ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, गुरु वृषभेत, मंगळ मिथुनेत, शुक्र, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्येत, शनि कुंभेत, रवी, बुध, प्लूटो मकरेत. दिनविशेष : २२ फेब्रु. श्री रामदास नवमी, २४ फेब्रु. विजया एकादशी, २५ फेब्रु. भीमप्रदोष, २६ फेब्रु. महाशिवरात्री, २७ फेब्रु. दर्श सुरुवात सकाळी ८.५४ वा., २८ फेब्रु. अमावस्या समाप्ती पहाटे ६.१४ वा.
– – –
मेष : मनासारखी कामे होतील. आर्थिक बाजू चांगली राहील, जुने येणे हातात पडेल. कामातला उत्साह वाढेल. कामाचे वेळापत्रक निश्चित करा. उष्णतेचे विकार त्रासदायक ठरतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत लाभदायक स्थिती निर्माण होईल. अनपेक्षित प्रमोशनचे योग आहेत. सरकारी कामे फटाफट पूर्ण होतील. व्यावसायिकांनी कामात खबरदारी घ्यावी. कडाक्याचे वाद होतील. महिलांशी संवाद करताना काळजी घ्या. खेळाडूंना यशदायी काळ.
वृषभ : मोठा निर्णय घेताना विचार करूनच पुढे जा, घाई करू नका. घरात अचानक खर्च वाढेल. मोहात अडकू नका. तरुणांना यशासाठी अधिक कष्ट करावे लागतील. विज्ञानविषयक व्यवसाय करणार्यांना धनलाभ लाभ होईल. मुलांकडे लक्ष द्या. नोकरीत कामाचे कौतुक होईल. चूक टाळा. नवीन मैत्री करताना काळजी घ्या. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील, त्यामुळे आर्थिक बाजू चांगली राहण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून अडकून राहिलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील.
मिथुन : नोकरी-व्यवसायात हेका सोडा. चुका टाळा. कामासाठी दगदगीचा आरोग्यावर परिणाम होईल. अचानक धनलाभाचे योग आहेत. पण, खर्च करताना काळजी घ्या. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. मित्रांसोबत जेवढ्यास तेवढे ठेवा. घरात मानापमानाकडे दुर्लक्ष करा. तरुणांना विदेशात उच्चशिक्षणाची संधी चालून येईल. जुना आजार पुन्हा डोके वर काढेल. सरकारी नियमात राहूनच काम करा. संशोधक, शिक्षक यांना नव्या संकल्पना सुचतील, त्यामधून चांगले अर्थार्जन होईल. व्यवसायात घवघवीत यश मिळेल.
कर्क : आर्थिक बाजू चांगली राहील. व्यवहार चोख ठेवा. काही ठिकाणी स्पष्ट राहा. नोकरीनिमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाला वेळ द्या. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. तरुणांना नव्या कल्पना सुचतील. सकारात्मकतेमुळे कामे अधिक पूर्ण होतील. रियल इस्टेटमध्ये काम करणार्यांना लाभदायक काळ. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात कटकटी होतील. विदेशातील व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. ज्येष्ठांचे मन मोडू नका. लॉटरी, सट्टा याच्या मोहात पडू नका.
सिंह : नोकरीत कामाचे कौतुक होईल. नवीन कामाची जबाबदारी येईल. प्रवासात प्रकृतीच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात आजारपणामुळे डोकेदुखी वाढेल. घरात मालमत्तेचे प्रश्न चर्चेतून सुटू शकतात. तरुणांचा नवा व्यवसाय मार्गी लागेल. व्यवसायात आवक बेताची राहील. पैसे बेतानेच खर्च करा. पत्नीचे चांगले सहकार्य मिळेल, घरात वातावरण उत्तम राहील. मुलांमुळे वादांना निमंत्रण मिळेल. आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस कंटाळवाणे जातील. शुभघटना कानी येतील. इंजीनिअरना नवीन संधी मिळतील. ध्यानात मन रमवा. फायदा होईल. खूप आत्मविश्वास दाखवत बसू नका.
