• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

    काँग्रेस कमबॅक करणार?

    विधानसभा जिंकल्या तरी लोकसभेची वाट खडतरच!

    श्रेय खेचण्याच्या हव्यासाची परिणती!

    चुनाव है तो मुमकिन है!

    चुनाव है तो मुमकिन है!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

  • भाष्य

    ‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

    कर्जबुडव्यांचे काय करायचे?

    ५०० डॉलरचे शूज!

    नाय, नो, नेव्हर…

    पत्रकार, ढाब्यावर या!

    आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

    Trending Tags

  • मनोरंजन

    लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

    मसाला चित्रपट रेसिपी

    ‘बँडिट क्वीन’ जिवंत आहे!

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

    काँग्रेस कमबॅक करणार?

    विधानसभा जिंकल्या तरी लोकसभेची वाट खडतरच!

    श्रेय खेचण्याच्या हव्यासाची परिणती!

    चुनाव है तो मुमकिन है!

    चुनाव है तो मुमकिन है!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

  • भाष्य

    ‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

    कर्जबुडव्यांचे काय करायचे?

    ५०० डॉलरचे शूज!

    नाय, नो, नेव्हर…

    पत्रकार, ढाब्यावर या!

    आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

    Trending Tags

  • मनोरंजन

    लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

    मसाला चित्रपट रेसिपी

    ‘बँडिट क्वीन’ जिवंत आहे!

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

पुन्हा जिवाची गौहाती

- टोक्या टोचणकर (टोचन)

