• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बेरोजगारीच्या फे-यात हुन्नर मदतीला

- सचिन परब (प्रबोधन १००)

सचिन परब by सचिन परब
January 20, 2022
in प्रबोधन १००
0

आज तरुणांना नोकरी कशी मिळवाल, इंटरव्यू कसा द्याल, अशी तंत्रं शिकवली जातात. पण त्यांना कुणीतरी प्रबोधनकारांना सरकारी नोकरी मिळण्याचा हा प्रसंग सांगायला हवा. प्रामाणिकपणा, शिस्त आणि श्रमप्रतिष्ठा यांचा धडाच प्रबोधनकारांनी घालून दिलाय.
– – –

तात्यासाहेब परांजपेंच्या राम एजन्सीत प्रबोधनकारांना पगार होता फक्त चाळीस रुपये. हा पगार प्रबोधनकारांच्या वकुबाच्या मानाने कमी आहे हे तात्यासाहेबांना माहीत होतं. त्यामुळे ते त्यांना इतर कामंही मिळवून देत. पण ती गोळाबेरीजही कमी होई. म्हणून त्यांनीच शिफारस करून प्रबोधनकारांना श्रोडर स्मिथ नावाच्या जर्मन कंपनीत सेल्समन म्हणून कामाला लावलं. आता पगार झाला होता सव्वाशे रुपये.
प्रबोधनकार या नव्या कंपनीत खुष होते. त्याचं कारण फक्त पगार नव्हता, तर भारतीय कर्मचार्‍यांशी वागण्याची जर्मनांची पद्धत त्यांना आवडली होती. त्यांच्या वागण्यामुळे जर्मनांविषयी आपुलकी वाटू लागली होती. घरच्यापेक्षा हापिसचे जीवन आकर्षक वाटायचे, या प्रबोधनकारांच्या एका वाक्यानेच त्यांचा नव्या नोकरीतला आनंद दिसून येतो. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. नवी नोकरी सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच जून १९१४ला बोस्नियाची राजधानी साराजेवोमध्ये ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्युक प्रâान्झ फर्डिनांड याचा खून झाला आणि पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यात सगळा युरोप विभागला गेला. अचानक जर्मन हे इंग्रजांचे शत्रू झाले. सहाजिकच मुंबईतल्या जर्मनांवर इंग्रजांची वक्रदृष्टी झाली.
पण त्याचा अंदाज घेऊन श्रोडर स्मिथ कंपनीच्या अधिकार्‍यांनी सर्व कर्मचार्‍यांना एकत्र बोलावलं आणि परिस्थितीची जाणीव करून दिली. सर्व मिळकत जप्त होणार असल्याने कंपनी बंद पडून सगळ्यांच्या नोकर्‍या जाणार होत्या. पण सगळ्या कर्मचार्‍यांना सहा महिन्यांचा पगार देण्यात आला. त्यामुळे सगळ्या कर्मचार्‍यांच्या डोळ्यांत अश्रू आले. कर्मचारी बाहेर पडताच पोलिसांची धाड पडली. त्यांनी इंग्रज, स्कॉच, आयरिश आणि फ्रेंच सोडून मुंबईतल्या सगळ्या युरोपियनांवर धाडी घालून त्यांना बायकामुलांसह लॉर्‍यांत भरून आणलं होतं. त्यात कंपनीतल्या जर्मनांची भर पडली. त्या सगळ्यांना बोरीबंदर स्टेशनात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये बसवून अहमदनगरला तुरुंगवासासाठी रवाना करण्यात आलं. हे सगळं प्रबोधनकार आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या नजरेसमोर घडलं होतं.
तोवर मुंबईच्या नोकरदारांमध्ये लढाईची वाट बघणार्‍यांची संख्या मोठी होती. जर्मन परस्पर इंग्रजांची खोड मोडतील, अशी त्यांना आशा होती. पण झालं भलतंच. बहुसंख्य युरोपियन कंपन्या बंद पडल्या. ब्रिटिश कंपन्यांनीही नोकरकपात केली. त्यामुळे अचानक बेकारांच्या टोळ्या मुंबईच्या रस्त्यांवर फिरू लागल्या. महागाई प्रचंड वाढली होती. मंदीने हाहाकार उडवला. त्यातल्या त्यात युद्धात तटस्थ असणार्‍या जपानी कंपन्यांनी परिस्थितीचा फायदा उचलून आपला माल खपवला. पण त्यामुळे नोकर्‍या काही निर्माण झाल्या नाहीत.
