• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रेक्षकच कपाळकरंटे!

मालिकाकर्त्यांना काय नावं ठेवायची?

आनंद शितोळे by आनंद शितोळे
April 22, 2021
in सिनेमा
0
प्रेक्षकच कपाळकरंटे!

(स.न.वि.वि.)

‘जय मल्हार’, ‘बाळूमामा’, ‘ज्योतिबा’ आणि इतर अनेक वेगवेगळे बाबा, बुवा यांच्या मालिका मराठीत आणि प्रादेशिक भाषेत जवळपास प्रत्येक वाहिन्यांवर सुरू आहेत. पुराणात जशी त्या त्या देवतेची अफाट स्तुती केलेली असते. त्या नायक नायिकेच्या भक्ताची एक कथा चार पाच एपिसोड पाणी घालून पातळ करून करून वाढली जाते. या मालिकांचा प्रेक्षकवर्ग ज्येष्ठ नागरिक, त्यात विशेषकरून महिला मंडळ असतंय.
हा एक सुनियोजित प्रकल्प आहे. जास्तीत जास्त धार्मिक गोष्टी, कथा यांच्यामुळे लोकांचा कर्मकांड, पूजापाठ याकडे ओढा टिकून रहावा आणि घरातल्या ज्येष्ठांवर त्याचा पगडा असेल तर आपसूकच सगळ्या घराला त्याच दावणीला बांधल जातं. याचा एक थोडासा वेगळा भाग म्हणजे जिवंत असलेल्या वेगवेगळ्या कीर्तनकार-प्रवचनकार मंडळीचे आलेले उदंड पीक.
यांच्या प्रवचनाचे विषय भागवतधर्म, विठ्ठलभक्ती सोडून सगळे काही असतात, रामतीर्थकर बाईंचे हे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत, जिथे टीव्हीवर यांना कुठल्या तरी देशाबद्दल, धर्माबद्दल द्वेषमूलक बोलायला लाज वाटत नाही.भाळी लावलेला बुक्का नेमकं कसलं प्रतिक आहे आणि विठ्ठलाच्या नावाने, ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने गजर करताना त्यांच विश्वात्मक पसायदान विसरून किती कोत्या मनाचे आणि कुपमंडूक झालोय याचीही लाज वाटत नाही. हे टिपिकल अजेंडा राबवणारे भामटे यांना टीव्हीवर संधी देणारे यांचेच भामटे साथीदार.
कौटुंबिक मालिकांच्या नावाने जे काही दळण दळतात ते म्हणजे कोणत्या वाहिन्यांत जास्त अक्कलशून्य लोकं भरलीत आणि त्यांची प्रतिभा किती हलक्या दर्जाची आहे, ‘मागणीनुसार पुरवठा’ या गोंडस आवरणाखाली कोण किती जास्त विष समाजात भिनवतो त्याची स्पर्धा.
यांचे लेखक आणि दिग्दर्शक नेमके कुठून शिकून आलेले असतात आणि यांच्या टीमला ‘क्रिएटीव्ह टीम’ म्हणायला कुणालाच शरम वाटत नाही हे आणखी थोर.
अतिशय वेगळ्या, सुंदर विषयाला ज्याची मांडणी नीट केली तर मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करता येतील त्या विषयांची माती करून वळणाच्या पाण्याला गटारीत कसं न्यायचं हे यांच्याकडून शिकावं.
काळ्या रंगाच्या व्यक्तीला करावा लागणारा संघर्ष, एखाद्या कुटुंबात नवरा, त्याच कुटुंब कमी शिकलेल आणि बायको जास्त शिकलेली, एकल पालकत्व हे विषय चांगल्या पद्धतीने हाताळले तर सकारात्मक संदेश देणारी मालिका, इतरांना स्फूर्ती देणारी मालिका निर्माण होईल, पण ही गाबडी त्याच विषयाला टिपिकल सासू-सुनेच्या एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या याच गाळात सगळी मालिका नेऊन सगळ्या विषयाचा चिखल घालून ठेवतात.
यातली कटकारस्थानं म्हणजे जणू प्रत्यक्षातल्या सासू-सुनांना सुरु केलेले ट्रेनिंग सेंटर वाटावेत इतक्या तपशिलात कुणाला तरी खड्ड्यात घालायला केलेल्या कटाचे सीन दाखवले जातात. जणू जन्माला आलेली प्रत्येक स्त्री निव्वळ कट करायलाच जन्माला आलेली आहे.
