अशी आहे ग्रहस्थिती
राहू-मंगळ-हर्षल मेषेत, शुक्र मिथुनेत, रवि-बुध कर्वेâत, केतू तुळेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु-नेपच्युन मीन राशीत, चंद्र वृषभेत, त्यानंतर मिथुन कर्क आणि सप्ताहाच्या अखेरीस सिंहेत. दिनविशेष – २४ जुलै रोजी कामदा एकादशी, २८ जुलै आषाढ अमावस्या, गुरुपुष्यामृतयोग, २९ जुलै श्रावण मासारंभ.
– – –
मेष – कुशाग्र बुद्धी वापरून महत्वाच्या कामात बाजी माराल. महत्वाकांक्षा वाढेल. राशिस्वामी मंगळ रुचकयोगात. सुखस्थानावर मंगळ आणि वक्री शनीची दृष्टी. आप्तस्वकीयांसोबत कलह निर्माण होतील. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. थोडा थंडा करके खाओ. गुरुबल चांगले राहिल्याने परिस्थितीमधून मार्ग निघेल. जुनी येणी वसूल होतील. प्रवासात नव्या ओळखी होतील. आर्द्रा नक्षत्रातला शुक्र वैवाहिक समस्या निर्माण करेल. नोकरावर विसंबू नका. व्यवसायात अडचणी निर्माण होतील. महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. संततीच्या कार्यात अडथळे येतील. संयम ठेवा.
वृषभ – आर्थिक स्थिती उत्तम राहील. अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. जुने दुखणे पुन्हा उद्भवू शकते. शस्त्रक्रिया देखील होऊ शकते. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. बुधावर शनि-मंगळाची दृष्टी असल्याने मायग्रेन, मेंदूविकार उद्भवू शकतो. संततीस शैक्षणिक कार्य, प्रवास यांत बाधा येईल. कामानिमित्ताने ठरलेले प्रवास लांबणीवर पडतील. व्यावसायिकांना अस्थिरता जाणवेल. २८ तारखेची अमावस्या त्रासाची राहील. अपघात टाळा.
मिथुन – वैवाहिक सौख्यात अडथळा निर्माण होईल, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. मतभिन्नतेमुळे घरात नाराजीनाट्य रंगेल. अमावस्येच्या जवळपास आर्थिक अस्थिरता जाणवेल. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. नोकरीत चांगले लाभ मिळतील. सरकारी कामात अडचण येईल. २४ आणि २५ तारखेला अचानक खर्च वाढल्याने चिडचिड होईल. सहल, गेट टुगेदर, करमणुकीच्या कार्यक्रमावर पैसे खर्च होतील.
कर्क – कार्यक्षेत्रात पडती बाजू सांभाळून घ्या. पुष्य नक्षत्रातील रवि, वक्री शनि यांच्यामुळे अधिकार कमी होऊ शकतात. २८ तारखेची अमावस्या मानसिक चिंता वाढवेल. भाग्यातल्या गुरूमुळे शुभयोग जुळून कामे मार्गी लागतील. संततीसाठी यशप्राप्तीचा काळ आहे. व्यावसायिकांना धावपळ करावी लागेल. बुद्धिबळ, मैदानी खेळांत यश मिळेल. वकिलांसाठी सर्वोत्तम काळ आहे. वक्री शनीची दृष्टी भाग्यावर असल्याने कामात अडथळे निर्माण होतील. गुप्त शत्रू, नोकरांपासून सांभाळा.
सिंह – प्रवासाचे नियोजन विचारपूर्वक करा. रवि व्ययात, शनि मंगळाच्या दृष्टीत. वाहन खराब होईल, दगा देईल. बेजबाबदारपणे वागू नका. डोळ्याचे दुखणे उद्भवू शकते. विदेशातील व्यापाराबाबत नियोजन करताना काळजी घ्या. स्थावर मालमत्तेचे काम करणार्यांना चांगले दिवस आहेत. नव्या वास्तूचा विषय मार्गी लागेल. संततीला शिक्षणात अडचणी येतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी.
कन्या – मानसिक त्रास, निद्रानाशासारखे अनुभव येतील. बुधावर वक्री शनि-मंगळाची दृष्टी रहाणार आहे. पत्रकार, गणितज्ज्ञांना लाभ होतील. कोर्टकचेरीत यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. व्यवसायाच्या संधी चालून येतील. लग्नाची बोलणी फिस्कटतील. वडिलांची काळजी घ्या.
तूळ – निर्णय विचारपूर्वक घ्या. शुक्र भाग्यात, योगकारक शनी सुखस्थानात असल्याने मार्ग सापडत जाईल. संततीसाठी त्रासदायक आठवडा राहील. मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत. नोकरीत चांगले बस्तान बसेल. सप्तमातील मंगळ-हर्षल-राहूचे भ्रमण जोडीदारास त्रासदायक ठरेल. पती-पत्नीत विसंवाद घडतील. षष्ठम भावावर गुरू आणि वक्री शनिची दृष्टी आहे, त्यामुळे पोटाचे विकार होतील. खाणे-पिणे नियंत्रणात ठेवा.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित कराल. सढळ हाताने मदत होईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत बढतीचा योग आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ आहे. पाळीव प्राण्यांपासून नुकसान होईल. पंचमातील गुरू संततीसाठी प्रोत्साहक राहील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. सरकारी कर्मचार्यांनी नियमात राहून काम करावे.
धनु – आगामी आठवडा संमिश्र स्वरूपाचा जाईल. शेतकर्यांसाठी चांगला आठवडा आहे. भाग्येश रवी अष्टम भावात. वक्री शनी मंगळाच्या दृष्टीत असल्याने गैरमार्गाने पैसे कमावण्याचा मोह टाळा. कामाशी निष्ठा ठेवा, नाही तर कायद्याच्या कचाट्यात अडकाल. कोणत्याही कामात बेफिकीर राहू नका. व्यवसायासाठी भागीदार मिळतील. संगीतक्षेत्रातील मंडळींसाठी उत्तम काळ राहील. संपादक, मुद्रक यांची चलती राहील.
मकर – विवाहेच्छुकांसाठी शुभ काळ आहे. घरात वादाचे प्रसंग घडतील. शांत राहा. महिलांना आरोग्याचे त्रास निर्माण होतील. अष्टमेश रवी शनीच्या दृष्टीत असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी अनपेक्षित लाभ मिळतील. जुगारातून लाभ होईल. शनि-मंगळाचा केंद्रयोग अपघाताला निमंत्रण देईल. भावंडांकडून चांगली मदत मिळेल. सुखस्थानातील मंगळ- राहू-हर्षल यांच्यामुळे कौटुंबिक विषयात खोडा निर्माण होईल. कामासाठी संघर्ष करावा लागेल.
कुंभ – लहरीपणामुळे विनाकारण खर्च मागे लागेल. वक्री शनी घनिष्ठा नक्षत्रात, त्याचे व्ययातून होणारे भ्रमण त्यामुळे नोकरीसाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. साडेसाती सुरू असल्याने लहान-मोठे निर्णय विचार करून घ्या. नव्या गुंतवणुकीचा मोह टाळा. अमावस्येच्या आसपास प्रवासात किंमती वस्तू जपा.
मीन – गुरुकृपा चांगली राहिल्याने मनातली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना कामात विलंब होईल. अडकलेले काम मार्गी लागेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. वर्षाविहारासाठी बाहेर जाताना काळजी घ्या. बाहेरचे खाणे-पिणे जरा जपून करा. नोकरीच्या ठिकाणी सबुरीने घ्या.