अशी आहे ग्रहस्थिती
राहू आणि हर्षल (वक्री) मेषेत, मंगळ (वक्री) मिथुनेत, रवि-केतु-बुध (अस्त ) तुळेत, १४ नोव्हेंबर नंतर बुध वृश्चिकेत, १७ नोव्हेंबरनंतर रवि वृश्चिकेत, शुक्र वृश्चिकेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु -मीन राशीत, नेपच्युन कुंभेत. दिनविशेष – २० नोव्हेंबर उत्पत्ती एकादशी.
मेष – मनाचे समाधान करणारे अनुभव तुम्हाला या काळात येतील. बुद्धीच्या जोरावर एखादे काम मिळवण्यात यशस्वी व्हाल. घरामध्ये भावाकडून चांगले सहकार्य मिळेल. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी प्रवास होतील, त्यामुळे थोडी दगदग होण्याची शक्यता आहे. संततीबाबत भाग्यवर्धक घटना घडतील. प्राध्यापक, प्रवचनकार, वक्ते यांना विशेष प्रसिद्धी मिळेल. उच्चपदावर काम करणार्या मंडळींनी कामाच्या ठिकाणी आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्याचे धाडस केले तर ते अंगाशी येऊन नसती आफत मागे लागू शकेल. आपल्या हातून कोणाची निंदा होणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ – नोकरीमध्ये असणार्या मंडळींनी कोणत्याही लोभाला बळी न पडता आपले काम करत राहावे. कामाच्या ठिकाणी आपल्या सहकार्याबरोबर जमवून घ्यावे लागेल. उगाचच छोट्या कारणामुळे वाद निर्माण झाले तर वादाचे प्रसंग टाळा. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी चांगला काळ राहणार आहे. तुमचे नातेवाईक, व्यावसायिक भागीदार यांच्या माध्यमातून विदेशात उद्योग विस्तार करण्यासाठी काही प्रयत्न सुरु असतील, तर त्यामध्ये घवघवीत यश मिळालेले दिसेल. पत्रकार, ज्योतिषी या क्षेत्रातील मंडळींना धनप्राप्तीचे योग जुळून येतील. त्यामधून भविष्यात चांगला फायदा मिळेल.
मिथुन – अति कामामुळे शरीराला दगदग होण्याची शक्यता आहे. डोक्यावर मानसिक ताण वाढल्यामुळे कामात विस्कळीतपणा निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ देऊ नका. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पैसे खर्च होऊन खिशाला झळ पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात पैसे सांभाळून ठेवा, म्हणजे झाले. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. काही मंडळींना आपल्या बुद्धीच्या जोरावर चांगली प्रसिद्धी मिळेल. सार्वजनिक जीवनात नावलौकिकात भर पडलेली दिसेल. राजकीय व्यक्तींना प्रसिद्धीप्राप्ती मिळवून देण्याचा काळ राहील.
कर्क – सट्टा, ब्रोकरेज, लॉटरी या व्यवसायात असणार्या मंडळींना चांगले पैसे मिळतील. तुमचा स्पष्टवक्तेपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. नोकरी, कामाच्या ठिकाणी त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंना ऐन मोक्याच्या क्षणी अपयश येण्याची दाट शक्यता आहे. घरामध्ये पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीत वाद सुरु असतील, तर त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील. भावंडांमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या.
सिंह – क्रीडाक्षेत्र, करमणूक करणारे कलाकार यांना त्यांच्या क्षेत्रात भरघोस यश मिळेल. राजकीय व्यक्तींना कुशल संघटकांची भूमिका पार पाडावी लागू शकते, त्यामध्ये यश मिळेल. महिला वर्गाने आरोग्याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी सुखाचे दिवस अनुभवायास मिळतील. नवीन नोकरीची संधी समोर येऊ शकते. कामाच्या निमित्ताने विदेशात जावे लागू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. घरातील जेष्ठ मंडळींची काळजी घ्या.
