• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home भाष्य

ऑनलाइन दारू मागवणे पडले महागात

- सुधीर साबळे (सायबर जाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 18, 2023
in भाष्य
0
Share on FacebookShare on Twitter

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, उत्पन्नाची साधनं संपली, व्यवसाय मंदावले, त्याचप्रमाणे फसवणूक करणार्‍या भामट्यांचाही धंदा बंद झाला. लोक बाहेरच पडले नाहीत, त्यांनी काही व्यवहारच केले नाहीत, तर मग फसवाफसवी करायची कशी? हळुहळू देशाला पडलेली लॉकडाऊनची मगरमिठी सैलावायला लागली आणि सायबर भामट्यांना लॉटरी लागली… ऑनलाइन दारूविक्रीची.
रविवारच्या सुटीचा दिवस होता.
लॉकडाऊन हळुहळू उठत चालला असला तरी दुकानांच्या वेळांवर मर्यादा होत्या. सगळी दुकानं सुरूही झाली नव्हती. पुण्यातल्या मंदारला मद्याचा आस्वाद घेण्याची लहर आली. पण, खाली उतरून कोण जाणार? त्यापेक्षा घरीच मद्य मागवलं तर बेस्ट म्हणून त्याने शोध सुरू केला. घराजवळच्या वाईन शॉपचा नंबर त्याच्याकडे नव्हता. तो मिळाला तर डिलिव्हरी होईल, म्हणून त्याने गुगलचा आधार घेऊन वाईन शॉपचा नंबर शोधण्यास सुरवात केली. काही क्षणात त्याला दुकानाचा पत्ता, फोटो, फोन नंबर आदी माहिती मिळाली. माहिती गुगलवर आहे म्हणजे ती अधिकृतच असणार अशी त्याची खात्री झाली होती. त्याने त्या नंबरवर कॉल केला. ऑर्डर दिली. समोरच्या माणसाने देखील त्याला पटापट किंमती सांगितल्या. कोणती स्कॉच, वाईन चांगली आहे, याची सराईताप्रमाणे माहिती दिली. बिल २५३० रुपये होतंय असे सांगतानाच त्याने वरचे ३० रुपये माफ पण केले. आता अर्ध्या तासात डिलिव्हरी येणार म्हणून कोरड्या घशाने तयारीत बसलेल्या मंदारने झटपट ऑर्डर दिली. पेमेंट करण्यासाठी त्या माणसाने मंदारच्या मोबाईलवर एक क्यूआर कोड पाठवला. तो स्कॅन करा, पैसे जमा झाले की लगेच माणूस डिलिव्हरी देण्यासाठी येईल, असं त्याला कळलं होतं. तासाभरानंतरची मौजमजा मंदारच्या डोळ्यसमोर नाचायला लागली होती. त्याने व्हॉट्सअपवर आलेला क्यूआर कोड काही विचार न करता पेमेन्ट गेटवेमधून स्कॅन केला. त्याच्या खात्यातून अडीच हजार नाही, तर एक लाख रुपये काढले गेले होते.. हे काय होतंय ते कळल्यावर त्याने ताबडतोब बँकेला आणि पेमेन्ट गेटवेला फोन केला. त्याच्याकडून पुढील प्रक्रिया होऊन त्याचे खाते बंद होईपर्यंत रिकामे होणार आणि तपास तिथवर पोहोचेपर्यंत ज्याने पैसे वळवले, त्याचं खातं बंद होऊन जाणार हे उघड होतं… सुन्न अवस्थेत मंदार जवळच्या पोलीस स्टेशनकडे निघाला होता…
मंदारच्या तुलनेत मिरा रोडच्या काशिमिरा परिसरात मुकुंद नशीबवान म्हणावा लागेल. त्यालाही लॉकडाऊनमध्ये तहान लागली. त्यानेही याच पद्धतीने शोधून काढलेल्या दुकानदाराने त्याला व्हॉट्सअपवर पेटीएमची लिंक पाठवली. त्याने १६०० रुपये भरले. स्क्रीनशॉट पाठवला. दारूची डिलिव्हरी कधी मिळेल, अशी विचारणा केली. त्या माणसाने फोन करायला सांगितलं. म्हणाला, आता मी एक कोड पाठवतो. तो स्कॅन करा.
मुकुंद थोडा सजग होता. तो म्हणाला, हा काय प्रकार आहे, माझे पेमेंट तुझ्याकडे पोहचलं आहे. आता माल पाठव.
समोरचा माणूस म्हणाला, नाही. आमची ही सिस्टीम आहे. नोंदणी झाल्याखेरीज डिलिव्हरी होणार नाही.
मुकुंद म्हणाला, ही सिस्टीम मला मान्य नाही. माझे पैसे परत कर…
समोरचा माणूस म्हणाला ठीक आहे, पैसे देतो, अमुक नंबरवर पे च्या ऑप्शनमध्ये जाऊन मी सांगतो ती रक्कम टाक.
पुन्हा मुकुंदाने विचारले. पैसे सरळ रिफंड कर. ही काय सिस्टीम आहे.
त्यावर त्याने उदाहरण म्हणून दुसर्‍या युपीआय वापरकर्त्याच्या खात्यात १० रुपये पाठवायला सांगितले आणि १० रुपये परत आले. मग तो माणूस म्हणाला, बघा, येतात की नाही पैसे… मी सांगतो तिथे पेमेन्टच्या लिंकवर जा.. तिथे १९९१ रुपयांचा आकडा टाक आणि खाली नोट असे लिहिलेले असते तिथे १६०० रुपयांचा आकडा टाक.
एव्हाना मुकुंदच्या लक्षात आले होते की आपण गंडलो आहोत. तो म्हणाला, तू माझेच दहा रुपये बंद खात्यातून परत आणून दाखवण्याची जादू करून दाखवलीस, म्हणून आता मी परत फसेन आणि १९९१ रुपये तुझ्या घशात घालेन, असे तुला वाटते का?
आपलं खरे रूप याला कळले हे समजताच तो विक्रेता त्याच्या मूळ रंगात आला आणि अर्वाच्य शिवीगाळ करत त्याने फोन बंद करून टाकला. मुकुंदाने पेमेंट गेटवेला फोन केले. स्थानिक पोलीस स्टेशनात गेल्यावर तिथे त्याला कोणी दाद दिली नाही. जाऊन त्या वाईन शॉपवर असा कोणी माणूस आहे का हे तुम्हीच पाहून या, असा हास्यास्पद आणि संतापजनक सल्ला त्याला दिला गेला.
त्याने नॅशनल सायबर क्राइम ब्युरोकडे तक्रार केली. त्यानंतर ती पुन्हा तपासासाठी स्थानिक पोलिस स्टेशनात आल्यावर तिथल्या इन्स्पेक्टरने फोन करून, तुमचीच चूक होती ना, तुम्ही खातरजमा न करता पैसे भरले ना, सुशिक्षित असून फसलात ना, असं ग्यान देऊन आता ती माणसं सापडणार का, बंद करून टाकतो केस, म्हणून मुकुंदाची कन्सेन्ट घेऊन केस बंद केली… तपासाच्या दिशेने एकही पाऊल न टाकता. छोट्या रकमांच्या फसवणुका होत असतात, तेव्हा स्थानिक पोलीस तपास टाळण्याचा प्रयत्न करतात. तक्रारही नोंदवून घेत नाहीत, हा धडा मुकुंदा शिकला, आपणही शिकू या.

