• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

रंगभूमीवर मरण, हाच माझा मोक्ष

- सचिन परब  (प्रबोधन-100)

सचिन परब by सचिन परब
June 18, 2021
in प्रबोधन १००
0

`रंगभूमीवर मरण, हाच माझा मोक्ष’ हा मथळा प्रबोधनकारांनी त्यांचे मित्र कृष्णराव गोरे यांच्या आठवणींच्या स्फुटाला दिलाय. रंगभूमीविषयी निष्ठा काय असते, हे कृष्णरांवांच्या आठवणी आपल्याला सांगून जातात. आज शंभर वर्षांनंतरही त्यांचा पल्लेदार आवाज आपल्याला ऐकता येतो, तो प्रबोधनकारांमुळेच.
…

 

गेल्या आठवड्यात प्रबोधनकारांनी ज्यांच्याशी आपली भेट घडवली होती त्या बच्चूमास्तर नावाच्या मोठ्या माणसाची आणखी एक आठवण प्रबोधनकारांनी नोंदवलीय. ही आठवण आहे बालगंधर्वांच्या काळात संगीत रंगभूमी गाजवणारे गायक नट कृष्णराव गोरेंविषयी. आजच्या पिढीला त्यांची माहिती फारशी नाही. ती शोधावीच लागते.
कृष्णराव सखाराम गोरे उर्फ मामा गोरे यांचा जन्म १८८०चा. तेव्हा गळा चांगला असेल तर मुलांना नाटक कंपनीत दाखल केलं जायचं. तसं त्यांना बाराव्या वर्षीच किर्लोस्कर नाटक कंपनीत ठेवण्यात आलं. मोठे झाल्यावर ‘मृच्छकटिक’मध्ये वसंतसेना, ‘शारदा’मध्ये इंदिराकाकू, ‘मूकनायक’मध्ये आधी सरोजिनी आणि नंतर विक्रांत, ‘विद्याहरण’मध्ये शुक्राचार्य आणि ‘सौभद्र’मध्ये कृष्ण या त्यांच्या भूमिका गाजल्या. पुढे जवळपास १९३४ पर्यंत ते रंगभूमीवर काम करत होते. त्यानंतर त्यांनी ‘नेताजी पालकर’, ‘सावित्री’, ‘शारदा’, ‘पतितपावन’ अशा सिनेमांतही काम केल्याचे उल्लेख सापडतात. १९४० मध्ये त्यांचं निधन झालं.
संगीत रंगभूमीचे अभ्यासक आणि प्रतिबालगंधर्व म्हणून ओळखले जाणारे विक्रांत आजगावकर त्यांच्याविषयी सांगतात, `गो. ब. देवल, भास्करबुवा बखले, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर अशा दिग्गजांची तालीम कृष्णरावांना मिळाली. त्यांच्यावर किर्लोस्कर नाटक कंपनीच्या पहिल्या पिढीतले गायक नट भाऊराव कोल्हटकरांच्या गायकीचा प्रभाव होता. पण त्यांनी त्यांची नक्कल केली नाही. त्यांनी बालपणी घोटलेलं किर्लोस्करी वळण नीट पचवलं होतं. तरी त्यांची शैली स्वतंत्र होती. स्वच्छ शब्दोच्चार आणि पल्लेदार आवाज यामुळे थिएटरच्या बाहेर उभं राहूनही त्यांचं गाणं ऐकता यायचं. बालगंधर्वही त्यांच्याकडून गाण्यांतले बारकावे शिकले होते, यावरूनही त्यांचं मोठेपण कळू शकतं.’