या मंदीने प्रबोधनकारांना धक्का बसला पण ते इतरांसारखे खचणार नव्हते. कारण ते इतरांसारखे फक्त कारकून थोडेच होते. त्यांच्याकडे अनेक कलाकौशल्यं होती. बेरोजगारीला तोंड देताना त्यांची मानसिकता कशी होती, ते त्यांच्या शब्दांत वाचायला हवं, `आजवर मी अनेक क्षेत्रांत नोकर्‍या केल्या. पण स्वाभिमानाला किंचितसा ढका बसताच ताडकन सोडल्या. बेकारीची क्षिती मला कधीच वाटली नाही. अंगात हुन्नर असेल तो असामी कधीच रिकामा रहायचा नाही. नोकरी जाताच, मी लगेच फोटोग्राफी, फोटो एन्लार्जिंग, ऑइल कलर पोर्ट्रेट पेटिंगचा व्यवसाय घरबसल्या चालू केला. ओळखीपाळखीने गिर्‍हाइक गाठण्यात सुरवातीला जी भटकंती झाली असेल तेवढीच. पुढे एकाकडचे काम पाहून दुसरा, तिसरा घरी चालत यायचा. अगदी सव्वाशे जरी कधी मिळाले नाहीत, तरी ७५-१००पर्यंत उघराणी झाली, तरी चूल अडत नसे.` उघराणी म्हणजे आताच्या भाषेत वसुली.
प्रबोधनकार तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी बाबूराव बेंद्रेंसह एक पाच सहा खोल्यांची छोटी चाळ विकत घेतली. तिथे त्यांनी दोन क्लास सुरू केले. पहिला बर्लिट्झ पद्धतीने चार महिन्यांत इंग्रजी लिहिण्या बोलण्याचा आणि दुसरा स्लोन डुप्लोयन फोनोग्राफी शिकवण्याचा. या दोन्ही पद्धती मुंबईसाठी नव्या होत्या, तरी व्यवहारोपयोगी नक्कीच होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असेल. थोडक्यात, प्रबोधनकारांनी आयुष्यभरात जे वेगवेगळे उद्योग केले, त्यात इंग्लिश स्पीकिंग क्लासचाही समावेश होता.
नोकर्‍या गेल्यावर इतर कारकून उघडे पडले. पण प्रबोधनकारांची नोकरी गेली तरी उत्पन्नाचा ओघ काही थांबला नाही. त्यावर ते लिहितात, `ओळखीचे कोणी बेकार कारकून भेटले नि त्यांनी विचारले, कसं काय चाललं आहे बुवा तुमचं? तर मी ठणकावून उत्तर देत असे, `अरे, हजामाचा खुंट बदलला म्हणून काय झालं? कुठल्याही नाक्यावर उभं राहिलं का गिर्‍हाईक हाक मारतंच.` प्रबोधनकारांचा एकूण स्वभाव आणि शैली पाहता असे रंजक सवालजवाब त्या काळात झाले असणार, यात शंका बाळगायचं कारण नाही.
हे सगळं घडत असतानाच्या काळात दादर हळूहळू विकसित होत होतं. मुळात ताडामाडांच्या बागांचं हे खेडेगाव आता प्रबोधनकारांसारख्या नोकरदारांचं आश्रयस्थान झालं होतं. या नव्या गावात मनोरंजनाची साधनं अशी नव्हतीच. नोकरदार दिवसभर काम करून संध्याकाळी परतत, तेव्हा त्यांचा वेळ आनंदात घालवण्याची कोणतीही सुविधा नव्हती. पटवर्धन ब्रदर्स हे तंबू घेऊन सिनेमाचे खेळ ‘शांबरिक खरोलिका’ नावाने करत, त्याला काही काळ प्रतिसाद मिळाला होता. बाकी दादर शांतच असायचं.
प्रबोधनकारांसारख्या समाजप्रिय माणसाने यावर उपाय शोधला नसला तरच नवल. प्रबोधनकारांच्या घरी रोज संध्याकाळी मैफल भरायची. त्यात कोण कोण असायचं? प्रबोधनकारांचे शेजारी बाळकृष्ण नानाजी कोपर्डे उर्फ कोपर्डेबुवा. ते तंबोर्‍यावर भजनापासून क्लासिकलपर्यंत सगळं गात. प्रबोधनकारांचे जानी दोस्त शंकर सीताराम उर्फ बाबूराव बेंद्रे हे तबल्यावर असत. फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे कीर वाडीत राहणारे कोपर्डेकर. अशी दहाबारा मंडळी रोज तास दीड तास संगीताची मैफल जमवायची. याच घरात संगीताबरोबरच सार्वजनिक चर्चेचीही चावडी भरलेली असायची. तेव्हा पहिलं महायुद्ध पेटलं होतं. सरकारनेही सैन्यभरतीसाठी मोहिम सुरू केली होती. त्यामुळे वातावरण दहशतीचं होतं. दिवसभर कुणी ना कुणी कसली तरी चौकशी करण्यासाठी येतच राहायचं.
