ग्रहस्थिती : बुध, हर्षल, राहू, गुरु मेष राशीत, रवि वृषभेत, मंगळ कर्क राशीत, शुक्र मिथुनेत, प्लूटो मकर राशीत, नेपच्यून मीनेत, शनि कुंभेत, केतू तूळ राशीत. विशेष दिवस : २३ मे रोजी विनायकी चतुर्थी, २५ मे गुरुपुष्यामृत योग.
मेष : मनासारख्या घटना घडतील. निर्णय विचारपूर्वक घ्या, यश मिळेल. पोटाचे विकार डोके वर काढतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक क्षेत्रात सांभाळून राहा. कलाकारांना उत्तम काळ. व्यावसायिकांनी व्यवहारात काळजी घ्यावी. सासू-सुनांमध्ये कुरबुरी होतील. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीची शक्यता आहे. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी मिळतील. खेळाडूंसाठी चांगला काळ आहे.
वृषभ : व्यवसाय, नोकरीत आनंद मिळेल. आर्थिक बाजू विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे नियोजन करा. मध्यस्थी करू नका. आफत ओढवेल. सहल, करमणूक, मौजमजेवर खर्च होईल. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. नोकरीनिमित्ताने विदेशात जाल. नवीन वस्तू घेण्याचे नियोजन फिस्कटेल. घरातील वादाकडे फार लक्ष देऊ नका. शेती, अभियंत्रिकी क्षेत्रात चांगला काळ जाईल. लेखक, पत्रकार, संपादकांना नव्या संधी मिळतील.
मिथुन : प्रलंबित कामे मार्गी लागतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. वादाचे प्रसंग टाळा. विद्यार्थीवर्गाला घवघवीत यश मिळेल. व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. नोकरीत स्थिती उत्तम राहील, वरिष्ठ खूष राहतील. कुटुंबासमवेत अचानक प्रवास घडेल. वाहन चालवताना काळजी घ्या. निर्णय सबुरीने घ्या. जमीन-जुमला, प्रॉपर्टीचे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागतील. आरोग्याच्या छोट्या समस्या निर्माण होतील. काळजी घ्या.
कर्क : नोकरी-व्यवसायातील धावपळीचा परिणाम आरोग्यावर होईल. मानसिक स्वास्थ्य बिघडेल. बंधू, भगिनीकडून चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या कामाचे नियोजन लांबणीवर पडल्याने चिडचिड होईल. नोकरीत नवे बदल स्वीकारा. थोडी गैरसोय होईल. बदलीचे योग आहेत. सरकारी कामे पूर्ण होणार नाहीत. अचानक मोठा खर्च निर्माण होईल. संततीकडे लक्ष द्या. काही मंडळींना अचानक धनलाभ होईल.
सिंह : नोकरी-व्यवसायात कामावर लक्ष केंद्रित करा. अन्यथा मोठी चूक होईल. व्यवसायात नव्या संधी लाभतील. बंधूंबरोबर वाद होतील. जुनी मित्रमंडळी भेटतील. घरातील समारंभाच्या निमित्ताने नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कोर्ट-कचेरीच्या कामांना विलंब लागेल. प्रेमप्रकरणात तणाव निर्माण होईल. नव्या ओळखींचा भविष्यात फायदा होईल. धार्मिक कार्याला वेळ द्याल.
कन्या : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक महागात पडू शकतो. ध्यान-धारणेतून मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कामावर त्याचा चांगला परिणाम होईल. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. तिथे विचार करूनच निर्णय घ्या. अडकून पडलेले प्रश्न मार्गी लागतील. थकीत येणी वसूल होतील. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. नव्या वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. सामाजिक कार्यासाठी वेळ राखून ठेवाल.
तूळ : कामे सहजपणे मार्गी लागल्यामुळे मन आनंदी राहील. पती-पत्नीतील वादाचे प्रसंग ताणू नका, वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. नोकरीत चांगले अनुभव येतील. वरिष्ठ कामावर खूष होतील, एखादी मोठी जबाबदारी मिळेल. कोणालाही फुकटचा सल्ला देणे टाळा. कामाच्या दगदगीचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थीवर्गासाठी चांगला काळ. स्पर्धेत यश मिळू शकते. काहीजणांना अचानक धनलाभ होईल. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे.
वृश्चिक : घरातील ज्येष्ठांकडे अधिक लक्ष द्या. व्यावसायिकांना उत्तम लाभ मिळतील. व्यसनापासून दोन हात दूरच राहा. जुगार, सट्टा, लॉटरीत आर्थिक फटका बसेल. उधार देणे टाळा. धार्मिक कार्यात मन रमवाल. दान-धर्म कराल. सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान होईल. शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवा. इस्टेट एजंट, मेडिकल व्यावसायिकांना चांगला लाभ मिळू शकतो. राजकारणात एखादी संधी मिळू शकते.
धनू : नवा व्यवसाय सुरु करण्याआधी थोडे थांबा. व्यवसायात आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते. अचानक खर्चाचे प्रसंग निर्माण झाल्याने आर्थिक घडी विस्कळीत होईल. पैसे जपूनच वापरा. तरुण वर्गासाठी उत्तम काळ. कला-क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश मिळेल. नोकरीत चांगली स्थिती राहील. नवीन नोकरी मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. कोर्टाची पायरी चढावी लागेल.
मकर : नोकरीच्या ठिकाणी वाणीवर नियंत्रण ठेवा. विरोधक त्रास देतील. मानसिक त्रास निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. डोळे झाकून आर्थिक व्यवहार करू नका. फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात. तरुणांनी अति आत्मविश्वास टाळावा. नवीन वास्तू घेण्याचे नियोजन मार्गी लागेल. कवी, संगीतकार, कलाकारांना मान सन्मान मिळेल. घरात शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा एखादी छोटी चूक महागात पडेल.
कुंभ : काहींचा भाग्योदय होईल. तरुणांना काही समस्या त्रासदायक ठरतील. नोकरीच्या ठिकाणी फार अपेक्षा ठेवू नका, भ्रमनिरास होईल. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. थकीत येणे वसूल होईल. काही गोष्टी मनासारख्या झाल्याने आत्मविश्वास वाढेल. नोकरदारांकडून त्रास हाेऊ शकतो. महिलांना आरोग्याचे त्रास होतील. लेखक, कलाकारांना उत्तम काळ आहे. आर्थिक आवाक वाढेल. देव-धर्माच्या निमित्ताने फिरणे होईल.
मीन : तरुण मंडळींचा भाग्योदय होईल. जनसंपर्क क्षेत्रात अच्छे दिन येतील. कष्ट केले तर हमखास यश मिळेल. नोकरीत नवे बदल स्वीकारा, भविष्यात फायदा होईल. खेळाडूंना चांगले यश मिळेल. व्यवसायात व्यवहार करताना काळजी घ्या, अन्यथा एखादी चूक त्रासदायक ठरू शकते. प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होईल. मित्रांबरोबर चेष्टामस्करीतून वाद होतील. ते टाळा.