• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मूग घावन/धिरडे/पूडला/मुगलेट

- शुभा प्रभू साटम (हॉटेलसारखे... घरच्या घरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 15, 2022
in हॉटेलसारखे... घरच्या घरी
0

घावन मराठी माणसाला नवे नाही, त्यातही मालवणी माणसाला तर नाहीच नाही.आता या घवनाचा गुजराती अवतार पुडला म्हणून आहे.ज्याला आज मुगलेट म्हणून स्ट्रीट फूडमध्ये ओळखले जाते.
जसे टोमॅटो ऑमलेट तसेच मुगलेट. आणि गुजराथी खवैयांनी त्यात मग चीझ टाकणे ओघाने आलेच.
आजकाल हे मुगलेट लै म्हणजे लै पॉप्युलर होऊन राहिले. सध्या मिलेनियल म्हणा किंवा तत्सम लोक वेगान जेवणाच्या अतिशय प्रेमात.पुन्हा त्यात नो कार्ब/नो नट्स असे अनेक निर्बंध. वास्तविक आपले पारंपरिक भारतीय जेवण आहे ते थोडेफार वेगन असतेच. आपण कुठे प्रत्येक वेळी ब्रेड खातो की मटण चिकन गिळतो. तर जे मराठी मूग धिरडे आहे त्याचा गुजराथी अवतार पुडला. आजकाल प्रत्येक फूड ब्लॉगरच्या फिडवर मुग्लेट अथवा पूडला असायलाच हवा.
जगभरातील जेवण किंवा खाणे पिणे बघितले तर आशिया आणि त्यातही दक्षिण पूर्व आशिया, आप्रिâका, मेक्सिको, थोडे फार मध्य पूर्व देश इथले जेवण अधिक पौष्टिक असते हे सिद्ध झाले आहे. मुख्य कारण भरपूर धान्य आणि भाज्या वापर. भारतात तर भाज्या आणि धान्य, कडधान्य अमाप वापरली जातात. त्यामुळे विविध प्रकार खाण्यापिण्यात आढळून येतात. त्यातील एक धिरडे, पुडला!
मूग डाळ धिरडे नवे नाही पण त्याला थोडा नवा टच देवून त्याचे पारंपरिक एकदम रूप पालटून टाकले आहे. भिजवून वाटलेली मूग डाळ, तेल, मीठ, मिरची बास इतक्या साहित्यावर पुडला होतो.
मूग डाळ पचायला हलकी, परत तळलेले नसल्याने त्रास नाही, डब्यात जरी दिला तरी गार खाता येतो. अनेक वैशिष्ट्ये आहेत.
आज बघु या फूड ब्लॉगर्स ला वेड लावणार्‍या पुडल्याचे वेगळे प्रकार. आता शाळा ऑफिस सुरू झाल्यात, साहजिक डबा काय हा गेले दोन अडीच वर्षे मागे पडलेला प्रश्न उभा आहेच.असा पूडला केला की झंझट नाही.
पुडला करताना पिवळी मूग डाळ घेतात. तुम्हाला आवडत असल्यास सालासकट डाळ घेवू शकता.
साहित्य :
मूग डाळ पाचेक तास पाण्यात भिजवून, वाटून
हिरवी मिरची, आले, कोथिंबीर बारीक वाटून
मीठ साखर.
आता व्हॅल्यू एडिशन.
बारीक चिरलेला कोबी/गाजर/मेथी/बीट/शिमला/पालक/उकडलेला बटाटा/मका/राजमा काहीही. किंचित परतून शिजवून
चीझ किसून
पिझ्झा मसाला
केचप सॉस आवडीप्रमाणे. पण टाळल्यास उत्तम.

कृती-१

तव्यावर तेल/तूप घालून पीठ पसरून घ्यावे. फार पातळ नको.
वरून भाज्या, चीझ घालून, झाकण ठेवून मंद आगीवर दोन मिनिटे शेकावावे. झाले.

कृती-२

स्टफ्फ पुडला तव्यावर नेहमीप्रमाणे पीठ घालून धिरडे करावे.
त्यावर भाजी/चीझ पसरून वरून परत पीठ घालून, मंद आगीवर शेकू द्यावे.
अलगद उलटे करून पुन्हा थोडावेळ भाजावे आणि पिझ्झा त्रिकोण असतो तसे कापून द्यावे.

Previous Post

मौसम इज ऑसम!

Next Post

मास्टर माइंड

Next Post

मास्टर माइंड

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.