• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    मोदी है तो मुमकिन है…

    आपल्यापेक्षा बेडूक हुशार!

    निर्मलाक्का! जमिनीवर या!

    मुद्रित माध्यमांचे मारेकरी

    हसू नका, आपण जात्यात आहोत!

    सरकारी संताची जळजळ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    हिंदुत्त्व : बाटग्यांचे नकली आणि शिवसेनेचे बावनकशी!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    कोल्हापुरात साकारले एकीचे बळ

    जरा याद रखो कामगिरी!

    जनाब फडणवीस, हे सगळे कुठून येते?

    दडपलेल्या खर्‍या काश्मीर फाइल्स

  • भाष्य

    असे साकारले महाराष्ट्र गीत!

    क्रिकेटपटू, उद्योगपती आणि समाजसेवक

    दिवाळी अंकांचा सुप्रीमो… ‘आवाज’

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    व्यंगचित्रकलेचे विद्यापीठ

    शिवरायांच्या तडाख्यातून मेंगलोर कसेबसे बचावले होते..!

    Trending Tags

  • मनोरंजन

    झाँबी चावला…

    सुमनसुगंधाची अविरत दरवळ

    विजय तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर

    फेब्रुवारीत रंगणार बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

    झी टीव्हीवर ‘स्वर्ण स्वर भारत’

    फरहान, रोहित शेट्टीचे खडतर प्रशिक्षण

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    मोदी है तो मुमकिन है…

    आपल्यापेक्षा बेडूक हुशार!

    निर्मलाक्का! जमिनीवर या!

    मुद्रित माध्यमांचे मारेकरी

    हसू नका, आपण जात्यात आहोत!

    सरकारी संताची जळजळ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    हिंदुत्त्व : बाटग्यांचे नकली आणि शिवसेनेचे बावनकशी!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    कोल्हापुरात साकारले एकीचे बळ

    जरा याद रखो कामगिरी!

    जनाब फडणवीस, हे सगळे कुठून येते?

    दडपलेल्या खर्‍या काश्मीर फाइल्स

  • भाष्य

    असे साकारले महाराष्ट्र गीत!

    क्रिकेटपटू, उद्योगपती आणि समाजसेवक

    दिवाळी अंकांचा सुप्रीमो… ‘आवाज’

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    व्यंगचित्रकलेचे विद्यापीठ

    शिवरायांच्या तडाख्यातून मेंगलोर कसेबसे बचावले होते..!

    Trending Tags

  • मनोरंजन

    झाँबी चावला…

    सुमनसुगंधाची अविरत दरवळ

    विजय तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर

    फेब्रुवारीत रंगणार बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

    झी टीव्हीवर ‘स्वर्ण स्वर भारत’

    फरहान, रोहित शेट्टीचे खडतर प्रशिक्षण

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home शेअर मार्केट

अभ्यासोनि गुंतवावे (धन)!

उदय कुलकर्णी (ओळख शेअर मार्केटची - १)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 9, 2021
in शेअर मार्केट
0
Share on FacebookShare on Twitter

मराठी माणूस शेअर बाजारात गुंतवणूक करत नाही, ही गैरसमजूत आहे. अनेक मराठी माणसं या बाजारात नाव कमावून आहेत. एका रात्रीत इथे रंकाचा राव होतो, रावाचा रंक होतो, हे खरे. पण, हे मार्केट स्थिर आणि उत्तम गुंतवणूक आणि चांगला परतावा देणारेही आहे. फक्त दुसर्‍यावर विसंबून गुंतवणूक करता अभ्यास करून गुंतवणूक करण्याची गरज आहे. या शेअर बाजाराची ओळख करून देणार्‍या लेखमालेचा पहिला भाग.
—-

