गेल्या काही काळात भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे ट्रोल यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये असा कांगावा केला जातो की भाजप हाच कसा शिवसेनेचा नैसर्गिक जोडीदार होता आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेने भाजपबरोबर युती तोडणे कसे आवडले नसते, हा कसा बाळासाहेबांच्या विचारांबरोबर द्रोह आहे… उद्या कोणी तुमच्यापुढे असं तोंड उचकटलं तर बाळासाहेबांच्याच कुंचल्यातून १९८५ साली म्हणजे तब्बल ३८ वर्षांपूर्वी उतरलेलं हे मुखपृष्ठ त्यांच्या मुखरूपी पृष्ठावर फेका आणि त्यांना सांगा, बाळासाहेब तुम्हाला तेव्हापासून नीट ओळखून होते. तेव्हा हिंदुहिताचा व्यापक विचार मनात धरून तुम्हाला त्यांनी सोबत घेतलं होतं. तुमची औकात तेव्हाही त्यांना माहिती होती आणि या जळजळीत व्यंगचित्राच्या रूपाने ती तुम्हाला खुद्द बाळासाहेबांनीच दाखवली होती… तेव्हाही शिवसेनेच्या हातात मशाल होती, हा विलक्षण योगायोग आहे, तो दैवी संकेत आहे… सत्ता, सत्ता, सत्ता, अशी खायरी सुटलेल्या या भाजपरूपी भस्मासुराला भस्म करण्याचं राष्ट्रकार्य शिवसैनिकांच्या हातात नव्हे, हृदयातही धगधगत असलेली मशालच करणार आहे… कमळाभोवती जमलेली ४० चिलटंही त्यात जळून खाक होणार आहेत…