Nitin Phanse by Nitin Phanse
November 24, 2022
in टोचन
0

गौहाती हे तसे निसर्गरम्य ठिकाण. शिवसेनेच्या गद्दार आमदारांमुळे ते प्रसिद्धीस आले. कारण त्यापूर्वी मी आणि माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या आम्ही बिझनेसच्या कामामुळे अनेकदा तिथे गेलो आहे. परंतु दाढीवाल्यांनी आणि फडणवीसांनी शहा आणि मोदी यांची परवानगी आणि मदत घेऊन अलिबाबाच्या चाळीस चोरांची सफर तिथे घडवून आणली, तेव्हापासून ते गौहाती जास्त प्रसिद्धीस आले. तिथे मानपान आणि देण्याघेण्याचे व्यवहार झाल्यावर सर्वांनी मनसोक्त खाण्यापिण्याची आणि नागीन डान्ससदृष्य नाचाची मजा लुटल्यावर सगळे सुखाच्या वर्षावात न्हाऊन निघाले. त्याच्या रसभरीत बातम्या वृत्तपत्रात आल्या. त्यानंतर टायरमध्ये हवा भरून त्यांना भरपूर आत्मविश्वास देण्यात आला. उद्धवसाहेबांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे सरकार पाडणे ही काळाची गरज आहे व यात आपला, यापूर्वी कधीही झाला नसेल एवढा, भरघोस आणि दामतिप्पट-चौपट फायदा आहे. त्याशिवाय आपल्यातील जवळजवळ सर्वांनाच मंत्रिपदाचा लाभ मिळेल आणि सर्वांची सरकारी बंगल्यात सोय होईल, अशी लालूच त्यांना दाखवण्यात आली. एवढा प्रचंड लाभ मिळणार हे ऐकून सार्‍यांना हर्षवायूच झाला. त्याशिवाय दाढीवाल्यांनी आपल्या पाठी प्रचंड मोठी महाशक्ती आहे, असे सांगत त्यांचे ब्रेनवॉशिंग केल्यावर तर त्यांनी भरपूर पिऊन सेलिब्रेशन करत एकमेकांना मिठ्या मारल्या. नव्या जोमाने आणि उत्साहाने त्यांनी गोवामार्गे मुंबईला प्रस्थान केले. दाढीवाल्यांनी लांडीलबाडी करून शिवसेनाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांशी साटेलोटे करून भाजप आणि दाढीवाले गटाचे सरकारही बनविले. गद्दार आमदार गब्बर झाले होते. तरी एकमेकांचे पाय खेचण्याची आणि मंत्रिपदे लाटण्याची शर्यत सुरूच आहे.
एवढे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे, काही गोष्टी विसरता न येण्यासारख्या असतात. त्या मनात घर करून बसतात. महिने गेले, वर्षे गेली तरी त्या आठवणींनी मनात गुदगुल्या होतात. त्यातून त्या प्रेयसीच्या आठवणी असल्या तर! अशाच आठवणीने दाढीवाले आणि त्यांचे ते गद्दार आमदार यांचे मन अस्वस्थ झाले होते. भाजपचे माजी नेते आणि आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांनी गद्दारांची व्यथा मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली गावातील सभेत मांडली. त्या गद्दारांनी दाढीवाल्यांकडे काही दिवसांपासून सकाळ, संध्याकाळ, रात्री तगादाच लावला की आम्हाला पुन्हा गौहातीला घेऊन चला, नाहीतर आम्ही तुमचा पाठिंबा काढून घेऊ. मग दाढीवाल्यांचा नाईलाज होता. खडसे म्हणाले, दगडाचे काळीज असलेल्या या आमदारांच्या काळजाला अचानक पाझर फुटला आणि प्रेयसीच्या त्यावेळच्या सहवासाने पुलकित व्हावे, म्हणून पुन्हा आम्हाला गौहातीला घेऊन चला असा हट्ट त्यांनी दाढीवाल्यांपाठी धरला. दाढीवाल्यांनी नेहमीप्रमाणे मध्यरात्री फडणवीसांना फोन लावला. आपले बंडखोर आमदार पुन्हा गौहातीला जाऊया म्हणून हट्ट धरून बसले आहेत. त्यापैकी काहींनी अन्नपाणीही सोडले आहे. काहींनी मंत्रालयातून उड्या मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत तर काहींनी पुन्हा उद्धवजींबरोबर जाण्याची तंबी दिली आहे. त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर आपल्या खुर्च्या जाऊ शकतात, सरकार पडू शकते.
त्यावर फडणवीस म्हणाले, खुश्शाल त्यांना गौहातीला घेऊन जा. तेव्हा ते खूप टेन्शनमध्ये होते. आता ती परिस्थिती नाही. आम्ही दिल्लीहून रसद मागवतो, पण त्यांना नाराज करू नका. त्यांना तिथे काय हवे ते करू द्या. पूर्वीचेच हॉटेल बुक करा. जुन्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे. तिथे संशय घ्यायला जागा नाही. वाटल्यास आपण त्यांचे तिथे पुन्हा ब्रेनवॉशिंग करू. वाटल्यास मी अमित शहाजींना घेऊन येईन. तिथे त्यावेळी एकाच आमदाराला कविला स्फुरल्या होत्या. यावेळी तुम्ही रसपानाचा कार्यक्रम झाल्यावर फक्त बघत राहा. तुमच्यासकट सगळे कविता करू लागतील, डान्स करू लागतील. नाचो, कुदो, ऐश करो असा माहौल तयार होईल. त्यातून आपली सर्वांची मैत्री अधिक घट्ट होईल. मात्र आता तिथे पूर्वीपेक्षा जास्त छुपे व्हिडिओ कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि ते चित्रणही दिल्लीत मोदी-शहांना दिसते, अशी व्यवस्था आहे. तरीही तुम्हा सर्वांना सर्व माफ आहे. तेवढे आम्ही भाजपवाले उदार आहोत.
हे ऐकून दाढीवाल्यांचा जीव भांड्यात पडला आणि त्यांनी ताबडतोब गद्दार आमदारांना आणि मंत्र्यांना या सहलीची बातमी दिली. वृत्तपत्रात आणि चॅनेल्सवरून ही बातमी व्हायरल झाली आणि पोक्याही कामास लागला. त्याच्याकडे प्रत्येक गद्दार आमदाराच्या तिथे गेल्यावर काय अपेक्षा आहेत याची मुलाखतवजा नोंद ठेवण्याची जबाबदारी मी वरिष्ठांच्या सांगण्यावरून दिली होती. त्याप्रमाणे त्याने कामाला सुरुवात केली. काहींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, तर काहींनी चक्क इथे ज्या सांगता येणार नाहीत अशा मागण्या केल्या. सभ्य वाटणारे हे आमदार इतके हपापलेले आहेत असे वाटले नव्हते, असे नंतर पोक्या मला म्हणाला. मी म्हणालो, जाऊ दे रे. जिवाची गौहाती करायला चाललेत ना, जाऊ देत. मात्र दाढीवाल्यांना अडचणीत आणू नका, असा त्यांना कीर्तिकरांचा निरोप दे एवढेच.
प्रत्येक गद्दार आमदार गौहातीला जाण्याची स्वप्ने पाहात असतानाच आपण आजपर्यंत शिवसेनेच्या जिवावर आणि नावावर काय आणि किती कमावले याचेही हिशेब करत होता. उद्या हे सरकार पडले तर आपली स्थिती ‘न घर का ना घाट का’ अशी होईल, याची जाणीवही त्यांच्या मनाला बोचत होती. रात्री सुखाची निवांत झोप लागत नाही, ही तर प्रत्येकाची तक्रार होती. ज्या उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बाळासाहेब गेल्यानंतरही धडाडीने काम केले, ते एका दाढीवाल्याच्या मानभावी कटकारस्थानामुळे आपण आपल्या खर्‍या नेत्याला विसरून त्याच्याशी दगाबाजी केली. बाळासाहेबच काय, कुठलाच देव आणि देवता आपल्याला क्षमा करणार नाही. ज्या शिवसेनेने अनेक दगडांना देव बनवले त्यापैकीच आपण होतो. ज्यांच्याकडे पोटाला अन्न नव्हते, नोकरी नव्हती, पुरेसा निवारा नव्हता, काही तर चाळीत वा पत्र्याच्या घरात राहात होते त्यांच्याकडे नगरसेवकपद, आमदारपद आल्यावर त्यापैकी अनेकजण कसे करोडपती झाले, बिल्डर झाले, बिझनेसमन झाले, हे सार्‍या जगाला माहीत आहे. ही झाकली मूठ सरकार पडल्यावर उघड झाली तर हा प्रश्न गद्दारांना पडला आहे. तिथल्या सुरस कथा ऐकायला मिळतीलच!

Previous Post

भविष्यवाणी (२६ नोव्हेंबर)

Next Post

नाय नो नेव्हर…

Related Posts

टोचन

व्यंगाचं बिंग फुटणारच!

October 6, 2023
टोचन

आजचं मरण उद्यावर!

September 29, 2023
टोचन

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023
टोचन

टेन्शन त्रिक टेन्शन

September 15, 2023
Next Post

नाय नो नेव्हर...

२७ वर्षे गवत उपटले का?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023

कर्जबुडव्यांचे काय करायचे?

December 7, 2023

नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

December 7, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.