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आला आहे (ज्याचे नंतर ओमीक्रॉन नामकरण झाले) पुन्हा टाळेबंदी येणार, युरोपमधील काही देशात ती केलीही अशा बातम्या आल्या, इतरही काही नकारात्मक बातम्या आल्या आणि शुक्रवार २६-११-२०२१ला भारतीय शेअरबाजार कोसळला. सेन्सेक्स हा निर्देशांक १६८७ अंकांनी खाली येऊन ५७१०७वर बंद झाला तर निफ्टी हा निर्देशांक ५०९ अंकांनी खाली येऊन १७०२६वर बंद झाला. एचडीएफसी बँकेचा शेअर ३६ अंकांनी खाली आला, टाटा मोटर्सचा शेअर ३२ अंकांनी खाली आला. असे अनेक शेअर खाली आले. लेखाची सुरुवात अशी केल्यावर कोणी म्हणेल हे ‘मार्मिक’मध्ये कशासाठी दिलं जातंय? मराठी माणसाला कुठे शेअरबाजारात इंटरेस्ट आहे? तो कुठे त्यात गुंतवणूक करतो? तो तर पोस्ट ऑफिस, बँकांच्या मुदतठेवी यात पैसे गुंतवतो. तर कसं आहे की मराठी माणसाबाबत आपण काही मिथकं बनवून ठेवलेली आहेत आणि सध्या वस्तुस्थिती काय आहे याचा विचार करून त्यात बदल व्हायला हवा, तो होत नाही. आजच्या स्थितीचा विचार केला तर अनेक मराठी माणसे शेअरबाजारात गुंतवणूक करतात; इतकेच काय, बिझनेस चॅनेलवर येणारे काही तज्ज्ञ, विश्लेषक मराठी आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (एनएसई) मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ विक्रम लिमये ही एक मराठी व्यक्ती आहे. शेअरबाजारात आमूलाग्र बदल घडवणार्‍या ज्या व्यक्ती होत्या त्यात सी. बी. भावे (चंद्रशेखर भावे) यांनी फार मोलाची कामगिरी बजावली. संपूर्ण शेअरबाजार, सिक्युरिटीज आणि कमोडिटी मार्केटवर नियंत्रण ठेवणार्‍या सेबी म्हणजे सिक्युरिटीज अ‍ॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ह्या सर्वोच्च नियामक संस्थेचे ते २००८मध्ये चेअरमन झाले होते. त्यामुळे मराठी माणूस आणि शेअरबाजार याचा संबंध नाही ह्या गृहितकाला चिकटून राहाण्यात अर्थ नाही. प्रत्येक समाजात अनेक स्तर असतात, वेगवेगळ्या प्रकारची माणसे असतात. तसेच मराठी समाजातही शेअरबाजारात गुंतवणूक करणारे लोक आहेत, न करणारे लोक आहेत; पण गुंतवणूक करतच नाही हा शिक्का संपूर्ण समाजावर मारणे चुकीचे आहे. जे शेअरबाजारात सध्या गुंतवणूक करत नाहीत, पण त्याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी या लेखमालेतून आपण थोडक्यात माहिती समजावून घेणार आहोत.
काही गैरसमज मनातून आधी काढून टाकू, शेअरबाजार म्हणजे सट्टेबाजी नाही, ते हमखास पैसे गमावण्याचे ठिकाण नाही किंवा फायदा झाला तर लगेच दसपट पैसे मिळवून देणारे आणि झटपट श्रीमंत होण्याचे ठिकाणही नाही. तसेच ते अतिधनाढ्य लोकांसाठीचेच मार्केटही नाही. त्यात मध्यमवर्गीय लोकही गुंतवणूक करतात. आपल्या आजुबाजूचे लोक यात गुंतवणूक करतात, त्यामुळे या मार्वेâटच्या वाटेला न गेलेल्यांनाही याची थोडीफार माहिती असेल. तथापि त्यात गुंतवणूक करण्याइतकी माहिती त्यांना नसेल आणि हा फार किचकट, गुंतागुंतीचा विषय आहे, जोखीम जास्त आहे असे त्यांना कदाचित वाटत असेल. पण आता बँका मुदतठेवीवर ५.५० टक्के व्याज देतात, जे फारच कमी आहे. दुसरीकडे शेअरमार्केटमध्ये तेजी असते, तेव्हा त्यात गुंतवणूक करणारे आजुबाजूचे लोक सांगतात, त्यांना कसा दोन-चार महिन्यात, एक-दोन वर्षांत भरघोस फायदा झाला. मग या वाटेला न गेलेल्यांनाही लोभ सुटतो आणि कोणाचे तरी ऐकून तो सांगेल ते शेअर ते खरेदी करतात. बरं, त्यांची एंट्री होते तेव्हा नेमके मार्केट तेजीच्या शिखरावर असते व मग तिथून खाली येते. या लोकांना तोटा सहन करावा लागतो. अभ्यास न करता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यामुळे फटका सहन करावा लागतो. गुंतवणूक करा पण माहिती घेऊन हे सांगण्यासाठी हा प्रपंच.
शेअर म्हणजे काय?