कन्या – आगामी काळात विद्यार्थी वर्गाला शिक्षण क्षेत्रात घवघवीत यश मिळेल. विदेशातून एखादी शिष्यवृत्ती देखील मिळू शकते. लेखक, पत्रकार व समाज माध्यमामध्ये काम करणार्या मंडळींना हा आठवडा अगदी उत्तम जाणार आहे. संशोधन कार्यात यश मिळेल. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्याबाबत मानसिक चिंता सतावू शकते. नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक स्थिती राहणार आहे. पत्नीची काळजी घ्या.
तूळ – आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून काम करत राहा, म्हणजे अडचण येणार नाही. नोकरदार मंडळींना कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. आगामी आठवडा तुम्हाला चांगला जाणार आहे, मित्रमंडळी आणि बंधुवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. गायन, अभिनय, फोटोग्राफीचा छंद असणार्या मंडळींना अचानकपणे अनपेक्षित लाभ होतील. कलाकार मंडळींचा सरकारकडून गौरव होईल. प्रवास करताना काळजी घ्या. प्रवास करताना काळजी घ्या, वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक – आठवड्याचे सुरुवातीचे तीन दिवस विशेष लाभाचे राहणार आहेत. कामाच्या ठिकाणी भरपूर कष्ट करावे लागणार आहेत, त्यामुळे थोडे त्रासलेले असाल. आर्थिक स्थिती भक्कम राहणार आहे. व्यावसायिक मंडळींना चांगला फायदा मिळेल. राजकीय व्यक्तींना जनमानसात अनुकूल यश मिळेल. पत्नीकडून आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल, त्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
धनू – धार्मिक कार्यामध्ये जास्त काळ रमाल. शत्रूपासून सावध राहा, नाहीतर एखाद्या कट कारस्थानाचे बळी व्हाल. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. प्रकृतीसाठी अयोग्य काळ राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक पेच सुटतील. भावंडाना पैशाच्या स्वरूपात मदत करावी लागेल. मात्र, कोणताही आाfर्थक व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या. संततीच्या बाबतीत एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते.
मकर – अनेक दिवसांपासून संधीच्या शोधात असाल तर ती आता दारामध्ये येणार आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचे पुण्य पदरात पडणार आहे, त्याचा अनुभव या आठवड्यात येईल. तुमच्या हातून एखादे शुभ कार्य घडेल. लेखकाना, जागतिक पातळीवर काम करणार्या मंडळींना चांगली पतप्रतिष्ठा मिळेल, त्यामुळे ही मंडळी खूष राहतील. नवीन व्यवसायाचा मार्ग सुचू शकतो. त्यामधून चांगले अर्थार्जन होईल. विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. साडेसातीचा काळ सुरु आहे, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा.
कुंभ – अनपेक्षित खर्च समोर येतील, त्यामुळे त्यासाठी आर्थिक नियोजन करून ठेवा. हितशत्रूंपासून लांब राहा. पगार मिळण्यास काही ना काही कारणामुळे विलंब होऊ शकतो. विवाहेच्छू मंडळींना सकारात्मक बातमी कानावर पडेल. सासुरवाडीकडून चांगले लाभ होतील. मित्रमंडळींचा आधार मिळेल. एखादी उंची वस्तू भेट म्हणून मिळेल. व्यावसायिक मंडळींना विशेष लाभ होतील. सार्वजनिक क्षेत्रात यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मीन – या आठवड्यात आपल्या हातून एखादे लोकोपयोगी कार्य घडणार आहे. धार्मिक कार्याच्या निमित्ताने प्रवास होतील, व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळू शकतात. वकिली क्षेत्रात असणार्या मंडळींना फायद्याचा काळ राहणार आहे. राजकीय मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे, एखादे चांगले पद मिळू शकते. सत्कार-समारंभ याच्यावर पैसे खर्च होतील. आठवड्याचे सुरुवातीचे दोन-तीन दिवस मानसन्मानाचे राहणार आहेत.