• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

माधवराव पाटणकरांचा सत्यविजय

(प्रबोधन १००)

सचिन परब by सचिन परब
July 21, 2021
in प्रबोधन १००
0

यश मिळो वा अपयश, प्रबोधनकारांचा आत्मविश्वास कधी उणावला नाही. नवनव्या गोष्टी करण्यासाठी ते नेहमीच तयार असायचे. त्यांना आत्मविश्वासाची प्रेरणा देणार्‍यांमध्ये माधवराव पाटणकर हे एक महत्त्वाचं नाव.
—–

मातृदिन सुरू करणा-या श्रीपाद केशव नाईक यांच्याबरोबरच आणखी एका त्याच्यासारख्याच `मुकाटतोंडी’ सामाजिक कार्यकर्त्याची ओळख प्रबोधनकार ‘माझी जीवनागाथा’मध्ये करून देतात. त्यांचं नाव छत्रे मास्तर. उमेदवारीच्या दिवसात प्रबोधनकार गिरगाव चौपाटीवर भाषणं करायचे, तेव्हा या छत्रे मास्तरांशी त्यांची ओळख झाली होती. ते गिरगावातल्या पारशी अग्यारीसमोर एका छोट्या बंगल्यात राहत आणि एका मिशनरी शाळेत शिकवत असत.
या छत्रे मास्तरांचं वर्णन प्रबोधनकार करतात, `देहाने फुटबॉल. माणूस जातिवंत स्वदेशाभिमानी. टिळक पक्षाचा. सगळीकडे खटपटींचा व्याप आणि कोठेच कशात नाही, अशा वृत्तीचा. परिचय झाल्याशिवाय कर्तबगारीचा थांग लागायचा नाही. भलत्या सलत्याला दाराशी उभा करायचा नाही. गोरगरिबांच्या अडचणी मुकाटतोंडी दूर करायचा. उत्साही वक्ते, प्रचारक, उत्सव योजकांना हस्ते परहस्ते मदत करून कार्य करून घ्यायचा.’
लोकमान्य टिळकांनी १९०६ सालचा शिवजयंती उत्सव रायगडावर साजरा करण्याचं ठरवलं होतं. दाजीशास्त्री खरे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यामुळे मुंबईतले टिळक पक्षाचे सगळे पुढारी रायगडावर गेले होते. त्यामुळे मुंबईत शिवजयंती उत्सव साजरा करायला कुणीच नव्हतं. त्यामुळे छत्रे मास्तरांनी ठरवलं की मुंबईत शिवजयंती साजरी व्हायलाच हवी. त्यासाठी ठिकाण ठरलं, शांतारामाची चाळ म्हणजे आजचं बेडेकर भवन आणि झावबावाडीतलं राममंदिर. त्याच्या आयोजनासाठी त्यांनी प्रबोधनकारांना तीन दिवस सोबत घेतलं. सजावट केली. जाहिरात केली. दोघांनी मिळून मोठ्या नेत्यांनी कमतरता जाणवू दिली नाही. कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.
प्रत्यक्ष कार्यक्रमाचं वर्णन प्रबोधनकारांनी `जुन्या आठवणी’ या आणखी एका पुस्तकात केलंय. घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची त्यांची शैली दाद द्यायला हवी अशीच आहे. ते लिहितात, `सभामंडपात एक राजबिंडा पुरुष श्रीरामाच्या मूर्तीकडे तोंड करून उभा होता. मस्तकाला भरजरी हिरव्या रंगाचा फल्लेदार फेटा. अंगात पेशवाई थाटाचा पांढरा अंगरखा. त्यावर रूंद रेशमी लालकाठी उपरणं. पेटी तबल्याच्या साथीवर तो भव्य पुरुष आपल्या मर्दानी गोड आवाजात आणि वीरश्रीच्या हावभावांत शिवाजी महाराजांचा स्वरचित पोवाडा गात होता. आबालवृद्ध स्त्रीपुरुष श्रोते स्वदेशाभिमानाच्या नि वीरश्रीच्या रंगांत अगदी दंग होते. मधून मधून जयघोष होत होते आणि टाळ्या कडाडत होत्या. तसतसा त्याचा आवाज रस्त्यावरच्या लोकांनाही स्पष्ट ऐकू लागला.’