आजगावकर याला जोड म्हणून सांगतात, `त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्त्रीपार्ट आणि पुरुषपार्ट दोन्ही उत्तम करत. पण त्यांच्या नेहमीच्या वागण्यात बायकीपणा कुठेच नसे. त्यांचा ‘विद्याहरण’मधला शुक्राचार्य सर्वात गाजला. त्यांच्यासारखा शुक्राचार्य कुणीच केला नाही, असं म्हणतात. त्यांची उंची फार नव्हती. पण शुक्राचार्याच्या वेषात ते रंगभूमीवर आल्यावर पहिल्याच गाण्यात प्रेक्षकांची पकड घेत. केशवराव ठाकरेंनी त्यांचा शुक्राचार्य बघितला होता. कृष्णराव बुद्धिमान होते. भाषेवर पकड होती आणि स्वभावाने सज्जन होते. त्यामुळे त्यांची केशवरावांशी घनिष्ठ मैत्री झाली. ती दीर्घकाळ टिकली. प्रबोधनकारांनी पुढे नाटकं लिहिली आणि नाटक कंपनी चालवली. तेव्हाही त्यांना कृष्णरावांची मदत झाली होती.’
दोघे स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीत असताना त्यांची गट्टी जमली. कृष्णराव प्रबोधनकारांपेक्षा पाच वर्षांनी मोठे होते. नाटकातला त्यांचा अनुभव खूप मोठा होता. पण प्रबोधनकारांनी जास्त दुनिया बघितलेली होती. त्यामुळे कृष्णरावांच्या गाण्याचं रेकॉर्डिंग व्हावं अशी प्रबोधनकारांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एचएमव्ही कंपनीशी पत्रव्यवहारही सुरू केला होता. बच्चूमास्तरनाही त्यांनी मदतीला घेतलं. बच्चूमास्तरांनी मुंबईत असताना कंपनीच्या मालकाला भेटून कॉण्ट्रॅक्ट ठरवलं. बारा गाण्यांचे तीनशे रुपये, सोबत एक मोनार्क ग्रामोफोन मशीन, बारा रेकॉर्ड, जाण्या-येण्याचा दोन माणसांचा सेकंड क्लास प्रवासखर्च असं ते कॉण्ट्रॅक्ट होतं.
तेव्हा कंपनीचा मुक्काम अमरावतीत होता. एका बुधवारचा नाटकाचा खेळ संपवून कृष्णरावांना सोबत घेऊन प्रबोधनकार मुंबईला आले. ते सकाळीच एम्पायर हॉटेलात पोचले. हॉटेलसमोरचा रस्ता पार केला की भाटिया बागेच्या समोर तेव्हाच्या गोखले हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये एचएमव्हीचा रेकॉर्डिंग स्टुडियो होता. स्टुडियो म्हणजे आतासारखा अत्याधुनिक प्रकार नव्हताच. प्रबोधनकारांनी त्याचं वर्णन केलंय ते असं, `एक गोरा आदमी गायक टोळीला यंत्ररचनेसमोर बसवायचा. जाड पुठ्ठ्याची नळकांडी एक गायकाच्या अगदी तोंडाजवळ, एक हार्मोनियमजवळ, एक तबल्याजवळ अशी वळवून लावायचा. एक इंच जाड भाकरीएवढी चॉकलेटी रेकॉर्ड यंत्रावर चढवायचा. डेखो बहोत जोरसे गाना चाहिए, असं बजावायचा आणि हाताचे सिग्नल देऊन करा सुरू सुचवायचा. गाणे संपले का तीच भाकर तो यंत्रावर वाजवून पहायचा नि लगेच पास नापास जजमेण्ट द्यायचा. एकदा ट्रायल म्हणून जाडी रेकॉर्ड वाजवली का गेली ती फुकट. मग तिचा काही उपयोग नाही. असले चमत्कारिक तंत्र होते ते.’
प्रत्यक्ष रंगभूमीवर गाणं आणि रेकॉर्डिंगसाठी गाणं यात तेव्हा जमीन आस्मानाचा फरक होता. वन्समोअरवर नाटकात तीस चाळीस गाणी म्हणणारे नटही दोन तीन गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये थकून जायचे. प्रबोधनकार सांगतात तसा तेव्हा मराठी रंगभूमीवर कृष्णराव गोरेंसारखा दणक्या गवई नव्हता. त्यांनी रेकॉर्डिंगसाठी गाणंही दणक्यातच गायलं. तरी गोरा साहेब म्हणाला, `टू स्लो है. रेकॉर्ड नही बनेगा.’ गोर्‍या साहेबाने आराम करून दुसर्‍या दिवशी यायला सांगितलं.