कन्या : आर्थिक व्यवहारात खबरदारी घ्या. बँक व्यवहारात डोळेझाक करून सही करू नका. आरोग्य बिघडू शकते. व्यवसायात आर्थिक बाजू सांभाळताना कसरत होईल. व्यवसायाच्या बोलण्यांत काळजीपूर्वक पावले टाका. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घ्या. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना खबरदारी घ्या. कामानिमित्ताने प्रवासात डोकेदुखी वाढू शकते. वाहन चालवताना वेगावर स्वार होऊ नका. चुकून अपघाताला निमंत्रण मिळू शकते. एखाद्या ठिकाणी नवीन गुंतवणूक करण्याचा मोह होईल. पण सावध पाऊल उचललेले बरे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, म्हणजे आरोग्य ठीकठाक राहील.
तूळ : आर्थिक बाजू सक्षम होईल, अधिकच्या कामांमधून पैसे मिळतील. मुलांकडून आनंद वाढेल. घरात आनंदोत्सवात जुने मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. व्यवसायात जुनी येणी वसुल होतील. नोकरीत यशाचे शिखर सर कराल. घरात तुमचे म्हणणे मान्य होईल. कामात उत्साह वाढेल. सामाजिक ठिकाणी मानसन्मान मिळतील. कलाकारांसाठी उत्तम काळ आहे. नवीन गुंतवणुकीचा विचार पुढे ढकला. प्रेमप्रकरणात जपून राहा. जुना आजार डोके वर काढेल. घरात शुभकार्य घडू शकते. नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका.
वृश्चिक : भागीदारीत विशेष काळजी घ्या. व्यवहारात काळजी घ्या. खर्च वाढून चिडचिड होईल. सामाजिक क्षेत्रात गौरव होईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडू शकतो. घरात वाद टाळा. व्यवसायवृद्धीच्या विचारात यश मिळेल. आर्थिक बाजू सांभाळताना काळजी घ्या. व्यवसायात अविचाराने निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या नव्या संधी चालून येतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. नवीन वास्तू घेण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल. जुनी गुंतवणूक लाभ देईल. बोलताना काळजी घ्या.
धनु : नातेवाईक व मित्रांशी जुळवून घ्या. व्यवसायात वाद घडतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरीत सावध राहा. अहंकार दूर ठेवा. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आध्यात्मिक उपक्रमातून समाधान मिळेल. मित्रमंडळींसोबत सहलीला जाल. अल्प यशामुळे हुरळून जाऊ नका. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. घरात टोकाची भूमिका घेणे टाळा. मन प्रसन्न होईल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. मुलांची शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल.
मकर : जुनी कामे पूर्ण होतील. सरकारी कामे पुढे सरकतील. नोकरीत चंचलपणा टाळा. शिक्षणक्षेत्रात चांगली बातमी कळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात जपून पावले टाका. नोकरीत अडचणी येतील. टेन्शन घेऊ नका. एकाग्रता ठेवा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संगीतकार, कलाकारांना नव्या संधी मिळतील. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मित्रांशी वाद टाळा. ज्येष्ठांचा सल्ला माना. उधार उसनवारी नकोच. खर्चाला कात्री लावा. अति आत्मविश्वास टाळा.
कुंभ : कामासाठी भ्रमंतीचा आरोग्यावर परिणाम होईल. मित्रमंडळींशी जमवून घ्या. तरुणांना सुखाचा, इच्छापूर्तीचा काळ. भाग्योदय होईल. व्यवसायाच्या नियोजनात काळजी घ्या. व्यवहारात पारदर्शी राहा. आठवड्याच्या उत्तरार्धात चांगले अनुभव येतील. सहलीचे प्लॅन यशस्वी होतील. तापदायक घटनांकडे दुर्लक्ष करा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत यशाचा काळ अनुभवाल. घरात छोट्या समारंभात मित्र, नातेवाईक भेटतील. नवीन व्यवसायाचे नियोजन मार्गी लागेल. कामातला हुरूप वाढेल.
मीन : धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. मित्रमंडळींसोबत चैन कराल. तरुणांचे मन प्रसन्न होईल. घरात आनंदाच्या बातम्या कळतील. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना काळजी घ्या. प्रवासात चोरी होऊ शकते. नोकरदारांना दगदग सहन करावी लागेल. कला, संगीत क्षेत्रात चांगला काळ आहे. व्यवसायात बुद्धिचातुर्याच्या जोरावर काम पूर्ण कराल. गर्दीत वाद टाळा. विदेशात शिक्षण घेण्याचा विषय मार्गी लागेल. व्यवसायात काळजीपूर्वक काम पूर्ण करावे लागेल. घरात वाद टाळा.