• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home कारण राजकारण

गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 15, 2022
in कारण राजकारण
0
गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!
Share on FacebookShare on Twitter

लोकशाहीत निवडणुकांचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि त्याहून महत्त्वपूर्ण आहे निवडणुकीत जिंकून येणे. भारतीय जनता पक्ष आणि त्याआधीचा जनसंघ या पक्षांनी अनेक वर्षे कित्येक निवडणुकांमध्ये फक्त स्वतःचे डिपॉजिट घालवण्याचे काम केले, पण तरीदेखील ते चिवटपणे प्रत्येक लहान सहान निवडणूक लढवत होते. उमेदवाराच्या घरचे लोकच त्याला मतदान करतील, अशा परिस्थितीपासून तुटपुंजा जनसंपर्क असलेले साधारण उमेदवार उभे करून आणि त्याकाळात होणारी कुचेष्टा पचवून जनसंघ व नंतर भाजप निवडणुका लढवत राहिला. त्या काळात त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ देखील फारसे नव्हते, पण चिकाटी होती. निवडणुकीच्या मैदानात वर्षानुवर्ष टिकून राहात, सततच्या प्रयत्नाने भाजप सत्तेत आला. एकदा सत्तेत आल्यावर सत्ता राबवून परत परत सत्ता मिळवायचे एक कसब जे आधी फक्त काँग्रेसकडे होते ते आता भाजपला साधलेले आहे, हेच गुजरात निवडणुकीने दाखवून दिले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत इतके सातत्याने एकहाती यश मिळवण्याचा पराक्रम काँग्रेसव्यतिरिक्त फक्त बंगालमधील कम्युनिस्ट पक्षाने गाजवला होता. गुजरातच्या या वेळच्या निवडणुकीत आधीपेक्षा भाजपला फक्त अडीच टक्के जास्तीची मते मिळाली, पण त्यांच्या जागा मात्र तब्बल एकोणसाठी वाढल्या. आम आदमी पक्ष अर्थात आप या पक्षाच्या आगमनाने तिरंगी लढती झाल्या आणि त्यांचा थेट फायदा भाजपला झाला. आप ही भाजपची बी-टीम मानली जाते, हेही इथे लक्षात ठेवायला हरकत नाही.
सुरतच्या महानगरपालिकेत आपला सत्तावीस जागा मिळाल्या होत्या आणि त्यात एकेकाळी हार्दिक पटेल यांच्यासोबत पाटीदार आंदोलनात सहभागी असलेला एक मोठा वर्ग आपसोबत गेला होता, असे मानले जाते. सुरतच्या यशानंतर आप राज्य पातळीवर उतरणार हे ओळखून भाजपने रणनीती आखली आणि स्वतःची मते फुटू दिली नाहीत. आपचा प्रचार सुशासनावर आधारित असल्यामुळे त्याचा फटका खरेतर सत्ताधारी भाजपला बसणे अपेक्षित होते. पण भाजपपेक्षा तो काँग्रेस पक्षाला जास्त बसला, हे आक्रीत कसे काय घडले? आपला हे हिमाचलमध्ये का नाही जमले? भाजप आणि आप हे दोन्ही विरोधक आहेत आणि एक नवीन विरोधक आल्यावर स्वतःचे बालेकिल्ले सांभाळण्यासाठी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावणे गरजेचे होते. गुजरातमध्ये स्वतःचे साठ गड घालवणे ही कामगिरी काँग्रेससाठी निराशाजनक आहे.
भाजपने गुजरातमध्ये कोणतीही चूक केली नाही. गुजरातच्या विधानसभेत भाजपने यावेळी निर्विवाद आणि आजवरचा सर्वात मोठा विजय मिळवून दाखवला आहे, हे विनाशर्त मान्य करावे लागेल. या यशासाठी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा या केंद्रात राहूनही चित्त कायम गुजरातेत असलेल्या केंद्रीय नेत्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. गुजरातमध्ये तिरंगी लढतीमुळे चुरस होती. कोणावर काय परिणाम होईल, याचा अंदाज लावणे कठीण होते. मात्र, मोदींचे पारडे जड आहे, हे ‘मार्मिक’ने