अशी आहे ग्रहस्थिती
राहू-हर्षल मेषेत, मंगळ वृषभेत, शुक्र- सिंहेत, बुध (अस्त) वक्री, रवि – कन्येत, केतू- तुळेत, शनि-प्लूटो (वक्री)- मकरेत, गुरु आणि नेपच्युन (वक्री), मीन राशीत, २५ सप्टेंबर रोजी शुक्र कन्येत, २८ सप्टेंबर रोजी बुध उदय, चंद्र- सिंहेत, त्यानंतर कन्या, तूळ आणि वृश्चिकेमध्ये. दिनविशेष – २५ सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावस्या, (सर्वपित्री अमावस्या), २६ सप्टेंबर रोजी घटस्थापना. शारदीय नवरात्र आरंभ.
मेष – आपल्याला येत्या काळात काही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. सप्तमेश शुक्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण हे महिलांना त्रासदायक ठरू शकते. गुरुकृपा चांगली राहील, त्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. २५ सप्टेंबर रोजी होणारा रवि-बुध-शुक्र युतीयोग यामुळे तुमची सर्वच पातळीवर उत्तम स्थिती राहू शकते. शिक्षक, लेखक, पत्रकार या मंडळींना चांगले दिवस अनुभवयास मिळतील. विशेष म्हणजे भाषांतरकार, प्रवक्ता, छापखाना चालवणारी मंडळी यांना चांगला लाभ मिळू शकतो. कला क्षेत्रात काम करणार्या मंडळींना मान सन्मानाचे योग जुळून येतील. आठवडा यश देणारा राहील.
वृषभ – खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी याचा अनुभव तुम्हाला या काळात येईल. कला, नृत्य, गायन, खेळ या क्षेत्रात असणार्या मंडळींसाठी येणारा काळ उत्तम राहणार आहे. कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते, त्याचा भविष्यात चांगला फायदा होईल. आपली अडकलेली कामे आता झटपट मार्गी लागतील. संततीकडून चांगली कामगिरी होईल. शिक्षणात चांगली यश प्राप्ती होईल. रवि-बुध-शुक्र आणि मंगळाचा नवपंचमयोग त्यामुळे अनपेक्षित लाभाच्या घटना घडतील. अनेक प्रकारचे शुभ लाभ मिळवून देणारा काळ राहणार आहे.
मिथुन – मनातल्या सर्वच अपेक्षांची पूर्तता होणारा काळ येत आहे. बुधाचे सुखस्थानातील भ्रमण सोबत रवि-बुध-शुक्र-गुरु दृष्टी योगात त्यामुळे आगामी काळात तुमच्या अपेक्षा वाढीस लागलेल्या दिसतील. अमावस्येच्या नंतर शुभ घटनांची रांग लागलेली पाहायला मिळेल. वास्तूच्या बाबत अडकून राहिलेले प्रश्न मार्गी लागतील. नव्या वाहन खरेदीचा योग जामून येत आहे. राजकीय क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी उत्तम आठवडा राहणार आहे. शनि-मंगळाचा विपरीत राजयोग त्यामुळे कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल, प्रशंसा होईल. कर्जाचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरीच्या निमित्ताने परदेश प्रवास करावा लागू शकतो.
कर्क – या ना त्या कारणामुळे अनेक दिवसांपासून काही कुरबुरी सुरु असतील तर त्या आता थांबतील. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी आपण एक दबदबा निर्माण कराल. आपण दिलेल्या सल्ल्याची योग्य ती दखल घेतली जाईल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. कामाच्या निमित्ताने अथवा अन्य कोणत्या कारणाच्या मुळे लहान प्रवास घडतील. संततीच्या संदर्भात चांगली बातमी कानावर पडेल. नवदाम्पत्य मंडळींसाठी चांगला काळ राहणार आहे. कुटुंबासाठी भरपूर वेळ द्याल, त्यांच्यासाठी पैसे खर्च होतील.
सिंह – नवीन संकल्पना समोर येतील. त्यामध्ये आपल्या बुद्धीचा वापर करून चांगले पैसे मिळवण्याची संधी चालून येईल. अनपेक्षित लाभाचे योग जुळून येत आहेत. आपले ध्येय साध्य करण्यासाठी अनुकूल काळ राहणार असला तरी समय से पहले आणि भाग्य से जादा कुछ मिलता नहीं हे लक्षात ठेवा म्हणजे झाले. जमिनीचा व्यवहार करणारी मंडळी, शेती उत्पादक या मंडळींना चांगला काळ रहाणार आहे. उत्तम लाभ मिळतील. कुटुंबासाठी पैसे खर्च कराल. एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून चांगला लाभ होईल, मान सन्मान मिळेल. सरकारी क्षेत्रात काम करणार्या मंडळींच्यासाठी उत्तम काळ राहणार आहे.