हे वर्णन आहे, पाटणकर संगीत नाटक मंडळीचे मालक माधवराव पाटणकर यांचं. सर्वसामान्यपणे आपल्या माहितीचा संगीत नाटकांचा इतिहास अण्णासाहेब किर्लोस्करांपासून सुरुवात होऊन गो. ब. देवलांभोवती फिरून बालगंधर्वांपाशी थांबतो. त्यामुळे त्या काळात अत्यंत लोकप्रिय आणि कर्तृत्ववान नाट्यकर्मी होऊन गेलेले असूनही ते आजच्या पिढीला माहीत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे माधवराव पाटणकर. प्रबोधनकार सांगतात, माधवराव पाटणकर आणि त्यांचं सत्यविजय नाटक महाराष्ट्रातील रंगभूमीच्या इतिहासात अजरामर आहे. पण, डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या `मराठी नाटक– नाटककार काळ आणि कर्तृत्व’ या मराठी नाटकांचा इतिहास सांगणा-या तीन खंडांमध्ये त्यांचा साधा उल्लेखही नाही. पण प्रबोधनकार त्यांच्या कर्तृत्वाच्या नोंदी करण्याचं काम चोख बजावतात.
प्रबोधनकारांनी लिहिलंय त्यानुसार माधवराव पाटणकरांनी त्यांची नाटक कंपनी २५-३० वर्षं सतत चालवली. `सत्यविजय’ या नाटकाचे त्यांनी हजारपेक्षा जास्त प्रयोग केले. मुंबईच्या पिला हाऊस परिसरात रिपन थिएटरमध्ये त्यांची नाटकं व्हायची. बॉम्बे थिएटरमध्ये स्वदेशहितचिंतक आणि एलफिन्स्टन थिएटरमध्ये किर्लोस्कर मंडळी उतरलेली असायची. त्यांची नाटकं सुरू असूनही पाटणकरांच्या `सत्यविजय’ला हमखास गर्दी व्हायची. त्याचं कारणही प्रबोधनकारांनी सांगितलंय. त्यांची नाटकं बहुजन समाजासाठी असत. त्यांची रचना सोपी आणि रसाळ असायची.
माधवराव उत्कृष्ट कवी होते. त्यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रांत प्रसिद्धही व्हायचं. ते प्रभावी वक्तेही होते. शिवरामपंत परांजपेंसारख्या गाजलेल्या वक्त्यानेही त्यांच्या वक्तृत्वाचा सन्मान केला होता. पण त्यांच्या प्रतिभेपेक्षाही त्यांचा दिलदार दानशूरपणा कायम चर्चेत असायचा. प्रबोधनकारांनी त्याचंही वर्णन केलंय. त्यांची नाटक कंपनी हे एक राजेशाही संस्थानच होतं. त्यांच्यासारखा दानशूर कर्ण नाटक मंडळ्यांच्या क्षेत्रात मी दुसरा पाहिला नाही, असं प्रबोधनकारांनी नोंदवलंय. महाराष्ट्रातल्या अनेक सार्वजनिक संस्थांना माधवराव मदत करत. त्यांच्या कंपनीच्या बिर्‍हाडात अनाथ, अपंग, गरीब यांची गर्दी मदतीसाठी कायम सुरू असे. अनेक नाटक कंपन्याही अडचणीत आल्या की त्यांच्या आश्रयाला येत. ते स्वतःच्या नाटकाचा प्रयोग रद्द करून दुसर्‍या कंपनीला प्रयोग लावू देत. त्या सगळ्यामागे त्यांची दत्तभक्ती होती. ते म्हणत, `आम्ही काय कोणाला देणार? श्री दत्त महाराजांचा मी आहे कोठावळ्या. तेच देतात नि मागायला येतात. तेच देणारे नि घेणारे. मी नुसता निमित्तमात्र.’
माधवराव पक्के महाराष्ट्राभिमानी होते. त्यांना वाटायचं प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असायला हवा. ते वारंवार बोलून दाखवत, `मराठा जाईल तिथे त्याला इतरांकडून सन्मानाची सलामी मिळालीच पाहिजे. अरे, आम्ही श्री शिवरायाचे नाव सांगणारे, श्रीकृष्णाची गीता सांगणारे, जाऊ तिथे विजय आमचाच. सत्कार्याला आत्मविश्वासाने हात घाला, श्रीदत्तमहाराज आपला सत्यविजय करणारच.’ या विश्वासाने त्यांनी सातव्या एडवर्ड राजाच्या दिल्लीतल्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात आपल्या मराठी नाटकांचा तंबू ठोकण्याचं ठरवलं. इंग्लंडात नवा राजा सिंहासनावर आला की त्याच्या राज्याभिषेकानिमित्त दिल्लीत मोठा सोहळा करण्याची पद्धत होती. तसे तीन दिल्ली दरबार भरले. एक १८७७ला, दुसरा १९०३ला आणि तिसरा १९११ला. प्रबोधनकार १९०३च्या दिल्ली दरबारची गोष्ट सांगताहेत. तो तेव्हाचा देशातला सगळ्यात मोठा इवेंट होता. देशभरातले झाडून सगळे राजेमहाराजे, सरकारी अधिकारी याला पोचणार होते. त्यानिमित्त एक मोठं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. त्यात देशभरातले कलावंत, संस्थानिक आणि उद्योजक आपल्या वैभवाचं प्रदर्शन करत होते. त्यात मराठी नाटक असायलाच हवं, असा माधवरावांचा आग्रह होता. पण ते मोठं खर्चिक धाडस होतं.
एखादी मराठी नाटक कंपनीत दिल्लीत नाटक सादर करते, हे पहिल्यांदाच घडत होतं. त्या परप्रांतात मराठी कळणारी माणसंच कमी. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून नाटकाला येणार कोण? पण माधवरावांनी ते धाडस केलं. पहिल्या प्रयोगाच्या रात्री सगळी तयारी झाली. एकही प्रेक्षक नव्हता. तरीही माधवराव नाराज झाले नाहीत. त्यांनी सहकार्‍यांना सांगितलं, `पाटणकर कंपनीचा खेळ कधी बंद पडत नसतो. ठेवा शिवरायाची आणि दत्त महाराजांची मूर्ती रिझर्व खुर्चीवर. तिथे आरती करा. तिसरी घंटा ठोका आणि महाराजांच्या जयजयकारात करा नाटकाला सुरुवात.’ तंबू पूर्ण रिकामा होता, पण खेळ मात्र नेहमीसारखाच रंगला. हे फक्त पहिल्या रात्री नाही, तर तीन रात्री सुरू राहिलं. माधवरावांचा आत्मविश्वास ढळला नव्हता.
चौथ्या रात्री चमत्कार झाला. ग्वाल्हेरचे राजे माधवराव शिंदे प्रदर्शनात फिरत होते. त्यांनी पाटणकरांचा तंबू पाहिला. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी चौकशी केली. आणि बघण्यासाठी तंबूत डोकावले. पाहतात तर तंबू रिकामा. शिवाजी महाराजांची आणि दत्तात्रयांची मूर्ती समोर ठेवून माधवराव पाटणकर तानांवर ताना घेत आहेत. शिंद्यांना कौतुक वाटलं. त्यांनी पुढची रात्र खास खेळ ठरवला. दरबारासाठी आलेल्या सगळ्या मराठी मंडळींना निरोप गेले. दुसरे राजे आणि सरदार सोबत घेऊन अलिजाबहाद्दर शिंदे अगदी वेळेवर प्रयोगासाठी आले. खेळ रंगणारच होता, तसा रंगला. शिंदे सरकार खूष झाले. त्यांनी पाटणकर मंडळींना ग्वाल्हेरच्या दौर्‍याचं निमंत्रण दिलं.
माधवराव पाटणकरांच्या आत्मविश्वासाला मिळालेलं ते मोठंच यश होतं. ते सहकार्‍यांना म्हणाले, `समजलात आता. माणसाने कर्तृत्वाचा अभिमान टाकला तर श्रीदत्त महाराज त्याचे काही उणे पडू देत नाहीत. दिल्लीचे धाडस आणि त्यांचे नि शिवरायांचे नाव घेऊनच केले. ते त्याच परमेश्वराने पार पाडले. आता बांधा बिछायती नि चला ग्वालेरीला.’
कोणाचाही पाठिंबा नसताना प्रबोधनकारांनी प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने केली. कधी यशस्वी झाले तर कधी अपयशी. पण त्यांचा आत्मविश्वास कधी उणावला नाही. माधवराव पाटणकरांसारखे आदर्श कायम त्यांच्या सोबत राहिले असतील. म्हणूनच आयुष्याच्या साठीनंतर आठवणी लिहिताना अशा आत्मविश्वासाच्या कहाण्या आपसूक लिहिल्या गेल्या असतील.

(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)

Previous Post

मानसशास्त्र शिका, मन कणखर बनवा

Next Post

थोडा है… थोडे की जरुरत है

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post

थोडा है... थोडे की जरुरत है

कोविडपेक्षा पोस्ट कोविड जड!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.