निवडणूकपूर्व लेखनातून मांडले होते. मोदी यांनी स्वतःला गुजराती अस्मितेशी बेमालूमपणे जोडून घेतल्याने गुजरातमधील मतदार जात, पात, वर्ग यापलीकडे जाऊन निव्वळ एक गुजराती माणूस या देशाचा पंतप्रधान आहे आणि त्याला राज्यातून ताकद दिली पाहिजे, या एकाच विचाराने एकवटून पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभा राहतो, हेच या निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आले आहे. महागाईचा मुद्दाच या निवडणुकीत चालू नये, गुजरात सरकारसाठी लांच्छनास्पद असलेली मोरबी पूल दुर्घटना आणि तिच्यातील मुख्य संशयिताला फरारी होण्याची संधी दिली जाणे, हेही या निवडणुकीत विसरले जावे, इतकी गुजरातची अस्मिता आणि मोदींची इमेज यांची सांगड मोदींनी घालून ठेवली आहे. हा चक्रव्यूह विरोधक भेदूच शकत नाहीत. गुजरातकडून मराठी माणसाने हा अस्मितेचा आणि एकीचा पाठ नक्कीच घ्यायला हवा. या विजयासाठी हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांच्यासारखे पळवलेले काँग्रेसी नेते आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर ही देखील महत्वपूर्ण कारणे होती. गुजरातमध्ये काँग्रेसने जे गमावले ते भरून येणे अशक्य आहे. पण, आता निदान जिग्नेश मेवानीसारखा शिलेदार त्यांनी जपावा. ‘भारत जोडो’ यात्रेचा गुजरात निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कोणताच फायदा झालेला दिसत नाही. उलट पक्षनेतृत्व व पक्षाची ताकद ‘भारत जोडो’ यात्रेत परमार्थ साधत असताना भाजपने सर्व ताकद या यात्रेला विरोध करण्यात न लावता निवडणुकीत लावून सत्तेचा स्वार्थ साधून घेतला. ‘भारत जोडो’ यात्रा महत्वपूर्ण आहेच, पण एका राज्याच्या निवडणुकीवर जास्त लक्ष देणे हे त्या पक्षाचे प्रथम राजकीय कर्तव्य होते. भाजप आणि पंतप्रधान मोदी यानी स्वतःचे घर राखले आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र ठरतात ते यामुळेच.
पण, मोदींभोवती आरत्या ओवाळण्यात जीवनाची सार्थकता शोधणारे भक्त आणि गोदी मीडिया यांनी मोदी मॅजिकचे जे काही ढोल वाजवणं सुरू केलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच आता २०२४च्या निवडणुकीत देश मोदी यांच्या मागेच उभा राहणार आहे, असे जे काही भविष्य मांडले आहे, त्याला काही अर्थ नाही. मोदींची जादू संपूर्ण देशभर चालते का? नाही चालत. मोदींची जादू त्यांच्या विखारी विचारसरणीच्या प्रयोगशाळा असलेल्या गुजरात आणि उत्तर प्रदेशातच चालताना दिसते. इतरत्र काय घडते ते याच दिवशी लागलेल्या इतर निकालांनी दाखवून दिले आहे. फक्त मोदी, मोदीच्या जयजयकारात तो आवाजच लोकांपर्यंत पोहोचू नये, अशी काळजी भक्तगण घेताना दिसत आहेत. गुजरातचा हा वाघोबा हिमाचल आणि दिल्ली निवडणुकीत साधा वाघ्याच ठरलेला आहे. पोटनिवडणुकांमध्येही काही मोदींची लाट वगैरे उसळलेली नाही.
एकेकाळी असे म्हटले जायचे की काँग्रेसने शेंदूर लावून दगड उभा केला तरी तो निवडणुकीत निवडून येईल. तो निवडून यावा यासाठी पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, नरसिंह राव, राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्यांनी २४ तास देशभर फक्त आपला फोटो दिसेल, आपल्याच बातम्या येतील, अशी काही व्यवस्था केल्याचे ऐकिवात नाही आणि देशाचा कारभार हाकायचा सोडून ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणुकांना वाहून घेतानाही दिसले नाहीत. अशावेळी जे घडते, ते मॅजिक असते, ती जादू असते. एवढे प्रचंड कष्ट उपसून, निवडणूक एके निवडणूक करून, सगळी माध्यमं प्रचारासाठी राबवून फक्त गृहराज्य राखता येत असेल आणि इतरत्र हातातली सत्ता जात असेल, तर त्याला जादू कसे म्हणता येईल?