या अस्वस्थ वातावरणात प्रबोधनकारांना स्थैर्य देणारी एक संधी चालून आली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक छोटी जाहिरात आली, शॉर्टहॅण्ड टायपिस्ट पाहिजे. त्यासाठी अर्ज करत असताना त्यांचा शेजारी रामसामी म्हणाला, `कशाला या फंदात पडतोस? दॅट बॉस इजे डॉन्की, ए मॉन्स्टर!` पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल इंजिनिअर विल्यम स्टूअर्ट मेण्टिथ याने या रामसामी आणि त्याच्या मित्रांना काम येत नाही म्हणून दोन दिवसांत हाकलून दिलं होतं. त्यांचा इशारा ऐकूनही प्रबोधनकारांनी अर्ज केलाच. त्यांना कॉलही आला आणि ते गेलेही. मेण्टिथने त्यांना डिक्टेशन घातलं. शिपायाने त्यांना कारकुनांच्या विभागात एक कोपर्‍यात असलेल्या टाइपरायटरच्या टेबलावर नेऊन बसवलं. त्यांनी कागद घातला. टायपिंग सुरू केलं तर की टाइपरायटरची सगळी रिबनच फाटलेली दिसली. टाइपची सगळी अक्षरं घाणीने बुजली होती. आता टायपिंग कसं होणार? प्रबोधनकारांनी टाचणी मागून घेतली. सगळे टाइप कोरून स्वच्छ केले. मग नवीन कागद लावून डिक्टेट केलेला मजकूर टाइप केलं.
या सगळ्याला साधारण अर्धा तास लागला. त्यामुळे मेण्टिथ साहेबाने विचारलं, `काय, या सहा सात ओळी टाइप करायला तुला अर्धा तास लागला?` त्यावर प्रबोधनकारांचं उत्तर तयार होतं, `साहेब, इथला टाइपरायटर अगदी भिकार अवस्थेत आहे. रिबन फाटलेली. टाइप भरलेले. त्यावर टायपिंग असं भिकार येत होतं. म्हणून मी सारं यंत्र स्वच्छ केलं आणि हा कागद आणला आहे, पहा.` एकदम बिनचूक आणि स्वच्छ टायपिंग पाहून साहेबाने लगेच त्यांची नेमणूक केली. इतकंच नाही, तर त्यांच्यासाठी नवीन टाइपरायटरही मागवून दिला.
आज तरुणांना नोकरी कशी मिळवाल, इंटरव्यू कसा द्याल, अशी तंत्र शिकवली जातात. पण त्यांना कुणीतरी प्रबोधनकारांना सरकारी नोकरी मिळण्याचा हा प्रसंग सांगायला हवा. प्रामाणिकपणा, शिस्त आणि श्रमप्रतिष्ठा यांचा धडाच प्रबोधनकारांनी घालून दिलाय. मुंबई इलाख्याच्या या चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या ऑफिसात प्रबोधनकारांनी पुढची काही वर्षं काम केलं. तिथे कामाचा ठसा उमटवला. साधा शॉर्टहॅण्ड टायपिस्ट म्हणून सुरुवात झालेली असताना त्यांनी रेकॉर्ड सेक्शनचा हेडक्लार्क या पदापर्यंत झेप घेतली. प्रबोधनकारांनी `माझी जीवनगाथा`त नोंदवलंय की त्यांची नोकरी दहा वर्षांची झाली. पण ते गणित काही जुळत नाही. `शनिमहात्म्य` या पुस्तकात त्यांनी नोंदवलंय की १० फेब्रुवारी १९२२ दुपारी बारा वाजता त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. पहिल्या महायुद्धाच्या सुरवातीला नोकरी लागली हे प्रबोधनकारांचं सांगणं मानलं तर सरकारी नोकरीची सुरवात साधारण जुलै ऑगस्ट १९१४ची धरावी लागेल. म्हणजे प्रबोधनकारांच्या सरकारी नोकरीचा कालावधी साधारणपणे साडेसात वर्षांचा भरतो.

Previous Post

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे…

Next Post

`मी’ असा का वागतो?

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post

`मी' असा का वागतो?

राजकीय शत्रूशीही मैत्री जपणारा नेता

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.