आणि प्रत्येक मालिकेतलं मुख्य पात्र म्हणजे अक्कल गहाण ठेवून वागणारी माणसं, कुणीही त्यांना मूर्ख बनवतं आणि ते बनतात, डॉक्टर असलेल्या माणसाच्या घरात नुसती चक्कर आली म्हणून बाई गर्भार राहिली म्हणून लोक उड्या मारायला लागतात किंवा आपल्या बायकोला होणारं बाळ कुणाचं आहे याची डीएनए टेस्ट करावी याचं साधं लॉजिक या कथित हास्पिटल वाल्याला कळू नये, अरे नाट्य निर्माण करायला लिबर्टी घेणार म्हणजे किती? बघणार्‍या लोकांचा मेंदू अजूनही बाळूत्यात आहे असं समजतात का ही लेखक मंडळी?
बरं या सगळ्या सिरीयलमधली पात्रं जी भाषा बोलतात त्याचा आणि सिरीयलच्या कथेचा, स्थळाचा काडीमात्र संबंध नसतो. ग्रामीण भाषा, बोलीभाषा म्हणजे नेमकं काय याचं आकलन नसलेली लोक सगळा विस्कोट करून टाकतात आणि कलाकारसुद्धा निव्वळ पाट्या टाकत वाचलेले संवाद म्हणतात. धड ग्रामीण नाही, धड शहरी नाही असल्या भाषा, हेल काढून बोललं की ग्रामीण भाषा झाली एवढ तुटपुंजं आकलन दिग्दर्शक आणि कलाकारांचं असावं?
आणि अजून एक गंमत म्हणजे ही सगळी तथाकथित क्रिएटीव्ह टीम महादरिद्री, अकलेची दिवाळखोर असते. यांच्या लेखी महाराष्ट्र म्हणजे पुणे-मुंबई-नाशिक. विषय संपला आणि ग्रामीण महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा ऊसाचा शेतीचा भाग, या पलीकडे उर्वरित महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे, तिथली बोलीभाषा, त्याचा लहजा, तिथल्या स्थानिक कथा परंपरा इतक्या वैविध्यपूर्ण आहेत पण हे कपाळकरंटे डोळे उघडून बघतच नाहीत त्याच काय?
आणि का म्हणून सिरीयल बनवणार्‍या लोकांना नाव ठेवायची?
बाबा, बुवा, देवी, देवता यांच्या सिरीयल्स धो धो चालतात आणि राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर, फुले दांपत्य यांच्यावरच्या सिरीयल प्रायोजकत्व नाही म्हणून बंद पडतात? ही अवस्था असेल तर कुठल्या तोंडाने सिरीयल बनवणार्‍या लोकांना नाव ठेवायची? शाहू महाराज, बाबासाहेब, फुले दांपत्य यांच्या जीवनातल्या खर्‍या घडलेल्या घटना इतक्या अद्भुत आणि नाट्यमय आहेत की सरळ काना, मात्रा, वेलांटी न बदलता दाखवलं तरी अतिशय सुंदर मालिका निर्मिती होईल, त्याला आपल्याकडे प्रेक्षक मिळत नाहीत?
घरात टीव्हीच्या डबड्यासमोर बसणारा कोट्यावधी लोकांचा हा वर्ग राजकीयदृष्ट्या मतदार आहे आणि सतत आदळणारं कंटेंट त्याचं मत बनवतं, या बाबी अनेक राजकीय पक्षांच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. त्यांना या अचानक आलेल्या धार्मिक सिरीयलच्या पुराबद्दल काहीच वाटत नाही हेही अवघड.
हे विष किती पिढ्या नासवणार आहे आणि त्याला आपण कसे तोंड देणार आहोत?

Previous Post

शुंभांच्या मेळ्यात दोन नीरो!

Next Post

पत्रकारितेची स्वदेशी सुरुवात

Related Posts

सिनेमा

इतिहासात घडणारा मुळशी पॅटर्न

June 9, 2022
सिनेमा

दिसायला चांगला पण लवचिक!

December 1, 2021
सिनेमा

खवय्यांसाठी खास यूट्यूब चॅनेल : लवंगी मिरची

September 16, 2021
सिनेमा

शब्दांच्या पलिकडल्या आशाताई!

September 2, 2021
Next Post
पत्रकारितेची स्वदेशी सुरुवात

पत्रकारितेची स्वदेशी सुरुवात

कोरोनाविरोधी लढ्यातही महाराष्ट्रच अग्रेसर!

कोरोनाविरोधी लढ्यातही महाराष्ट्रच अग्रेसर!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.