गुजरातप्रमाणे हिमाचल प्रदेशात आणि दिल्ली महानगरपालिकेत देखील भाजप सत्तेत होता. दोन्ही ठिकाणी पंतप्रधान तेवढ्याच हिरीरीने निवडणूक प्रचारात उतरले होते. हिमाचलात अँब्युलन्सला वाट देण्याचा हास्यास्पद प्रचारप्रयोगही करून झाला होता. तरी लोकांनी तथाकथित डबल इंजीन सरकारचा भ्रम मोडून फेकून दिला आहे. इथे ना मोदींचा चमत्कार चालला, ना ईडीची धमकी चालली, ना भाजपचे भोंदू हिंदुत्व चालले, ना भाजपची महाशक्ती चालली. म्हणजे भाजप अजिंक्य आहे, अशातला काही भाग नाही. जिथे सक्षम पर्याय आहे, तिथे लोक भाजपला आणि मोदींच्या आकर्षणाला भुलत नाहीत, हे स्पष्ट आहे.
देशभरातून काँग्रेसचे जणू उच्चाटन झाले आहे अशी एक निखालस खोटी राजकीय प्रचारमोहीम भाजप गेली आठ-नऊ वर्षे राबवत आला आहे. इतकी वर्षं उच्चाटन होतंच आहे? ते पूर्ण झालेलंच नाही? पण, हे पर्सेप्शन लोकांच्या गळ्यात उतरवल्यामुळे गुजरातध्ये महाविजय झाला, पण, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने सत्तेतून खाली खेचले तर तो साधारण विजय, अशी मांडणी केली जाते. खोलात जाऊन पाहिले तर काँग्रेसचा हिमाचल विजय राखेतून जिवंत होणार्‍या फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. हिमाचल प्रदेशात भाजपचे तथाकथित डबल इंजीन सरकार होते. साक्षात देवभूमी असलेल्या त्या राज्यातले मतदार सनातन धर्म मानणारे सच्चे हिंदूच आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा त्याच राज्याचे आहेत. तिथे बंडखोरांना स्वतः पंतप्रधान मोदीनी फोन केले होते. थोडक्यात जे जे गुजरातमध्ये होते, तेच हिमाचल प्रदेशातही होते. तरीही तिथे लोकांनी काँग्रेसला कौल दिला. ६८ पैकी ४० जागा त्या पक्षाने जिंकल्या आहेत. या पक्षाचे संघटन एकदिलाने नीट काम करणार असेल, तेव्हा ते आज देखील भाजपचा सहज पराभव करू शकते, याचे उदाहरण हिमाचलने दाखवून दिले आहे.
काँग्रेस संपली असे मोदी आणि आता अरविंद केजरीवाल हे एकमुखाने सतत सांगत असतात, तरीही आजही काँग्रेसची पाळेमुळे या देशाचा खेड्यापाड्यापर्यंत रुजलेली आहेत. त्यामुळेच राहूल गांधीनी भारत जोडो यात्रेनंतर स्वतःला देशपातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी झोकून दिले, तर दिल्ली गोदी मीडियाला वाटते तेवढी दूर नाही. देशपातळीवर आजदेखील फक्त काँग्रेस हाच भाजपसाठी एक तगडे आव्हान असलेला पक्ष आहे, हे पंतप्रधान मोदींना चांगले माहिती आहे. त्यामुळेच, हिमाचल प्रदेशात सध्या काँग्रेसचे सरकार येऊ दिले जाईल. पण महाराष्ट्राप्रमाणे तिथेही नंतर खोक्यांचा गलिच्छ प्रयोग केला जाऊ शकतो, ही धास्ती आहेच.