शेअर मार्केट म्हणजे जिथे शेअरची खरेदी व विक्री होते ते मार्केट. ही बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) व एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) या दोन एक्सचेंजवर होते. अर्थात प्रत्यक्ष तिथे जायची आवश्यकता नसते, तर ही खरेदी व विक्री आपण ब्रोकरमार्फत ऑनलाईन किंवा ब्रोकरला फोन करून घरबसल्या किंवा कुठूनही करू शकतो, मोबाईल अ‍ॅपवरूनही करू शकतो. शेअर म्हणजे काय ते आपण आधी थोडक्यात बघू. शेअर म्हणजे कंपनीच्या मालकीचा हिस्सा. तुमच्याकडे को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट असेल, तर त्याचे शेअर सर्टिफिकेट तुमच्याकडे असते. थेट बिल्डरकडून फ्लॅट घेणारा जो पहिला खरेदीदार आहे त्याचे नाव शेअर सर्टिफिकेटच्या दर्शनी भागावर असते. त्याने फ्लॅट दुसर्‍याला विकला की दुसर्‍या खरेदीदाराचे नाव शेअर सर्टिफिकेटच्या मागे लिहिले जाते. दुसर्‍याने तिसर्‍याला विकला की त्याखाली त्याचे नाव लिहिले जाते. पूर्वी कंपन्यांच्या शेअरचे खरेदी-विक्री व्यवहार व्हायचे तेव्हाही अशी फिजिकल शेअर सर्टिफिकेटवर घेणार्‍याच्या नावाची नोंद व्हायची, त्याकरता विकणारा सही करून ब्रोकरमार्फत शेअर सर्टिफिकेट खरेदीदाराच्या ब्रोकरकडे पाठवायचा. त्याला एक-दोन महिने लागायचे, कधी सही जुळत नाही म्हणून ते परत यायचे. हा सगळा विलंब व त्रास वाचला ते १९९६ साली एनएसडीएलची (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) स्थापना झाली व त्यांनी शेअर सर्टिफिकेटच्या डिमटेरियलायझेशनची म्हणजे डिमॅटची सुरुवात केली त्यामुळे आणि त्यावेळच्या ब्रोकरवर्गाच्या विरोधाला तोंड देऊन तो यशस्वी केला त्यामुळे. शेअरबाजारात डिजिटल व्यवहार तेव्हाच सुरू झाले. डिजिटलायझेशनचा आज गाजावाजा होत आहे, जणू ते आताचा सुरू झाल्यासारखे ढोल पिटले जात आहेत, पण हे त्या काळातच सुरू झाले आणि भांडवल बाजार म्हणजे कॅपिटल मार्केटची भरधाव वाढ व्हायला अशा सुधारणा कारणीभूत ठरल्या हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वांनाच तंत्रज्ञानावर आधारित ऑनलाईन-फोनने शेअरच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करता यायला लागले, त्यातील पारदर्शीपणा वाढला व वर म्हटले तसे मराठी माणसेसुद्धा जास्त संख्येने शेअरबाजारात गुंतवणूक करायला लागली.
शेअर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कशी सुधारणा झाली ते बघितले, आता शेअर म्हणजे काय ते बघू. एक उद्योजक आहे. एकदम नव्याने उद्योग सुरू करताना तो नातेवाईक, पार्टनर यांच्याकडून कर्ज घेतो, दागिने, घर गहाण ठेवतो व स्वत:चे पैसे पैसे उभे करतो. समजा त्याची कंपनी पुढे पाच-दहा वर्षे व्यवस्थित उद्योग करत आहे, नफा मिळवत आहे. आता त्याला व्यवसाय विस्तारासाठी आणखी पैसे हवे आहेत. त्याच्याकडे काही पर्याय प्रामुख्याने असतात. बँकेकडून कर्ज घेणे किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट (म्हणजे जास्त लाभाच्या अपेक्षेने नवउद्योगात भांडवल गुंतवणारे भांडवलदार) यांच्याकडून भांडवल घेऊन त्या ब्दल्यात त्यांना कंपनीचे अनलिस्टेड शेअर्स अलॉट करणे किंवा आपल्या कंपनीचे शेअर भांडवल बाजारात विकायला आणून त्याद्वारे पैसे उभे करणे. कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करावी लागते. त्यावरचे व्याज नियमित चुकते करावे लागते. व्यवसायात नफा होवो की तोटा, कर्जाचा हप्ता व व्याज यांची परतफेड करावीच लागते. उद्योगाचे बस्तान बसण्यास पाच-दहा वर्षे इतका कालावधी लागतो. कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करण्याइतके पैसे त्या उद्योगातून जनरेट होत नाहीत. पण परतफेड तर करावीच लागते. नाहीतर बँका तो उद्योग ताब्यात घेतात. उलट शेअर विक्रीला काढले तर त्या विक्रीतून जे पैसे उभे केले आहेत ते परत करावे लागत नाहीत. व्याज देण्याचाही प्रश्न नसतो. नफा झाला तरच लाभांश म्हणजे डिव्हिडंड देण्याचा विचार केला जातो. केवळ छोटे उद्योजक भांडवल बाजारातून पैसे गोळा करत नाहीत तर मोठ्या कंपन्या, मोठी औद्योगिक घराणीही अशा रीतीने शेअर मार्केटमधून