रेकॉर्डिंगच्या पहिल्या टेस्टमध्ये कृष्णराव नापास झाल्यामुळे प्रबोधनकार खूप नाराज झाले. स्वतः पुढाकार घेऊन घडवलेली मुंबईभेट वाया जातोय की काय, अशी भीती त्यांना वाटायला लागली. पण ते हार मानणार्‍यातले नव्हते. काळबादेवी रोडवर जेम्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नावाचं वाद्य विकण्याचं दुकान होतं. ते सिंगर कंपनीच्या ग्रामोफोन रेकॉर्ड तयार करत. या कंपनीचा जमशेटजी नावाचा म्हातारा पारशी मॅनेजर प्रबोधनकारांच्या ओळखीचा होता. त्यांनी मॅनेजरला पटवलं, `महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक सध्या मुंबईत आहे. उद्या सकाळी अमरावतीला परत जाणार आहे. आज तुम्ही संधी साधलीत तर तुम्ही गाणी रेकॉर्ड करू शकाल.’ मॅनेजरने मालकाला पटवलं आणि व्यवहार ठरला. तीनशे रुपयांत बारा गाणी.
जमशेटजीला सोबत घेऊन प्रबोधनकार हॉटेलवर आले. तिथे कृष्णरावांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या नाटकातलं गाणं म्हटलं, `वळते अंजुलि नकळत बघुनि तुम्हालागी’. जमशेटजी खूष झाला. रात्री दहा वाजता ग्रँट रोड पुलाजवळच्या एका बंगल्यात रेकॉर्डिंग सुरू झालं आणि रात्री दीडदोन पर्यंत संपलं. जमशेटजींनी ठरलेली रक्कम कृष्णरावांना दिली. पण बच्चूमास्तरांना चिंता वाटत होती की एचएमव्हीशी केलेल्या करारानुसार दुसरीकडे गाता येणार नव्हतं. त्यावर प्रबोधनकारांनी त्यांना सांगितलं, `एचएमव्हीत आधीसारखंच रेकॉर्डिंग होऊ शकलं नाही, तर काय करणार? अशा अटी आणि कॉण्ट्रॅक्ट खूप बघितलेत.’ दुसर्‍या दिवशी दुपारी सगळे पुन्हा एचएमव्हीच्या स्टुडियोत पोचले. आपल्या गाण्याला `टू स्लो’ म्हटल्यामुळे कृष्णराव वैतागलेले होते. त्यांनी पहिलंच गाणं दणकून गायलं. साहेब खूष झाला. त्याने रेकॉर्डिंग सुरू केलं. टप्प्याटप्प्यात बारा गाणी पूर्ण झाली. कृष्णरावांना ठरलेली बिदागी मिळाली. प्रबोधनकारांमुळे तीनशेच्या जागी सहाशे रुपये घेऊन कृष्णराव शनिवारच्या खेळासाठी कंपनीच्या मुक्कामावर अमरावतीला पोचले.
आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वी रेकॉडिंग झालेली कृष्णरावांच्या आवाजातली एचएमव्हीची रेकॉर्ड विक्रांत आजगावकर यांच्या संग्रहात आहे. त्याविषयी ते सांगतात, `त्या रेकॉर्डवर गायकाचं नाव कृष्णराव इतकंच लिहिलेलं आहे. पण तो आवाज त्यांचाच आहे. नॉन मायक्रोफोन पद्धतीचं मेणाच्या डिस्कवरचं रेकॉर्डिंग केलेलं हे गाणं आहे. ते ऐकताना मला रेकॉर्डिंगच्या वेळेस समोर बसलेले केशवराव ठाकरेच नेहमी दिसतात. त्यांच्यामुळेच हे महत्त्वाचं गाणं आपल्याला आज ऐकता येतंय. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या रामराज्यवियोग या नाटकातलं `सुदशिणापती दिलीपनंदन’ हे गाणं त्यांनी गायलंय. हे गाणं लावणीच्या अंगाने जाणारं आहे. त्यात खटके, मुरके, हरकती आहेत. आपण आज ज्याला व्हॉइस कल्चर म्हणतो, ते जबरदस्त आहे. गाणं ऐकताना आपल्याला प्रचंड तयारीचा गळा अनुभवता येतो. आवाज स्वच्छ आणि पल्लेदार आहे. त्यापेक्षाही त्यातली सुरांची आस भावणारी आहे.’