कन्या – येत्या आठवड्यात कोणताही निर्णय घेण्याची गडबड करू नका, ते महागात पडू शकेल. मन शांत ठेवा आणि मगच कृती करा, म्हणजे कुठेही फसवणूक होणार नाही. पंचमात असणारा वक्री शनी हा संततीबाबत अपयश दर्शवितो आहे. शिक्षण क्षेत्रात अडचणी येतील. २४ आणि २५ तारखेला चैन मौजमस्तीवर पैसे खर्च होतील. कोर्ट-कचेरीच्या कामात अपयश मिळू शकते. त्यामुळे नाराज होऊ नका. सकारात्मक राहा आणि पुढे चला… शेअर, लॉटरी, सट्टा यापासून दोन हात लांबच राहा.
तूळ – कथाकार, चित्रपट निर्माते, पत्रकार या मंडळींसाठी येणारा काळ हा लाभदायक राहणार आहे. पैसे खर्च करण्याचे प्रमाण वाढलेले दिसेल. खेळणी, प्लास्टिक इंडस्ट्री, सुगंधी द्रव्य अशा वस्तूचा व्यापार करणार्या मंडळींसाठी चांगला काळ राहणार आहे. मोठी उलाढाल होऊ शकते. बँकेत काम करणारी मंडळी, कंपनी सेक्रेटरी यांच्यासाठी चांगला काळ आहे. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. लांबच्या प्रवासाचे योग आहे. नियोजन करा आणि मगच जा, अन्यथा अधिकचे पैसे खर्च होऊ शकतात. २४ ते २६ या तारखेच्या दरम्यान एखादे काम अनपेक्षितपणे मार्गी लाभेल.
वृश्चिक – आगामी अमावस्या ही श्री प्राप्तीची राहणार आहे. पत्नीकडून अनपेक्षितपणे मदत मिळेल. प्रेमी युगुलांसाठी मस्त आठवडा राहणार आहे. प्रेमात यश पदरात पडेल. त्यामुळे आनंदी राहताल. चांगल्या कामासाठी विलंब लागू शकतो. व्यापारात भरघोस लाभ मिळतील. आयात-निर्यात व्यवसायात असताल तर वाटाघाटी सफल होतील. कामाचा ओघ वाढलेला दिसेल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. संततीची कामे बिघडण्याची शक्यता आहे.
धनु – तुम्हाला आगामी काळात सर्वच पातळ्यांवर घवघवीत यश मिळणार आहे. यंदाची दिवाळी तुम्हाला उत्साहाची आणि आनंदाची जाणार आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. एखादी नवी वस्तू खरेदी करण्याचे नियोजन कराल. वाहनांकडून त्रास होण्याचा धोका आहे. जिवलग मित्रांसोबत तू तू मैं मैं होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ झालेली दिसेल. नोकरीत प्रमोशन होईल. शत्रूवर विजय मिळवाल.
मकर – साडेसातीचा काळ सुरु असला तरी कामाच्या ठिकाणी प्रभावी रिझल्ट मिळतील. त्यामुळे मन आनंदी राहील. परदेशात कोणते काम सुरु असेल तर त्यामध्ये २५ आणि २६ तारखेनंतर चांगले यश मिळालेले दिसेल. नवीन व्यवसाय करण्याचे डोक्यात येईल. पण थोडे धीराने घ्या. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार डोक्यात आला तरी विचार करून निर्णय घ्या. भविष्यात चांगला फायदा मिळेल अशाच ठिकाणी पैसे गुंतवा. शेअर बाजारातून चांगला लाभ मिळू शकतो.
कुंभ – आपली आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियोजन कोलमडू शकते. त्यामुळे पैसे खर्च करताना काळजीपूर्वक करा. कर्ज घेण्याचा विचार डोक्यात सुरु असेल तर जरा जपूनच पुढे जा. उधार उसनवारी टाळा. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे थोडे सबुरीने घ्यावे लागेल. मिसकम्युनिकेशनमुळे नुकसान होऊ शकते. घरात पाळीव प्राणी असेल तर तो हरवायची घटना होऊ शकते. जिवलग मित्राबाबत एखादी बातमी कानावर पडू शकते.
मीन – साहित्य, नाट्यप्रेमी, कवी सौदर्य प्रसाधनांचा व्यवसाय करणार्या मंडळींसाठी चांगला काळ राहणार आहे. बंधुवर्गाकडून चांगली मदत होईल. मंगळाची चतुर्थ भावावर दृष्टी त्यामुळे कामाच्या ठिकाणी धावपळ होईल. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खास म्हणजे मामाकडून लाभ होण्याची शक्यता आहे. कामे मार्गी लागतील, त्यामुळे भरपूर नाही पण पोटापुरते मिळेल हे नक्की.