पैसे उभे करतात. उदा: एचडीएफसी ह्या मोठ्या ग्रुपने त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसी बँक या कंपनीचे शेअर १९९५मध्ये विक्रीसाठी भांडवल बाजारात आणले होते. अशा रीतीने जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर प्रथमच विक्रीसाठी भांडवल बाजारात आणले जातात तेव्हा त्याला इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) म्हणतात. कंपनीला कर्ज घेण्याऐवजी शेअरविक्रीतून भांडवल बाजारातून पैसे उभे करणे कसे फायद्याचे आहे, हे समजले. पण सामान्य लोकांनी हे शेअर का विकत घ्यावेत? त्यांना नियमित व्याज मिळणार नाही, शेअरचे भाव वाढून फायदा होईल याचीही हमी नाही. तरीही लोक शेअर विकत घेतात, त्यात खूप पैसा गुंतवतात, कारण उद्योग खूप चालायला लागला, त्याला चांगला नफा मिळायला लागला तर त्या कंपनीच्या शेअरचा भाव तिने आपल्याला ज्या किंमतीला विकला त्यापेक्षा खूप वाढतो. मग ह्या वाढलेल्या भावात शेअर विकून त्यांना घसघशीत नफा मिळू शकतो.
एक ताजे उदाहरण बघू : कॉम्प्युटर मॅनेजमेंट सिस्टम्स लिमिटेड (कॅम्स) ही म्युच्युअल फंड कंपन्यांना सेवा पुरवणारी खाजगी क्षेत्रातील कंपनी. हिचा आयपीओ ऑक्टोबर २०२०मध्ये आला होता व १० रुपये फेस व्हॅल्यूचे शेअर त्यांनी १२३० रुपये प्रति शेअर या दराने विक्रीस काढले होते. (याला प्रिमियमने विक्री करणे म्हणतात व ह्या केसमध्ये १२२० रुपये इतक्या प्रिमियमने विक्री झाली होती : विक्री किंमत १२३० वजा फेस व्हॅल्यू १० म्हणून १२२० रुपये अधिभार म्हणजे प्रिमियम.) आता २६ नोव्हेंबर २०२१ला कॅम्सच्या शेअरचा भाव ३०५५ रुपयाला बंद झाला, म्हणजे केवळ एका वर्षात साधारण अडीचपटीने वाढला. या कंपनीची सेवा चोख आहे, म्युच्युअल फंड कंपन्या व म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे सामान्य गुंतवणूकदार दोघेही कॅम्सच्या कामावर खूश आहेत, कॅम्सला ह्या सेवा देण्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे, नफा होत आहे, त्यांच्या व्यवसायात पुढेही वाढ होत राहील, तसेच मार्केटमध्येही तेजी आल्याने शेअरचा भाव वाढला.
तसेच प्रत्येकवेळी कंपनी स्वत:च शेअर विक्रीसाठी आणत नाही तर काहीवेळा प्रमोटर कंपन्या, पॅरेंट कंपन्या तसेच कंपनीला सुरुवातीच्या काळात भांडवल पुरवठा करणारे व्हेंचर कॅपिटल फंड्सही शेअर विक्रीसाठी मार्केटमध्ये आणतात व त्याद्वारे नफावसुली करतात.
आयपीओ म्हणजे काय इथपर्यंतची माहिती बघितली.
आता यापुढील लेखात आपण इतर माहिती बघू.
(टिप : ‘शेअर मार्केट – अभ्यास आणि अनुभव’ हे प्रस्तुत लेखकाचे पुस्तक २०१५मध्ये प्रकाशित झालेले असून त्याचा उपयोग इथे केलेला आहे.)
क्रमश:

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

निसर्गसंवर्धनामुळे कात टाकतेय ठाणे खाडी…

Related Posts

शेअर मार्केट

अभ्यासोनि गुंतवावे धन!

January 24, 2022
शेअर मार्केट

शेअर कसे निवडावे?

January 13, 2022
शेअर मार्केट

शेअर निवडायचे कसे?

January 8, 2022
शेअर मार्केट

कोरोनाकाळाने शेअर बाजार फुलवला…

December 30, 2021
Next Post
निसर्गसंवर्धनामुळे कात टाकतेय ठाणे खाडी…

निसर्गसंवर्धनामुळे कात टाकतेय ठाणे खाडी...

लाघवी, पारखी मित्र गमावला!

लाघवी, पारखी मित्र गमावला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

January 16, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नया है वह

May 12, 2022

ती ऐतिहासिक भेट!

May 12, 2022

राशीभविष्य (१५ मे २०२२)

May 12, 2022

असा लागला छडा!

May 12, 2022

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.

About Us

Contact Us

Privacy Policy

Terms of Service

Refund Policy

  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नया है वह

May 12, 2022

ती ऐतिहासिक भेट!

May 12, 2022
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.