कृष्णरावांची नागपूर मुक्कामातली आणखी एक आठवण प्रबोधनकारांनी नोंदवून ठेवलीय. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या मूकनायक नाटकातली त्यांची विक्रांतची भूमिका गाजत होती. शनिवारी खेळ लागला होता. पण आदल्याच दिवशी कृष्णरावांना १०४–१०५ असा बेफाम ताप आला. सकाळपासून तिकीटविक्री सुरू झाली. सगळेजण काळजीत होते. कृष्णरावांची बदली म्हणून राजाराम सोहोनींची चर्चा सुरू होती. ती कुणकुण कानावर येताच कृष्णराव बेशुद्ध अवस्थेतच ओरडले, माझं काम मीच करणार. डॉक्टरांची चिंता वाढली. यांना डोळे उघडता येत नाही. जागचं हलता येत नाही आणि स्टेजवर पाच तास काम कसं करणार? सगळ्यांनी खूप समजावलं. पण कृष्णरावांनी हट्टच सोडला नाही. ते निर्वाणीचं म्हणाले, `माझी आई रंगभूमी. माझे गुरू अण्णासाहेब (किर्लोस्कर) आणि भाऊराव (कोल्हटकर). त्यांच्या नावावर मा‍झ्या कामात आजवर कधी खंड पडला नाही. त्यांचं नाव घेणार नि मी रंगभूमीवर जाणार. काय होईल ते होईल. रंगभूमीवर काम करता मेलो, तर तोच माझा मोक्ष. माझी आई रंगभूमी समर्थ आहे.’
त्या हट्टापुढे सगळे नमले. दोघातिघांनी मिळून मेकअप केला. कपडे चढवले. दोन्ही विंगांमध्ये एकेक कोच आरामासाठी ठेवला. डॉक्टर इंजक्शनं आणि औषधं घेऊन तयार ठेवले. कृष्णराव कोचवर लोळागोळा होऊन टेकले होते. पुढे कसं होणार, हे कुणालाच कळत नव्हतं. वेळ होताच सूचना आली, `कृष्णराव चला उठा.’ दोघांनी पकडून विंगेपर्यंत नेलं. डोळ्यांवर फुल लाईट आला. त्यांनी डोळे उघडले. रंगभूमीला नमस्कार केला. अण्णासाहेब आणि भाऊरावांचं जोरजोरात नाव घेतलं आणि बेशुद्धावस्थेतच रंगभूमीवर आले. एण्ट्री होताच टाळ्यांचा कडकडाट आणि पेटीचे सूर चालू झाले. त्यानंतर जणू काही झालंच नाही अशा नेहमीच्या पद्धतीने त्यांनी `व्यक्तरदनवधुनि वदन’ हे पद गायला सुरवात केली. प्रेक्षक आणि सगळे रंगकर्मी आश्चर्यचकित झाले. प्रवेश संपला की विंगेत यायचं. कोचावर आराम करायचा. डॉक्टरकडून डोस घ्यायचा आणि पुढच्या प्रवेश आला की पुन्हा स्टेज गाजवायचं. त्या दिवशी कृष्णरावांनी संपूर्ण नाटक नेहमीपेक्षा जास्त रंगवलं. आश्चर्य म्हणजे दुसर्‍या दिवसापासून त्यांना आराम पडत गेला. बुधवारच्या खेळासाठी कृष्णराव ठणठणीत होते.
प्रबोधनकारांनी कृष्णरावांविषयी सांगितलेला दुसरा प्रसंग तर निष्ठेची परिसीमा म्हणावी असाच आहे. कंपनीचा मुक्काम अमरावतीच्या जवळच्या बेलोराया गावी होता. कृष्णरावांचा नवसांनी झालेला एकुलता एक मुलगा वाई इथे एकाएकी वारल्याची तार आली. तार सकाळी पोचली आणि रात्री प्रयोग होता. कंपनीत सगळ्यांनाच मुलाचा लळा असल्यामुळे सगळेच उदास झाले. कुणीही जेवलं नाही. कृष्णराव तर केविलवाणे झाले होते. कुणाला त्यांचं सांत्वनही करायलाही जमत नव्हतं. रात्रीच्या खेळाला कृष्णरावांना सुटी देण्याचा निर्णय तालीम मास्तर जनुभाऊ निंबकरांनी घेतला. पण ठरलेली वेळ होताच कृष्णराव मेकअपसाठी हजर झाले. इतक्या दुःखाच्या प्रसंगातही त्यांनी आपली भूमिका खणखणीत पार पाडली.
ही निष्ठा प्रबोधनकारांना पुढच्या आयुष्यात नाटक व्यवसायातल्या परीक्षेच्या प्रसंगी प्रेरणादायी नक्कीच ठरली असणार.

– सचिन परब

(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)

Previous Post

बाप निर्माता… दिलीप जाधव

Next Post

जया अंगी ‘थोर’पण!

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post

जया अंगी ‘थोर’पण!

पाठीलेच लागून असेल गाव…

पाठीलेच लागून असेल गाव...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.