हे लक्षात ठेवा…

इंटरनेटवरच्या जाहिरातींपासून कायम सावध राहायला हवे. या जाहिरातींची विभागणी ही सर्च, डिस्प्ले, शॉपिंग, विडिओ, अ‍ॅप, स्मार्ट अ‍ॅड या प्रकारात होते. जेव्हा आपण एखादी गोष्ट इंटरनेटवर सर्च करतो, तेव्हा आपल्याला त्याच्या संदर्भात भरपूर नावे दिसतात. काही जण डिस्काउंटच्या तर काहीजण बक्षिसाच्या प्रलोभनाला बळी पडून त्याच्या जाळ्यात फसतात. ऑनलाईन दारू किंवा अन्य वस्तूच्या खरेदीत अनेकांची फसवणूक झालेली आहे. ऑनलाईन खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय कायम निवडावा. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी जर तुम्हाला कोणी क्युआर कोड स्कॅन करायला सांगितले, लिंकवर क्लिक करायला सांगितले तर तशा प्रकाराला अजिबात बळी पडू नका. या प्रकारात गुन्हेगार सावज अगदी अलगद जाळ्यात ओढतात. यामध्ये फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारा फोन एका व्यक्तीच्या नावावर असतो. वापरणारी व्यक्ती भलतीच असते. मोठी फसवणूक करून झाली की सिमकार्ड फेकून द्यायची आणि पुन्हा नवा नंबर नवा फोन वापरायचा असा त्याचा फंडा असतो. बहुतेक वेळा ही मंडळी पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा अशा ठिकाणांहून ऑपरेट करतात. तिथपर्यंत तपास यंत्रणा पोहोचतच नाहीत, हे त्यांना माहिती असतं.

(सायबर सुरक्षेच्या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सायबर कथा’ हे सादर सुरु करण्यात आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात सायबर सेल विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितलेल्या अनुभवाच्या आधारे या कथा तयार करण्यात आलेल्या आहेत. यामधील पात्रांची नावे बदलण्यात आली असून त्याच्याशी कुठे साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

Previous Post

आमच्या वेळी…

Next Post

पाहा माझे ‘स्क्रॅपबुक’

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023
भाष्य

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

June 3, 2023
भाष्य

प्री-पेड टास्क फ्रॉड

June 3, 2023
भाष्य

बघा नीट, येईल झीट

June 3, 2023
Next Post

पाहा माझे ‘स्क्रॅपबुक'

राशीभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023

राशीभविष्य

June 3, 2023

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

June 3, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.