• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे…

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 25, 2022
in बाळासाहेबांचे फटकारे
0
बाळासाहेबांचे फटकारे…

शिवसेनाप्रमुखांनी १९७८ साली हे व्यंगचित्र रेखाटलं तेव्हा सत्तापदांवर वेगळी माणसं होती. कायदा-सुव्यवस्था राखणारं पोलीस दल हे अर्थातच सत्ताधार्‍यांना उत्तरदायी होतं, पण सत्ताधार्‍यांचे गुलाम बनलेलं नव्हतं. सत्ताधार्‍यांचा राजकीय दबाव वाढला तर आधी तुम्ही आमच्या अंगावरून उठा, मग आम्ही कायदा सुव्यवस्था आटोक्यात आणू शकतो, असं सांगण्याची हिंमत आणि जरब या दलांमध्ये होती… आज या व्यंगचित्रातल्या पोलीस दलाच्या जागी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, अशी कल्पना करून पाहा… खुद्द बाळासाहेबांनीही आज पार रया गेलेली, जरब हरवलेली, कंबरडं मोडून जमिनीशी समतल झालेली यंत्रणा चितारली असती… सत्ताधार्‍यांनी छूऽऽ असा हुकूम दिला की ते ज्यांच्याकडे बोट करतील, त्यांच्याकडे धावत सुटायचं, त्याला जेरीला आणायचं, त्याच्याकडे काहीही मलिदा मिळाला नाही, तरी त्याला छळत राहायचं, ही या यंत्रणांची कामाची पद्धत बनून बसली आहे… नंतर कोणत्या ना कोणत्या पदाची, निवडणुकीतल्या तिकीटाची बोटी मिळण्याच्या आशेने लाळ गळत असलेल्या यांच्या तोंडातून सत्ताधार्‍यांना बाणेदारपणे ठणकावणारे शब्द निघण्याची तर अपेक्षाच व्यर्थ!

Previous Post

कुंपणावरून…

Next Post

दिवाळी अंकांतील खिडक्यांचा चावट चित्रभ्रम!

Next Post

दिवाळी अंकांतील खिडक्यांचा चावट चित्रभ्रम!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.