्रमाणे लाभ होत नसले तरी मिळतंय त्यात आनंद मानून घ्या, खूष राहाल.
सिंह – व्यवसाय करत असाल तर त्यात चांगली प्रगती होऊ शकते. कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचे योग जमून येत आहेत. खूप दिवसांपासून अडकलेले आर्थिक येणे या आठवड्यात हातात पडेल. महिला वर्गाने तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्याची एखादी समस्या निर्माण होऊ शकते, त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या – एखादे शुभकार्य करायचे नियोजन केले असेल तर त्यात अडचण निर्माण होऊ शकते. आर्थिक बाजू चांगली राहील. कामाच्या ठिकाणी पतप्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ खूष होतील आणि एखादे बक्षीस देतील. सामाजिक कामात रस घ्याल. वाहन चालवताना योग्य काळजी घ्या.
तूळ – येत्या आठवड्यात भाग्यकारक घटना घडतील, त्यामुळे मन आनंदी राहील. बोलताना योग्य खबरदारी घ्या, चुकून गैरसमज होऊ शकता. त्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. नोकरी व्यवसायात नवीन संधी चालून येतील.
वृश्चिक – आठवडा आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग संभवतात. घरात बोलताना काळजी घ्या, अन्यथा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि आपल्याही आरोग्याची काळजी घ्या.
धनू – कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मानसिक चिंता वाढू शकते. एखादी घटना मनाविरुद्ध घडेल, त्यामुळं मन अस्थिर होईल. व्यवसायात चढउतार येऊ शकतात. आरोग्याच्या अगदी छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर जरा जपून पावले टाका.
मकर – कोणताही निर्णय घेताना विचार करा. एखादा निर्णय चूकच ठरू शकतो, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. साडेसातीचा काळ सुरू आहे, त्यामुळे प्रत्येक काम करताना खबरदारी घ्या. घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादा नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कुंभ – एखाद्या कारणामुळे कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. कुटुंबात एखाद्या जुना वाद उफाळून येऊ शकतो. त्यामुळे मन शांत ठेवा. देवाचे नामस्मरण करा. गुरु-रवी नवपंचम योगातून नवीन मार्ग दिसेल. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मीन – आध्यात्मिक क्षेत्रात एखादा विलक्षण अनुभूती येऊ शकते. ध्यानधारणा, योगसाधना यामध्ये मन रमवाल. कामाच्या ठिकाणी घाई करू नका, एखादी चूक होऊ शकते. ती महागात पडू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघाताची शक्यता आहे.