ग्रहस्थिती : बुध वृषभ राशीत, मंगळ, शुक्र कर्केत, केतू तुळेत, हर्षल, राहू, गुरु मेष राशीत, नेपच्यून मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : २६ जून रोजी दुर्गाष्टमी, २९ जून रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद.
मेष : नोकरदारांना शुभवार्ता कळतील. रखडलेले काम पूर्ण होईल. आर्थिक व्यवहारात सावध राहा. कुटुंबात भांडण होईल, त्याकडे लक्ष द्या, उगाच ताणू नका. मानसिक अस्वस्थता निर्माण होईल. व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांनी आरोग्य सांभाळावे. कामाच्या ठिकाणी कमी बोला, काम मार्गी लावा. आध्यत्मिक क्षेत्रात मन रमवा.
वृषभ : कुणाचे मन दुखावू नका. कशातही गुंतून राहू नका. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडल्याने कामात मन रमणार नाही. कामाशी काम ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासाठी वेळ द्याल. दाम्पत्यजीवनात सुख मिळेल. संततीकडून शुभवार्ता कानी पडेल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील.ज्येष्ठांची काळजी घ्या. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेमप्रकरणात वाद विकोपाला जाऊ देऊ नका. सामाजिक जीवनात जपून वावरा. वाद टाळा.
मिथुन : एखाद्या लहान गोष्टीमुळे डोके खराब होऊ शकते, मन शांत ठेवा. पक्के केलेले ध्येय पूर्ण होईल. व्यावसायिकांना धावपळ करावी लागेल. त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. नोकरदारांवर नवीन कामाची जबाबदारी येऊ शकते, त्याचा भविष्यात फायदा होईल. कोणामध्ये मध्यस्थी करणे, सल्ला देणे टाळा. मोठा खर्च उद्भवू शकतो, पैशाचे नियोजन करा. सट्टा, लॉटरी, शेअरमधून तोटा होऊ शकतो, प्रेमप्रकरणात परिस्थिती व्यवस्थित हाताळा.
कर्क : शुभघटनांचा अनुभव मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरीत काही बदल स्वीकारा, त्याचा फायदा होईल. बदलीचे योग आहेत. भागीदारीत किरकोळ वाद होतील. सरकारी काम पूर्ण होईल. कोर्ट-कचेरीच्या कामात विलंब होईल. कलाकार, संगीतकार, क्रीडापटूंना मान-सन्मान मिळेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी टाळा. अचानक धनलाभामुळे मौज-मजेवर पैसे खर्च कराल. राजकीय क्षेत्रात काळ चांगला आहे.
सिंह : घरासाठी वेळ खर्च द्याल. घरी समारंभ होतील. नातेवाईक, मित्रमंडळींची गाठभेट होईल. उधार उसनवारी टाळा. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. युवावर्गाला नव्या क्षेत्रात संधी मिळेल. पैशाचे व्यवहार जपून करा, वाद टाळा. नवीन वास्तू घेण्याच्या विचारांना गती मिळेल. सार्वजनिक जीवनात वाणीवर नियंत्रण ठेवा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. व्यवसायवृद्धी विदेशात करण्याच्या विचाराला गती मिळू शकते. पावसाळी सहल काढाल.
कन्या : त्रासदायक प्रसंगामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. सकारात्मक विचार करा. अति आत्मविश्वास टाळा. चित्रकार, कलाकारांसाठी यशदायक काळ आहे. थकीत येणे वसूल झाल्याने आर्थिक बाजू बळकट होणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीत वरिष्ठांच्या निर्णयाला विरोध करणे टाळा. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल.
तूळ : मनासारख्या घटना घडल्या तरी मर्यादा ओलांडू नका. नवीन नोकरीची संधी येईल. यश मिळेल. व्यसनी मित्रांपासून दूर राहा. काहींना अचानक आर्थिक लाभ होईल. शेअर, सट्टा, लॉटरीमधून नशीब चमकेल. वैवाहिक जीवनात किरकोळ कुरबुरी होतील. जुनाट आजार डोके वर काढेल. महिलांशी बोलताना काळजी घ्या. सरळमार्गी काम करा. व्यवहार चोख ठेवा. सहलीला जाल.
वृश्चिक : मनासारखे काम न झाल्याने तडजोड करावी लागेल. मानसिक स्वास्थ्य जपा. शत्रूकडून त्रास होईल. व्यवसायात धावपळ वाढेल. जनसंपर्क, पत्रकारितेत चांगला काळ. सामाजिक कार्यासाठी वेळ द्याल. दानधर्म होईल. आध्यात्मिक क्षेत्रात वेळ द्याल, मानसिक समाधान लाभेल. नोकरीत लक्षपूर्वक काम करा. चूक महागात पडेल. मित्रमंडळींना सल्ले देणे टाळा. राजकीय क्षेत्रात पद. प्रतिष्ठा मिळू शकते.
धनु : शिक्षणक्षेत्रात चांगला काळ. उच्चशिक्षणासाठी प्रयत्नशील विद्यार्थ्यांना यश मिळेल. गुरुकृपेमुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. जुन्या ओळखींमधून लाभ होईल, अडकलेले काम मार्गी लागेल. अचानक एखादी शुभवार्ता कळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. काहींना संसर्गजन्य आजाराचा त्रास होईल. व्यवसायात पैशाचे योग्य नियोजन करा. बँकेचे कर्ज मंजूर होईल. येणे वसूल होईल. आर्थिक बाजू बळकट राहील. वायफळ खर्च टाळा.
मकर : आठवड्याची सुरूवात कंटाळवाणी होईल. कामानिमित्त बाहेरगावी जाल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. मामा-मावशींची मदत होईल. बंधूच्या तब्येतीची तक्रार निर्माण होईल. मेडिकल, कृषी क्षेत्रात काळ उत्तम आहे. कानाचे, पायाचे दुखणे उद्भवू शकते. नोकरीत प्रमोशन होईल. समाजसेवेसाठी वेळ खर्च होईल. आध्यात्मिक सहलीमुळे मानसिक समाधान मिळेल. तरुणांच्या नव्या संकल्पनांचे व्यवसायात रूपांतर होईल.
कुंभ : अडकलेली कामे मार्गी लागतील. काहींचे प्रमोशन, तर काहींच्या बदलीचे योग आहेत. व्यवसायात अडचणी येतील. ज्येष्ठांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. शुभघटनांमुळे आनंदाचे वातावरण राहील. मित्रमंडळींची टिंगल टवाळी करू नका, गैरसमज टाळा. धार्मिक कार्यासाठी वेळ आणि पैसे खर्च कराल. मानसिक समाधान मिळेल. घरातले वातावरण बिघडू देऊ नका, थोडे होम मिनिस्टरच्या म्हणण्याप्रमाणे घ्या. महागडी वस्तू खरेदी कराल.
मीन : संमिश्र घटनांचा काळ आहे. प्रवासात विचित्र अनुभव येतील. सावधानता बाळगा. नोकरीत बॉस कामावर खूष राहील. कामानिमित्ताने विदेशात जावे लागू शकते. संशोधकांसाठी काळ उत्तम राहील. प्रेमी युगुलांसाठी चांगला काळ. नवीन गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. खात्रीशीर ठिकाणी गुंतवणूक करा. भविष्यात रिटर्न चांगले मिळतील, खिशात चांगले पैसे राहतील. भावनिक गोष्टींमध्ये अडकून राहू नका, मनस्वास्थ्य जपा.