दिल्लीत महानगरपालिकेमध्ये भाजप पंधरा वर्ष सत्तेत होती, पण केजरीवाल यांनी तिथे झाडू फिरवत भाजपला सत्तेतून बाहेर फेकले. तिथे आम आदमी पक्षाने २५०पैकी १३४ जागा जिंकून स्वबळावर सत्ता मिळवून दाखवली. शंभर खासदार, कॅबिनेट मंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान अशी मोठी फौज घेऊन भाजप एका महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरला होता. दिमतीला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स होतेच. सोयीनुसार केलेली वॉर्ड पुनर्रचना देखील होती. पण या सर्वाला एकटे केजरीवाल झाडू घेऊन सामोरे गेले आणि त्या महाशक्तीला ते एकटे पुरून उरले. आम आदमी पक्ष दोनशे जागांची बढाई मारत होता, पण ती मजल त्यांना मारता आली नाही. शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दिल्लीत काँग्रेस फक्त नऊ जागा मिळवून औषधाला शिल्लक राहिली आहे. काँग्रेसने आता महानगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत स्वतःची सर्व ताकद पणाला लावणे गरजेचे आहे. कारण आज देशभरात शहरी मतदार वाढतो आहे. पूर्वी सत्तेची चावी ग्रामीण मतदारांकडे होती ती आता बर्‍याच राज्यांत शहरी मतदारांकडे आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात शहरी मतदार ग्रामीण मतदारांपेक्षा जास्त आहे. महानगरपालिकेत विजय मिळवून स्वतःची पाळेमुळे घट्ट करून घ्यायची असतात, तरच विधानसभा आणि लोकसभेची फळे मिळवता येतात, हे ओळखून भाजप महानगरपालिकेच्या निवडणुकीतदेखील पंतप्रधान मोदींना प्रचारात उतरवतो. पण मोदी या नावावर मते मागत भाजप फार काळ यश मिळवू शकणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. मतदार जागा झाला आहे. पोटनिवडणुकीत देखील भाजप सहापैकी दोन ठिकाणीच जिंकून आला. छत्तीसगडमध्ये आजवर एकदेखील पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळवता आला नाही. मुलायम सिंह यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या सूनबाई डिंपल यादव निवडून येणे अपेक्षित होते, पण त्यांचे मताधिक्य भाजपच्या उत्तर प्रदेशातील बुलडोझर सरकारवरची मतदारांची नाराजी सांगणारे आहे.
मोदी या वयात देखील जणू प्रत्येक निवडणूक ही पहिली निवडणूक आहे या उत्साहात प्रचारात उतरतात. तसाच उत्साह त्यांनी इव्हेंटबाजीऐवजी खर्‍याखुर्‍या सर्वसमावेशक, विकासात्मक कामांमध्ये दाखवला असता तर दरवेळी त्यांना सवंग भावनांना हात घालणारा प्रचाराचा भडक भावुक झगमगाट करावा लागला नसता. भावनेला हात घालून, प्रकल्प पळवून गुजरातची सत्ता हातात आली. पण देशपातळीवरील लोकसभा निवडणुकीत हे चालणारे नाही. इतरत्र वाघोबा बनण्यासाठी वाघ्याला वेगळी मेहनत घ्यावी लागेल, असा या निकालांचा अर्थ आहे.

Previous Post

इतिहास घडवणारा ग्रामण्यांचा इतिहास

Next Post

…तर तोंड काळं होणार नाही!

Related Posts

कारण राजकारण

शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

January 5, 2023
कारण राजकारण

भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

January 5, 2023
कारण राजकारण

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

December 8, 2022
तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?
कारण राजकारण

तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

December 8, 2022
Next Post
…तर तोंड काळं होणार नाही!

...तर तोंड काळं होणार नाही!

टपल्या आणि टिचक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023

भविष्यवाणी २८ जानेवारी

January 27, 2023

अन हरवलेला सापडला…

January 27, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.