• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

व्यंगचित्रांतून बोचर्‍या गोष्टी मार्मिक पद्धतीने पोहोचतात

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे मत

Nitin Phanse by Nitin Phanse
June 15, 2023
in घडामोडी
0
व्यंगचित्रांतून बोचर्‍या गोष्टी मार्मिक पद्धतीने पोहोचतात

व्यंगचित्र हे समाजप्रबोधनाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. एका व्यंगचित्रामध्ये खूप मोठा आशय लपलेला असतो. व्यंगचित्रांच्या माध्यमातून दुखर्‍या, बोचर्‍या गोष्टी हसतखेळत मार्मिक पद्धतीने अगदी सहजतेने समाजापर्यंत पोहोचवता येतात, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळकडू’ या व्यंगचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी केले होते. शिवसेना सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, प्रशांत राणे सचिव मकरंद पेटकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसाद चावरे, गणेश वायाळ, नंदू येवले, नितीन रावळ, संजय साळवी, मनीष घरत,राजेश शेलार, दिनेश पोटे, गणपत साळुंखे, दिलीप पोमन, प्रकाश चव्हाण, व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी, धनराज गरडआदी यावेळी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुखांनी व्यंगचित्रांतून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. व्यंगचित्रांतून ठाम पद्धतीने मांडणी करण्यासाठीदेखील धाडस लागते. ते धाडस शिवसेनाप्रमुखांमध्ये होते. कमी शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वात प्रभावी माध्यम आहे.
या स्पर्धेत युवा गटामध्ये (१८ वर्षांखालील गट) प्रथम क्रमांक यश गायकवाड, द्वितीय क्रमांक निमिश सामंत, तृतीय क्रमांक मनोमय नार्वेकर यांनी पटकावला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक आभास शिळीमकर, शेराता क्षत्रिय, जीजा पापळ यांना प्रदान करण्यात आली. खुल्या गटामध्ये विजय नांगरे यांनी प्रथम, सुनील नेटके यांनी द्वितीय, श्रीपाद पालकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर वासुदेव बोंदरे, तोफिक बागवान, मुकीम तांबोळी, गौतम दिवार, शरद महाजन यांना उत्तेजनार्थ पारितोषक देण्यात आले.

Previous Post

या चक्रीवादळाला महाराष्ट्रच थोपवेल…

Next Post

…अशा शिवसैनिकांचा मला अभिमानच आहे!

Next Post
…अशा शिवसैनिकांचा मला अभिमानच आहे!

...अशा शिवसैनिकांचा मला अभिमानच आहे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.