• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 7, 2022
in टपल्या आणि टिचक्या
0

□ सरकारी नोकरीत आम्हालाही सामावून घ्या. तृतीयपंथीयांची हायकोर्टात याचिका
■ तिथल्या काही लोकांपेक्षा हे अधिक पुरुषार्थाने काम करतील.

□ शिकलेल्या मुस्लिम मुलांना हिंदू मुली जाळ्यात ओढतात- माजी मुख्य आयुक्त डॉ. कुरेशी यांच्या वक्तव्याने खळबळ
■ घ्या आता… हा तर रिव्हर्स लव्ह जिहाद!

□ लोकशाहीसाठी काँग्रेस मजबूत असणे आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य
■ देशासाठी लोकशाही मजबूत असणे आवश्यक आहे, हे आधी मोदीशहांना सांगा नितीनजी… मग काँग्रेसकडे वळा… म्हणजे ती मजबूत करण्याकडे वळा…

□ प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगनेला केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील कूडलमणिक्यम मंदिरात ती हिंदू नसल्याने नृत्य करण्यास मनाई
■ एकदा हा भेदभाव स्वीकारला की पुढे दलितांना प्रवेशबंदीही स्वीकारावी लागणार, हे या भोंदुत्वाच्या नादी लागलेल्या बहुजनांना कधी कळणार?

□ सध्या जनता जे भोगतेय ते पाहता सामान्यांसाठी यापेक्षा `बुरे दिन’ असूच शकत नाहीत- काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी
■ एवढा सामान्यजनांचा पुळका आहे, तर उतरा की रस्त्यावर, करा कंठशोष, द्या सत्तेला आव्हान? जनता अजूनही संधी देईल तुम्हाला.

□ पत्नीबाबत थट्टा सहन न झाल्याने हॉलिवुड अभिनेता विल स्मिथ याने ऑस्कर सोहळ्यात निवेदकाच्या थोबाडीत लगावली
■ घरी रोज थंडगार जेवण आणि त्याहून थंडगार बायको यांचा सामना करण्याची भीती अनेक पुरुषांना शूर बनवते…

□ टीका करा, पण त्यात द्वेष नको. हे घातक आहे- शरद पवारांचा भाजपला टोला
■ त्यांनी मतांचं पीक महाभयंकर द्वेषाच्या खतपाण्यावरच घेतलं आहे पवारसाहेब!

□ आठ दिवसात पेट्रोल, डिझेल चार रुपयांनी भडकले. दोन शहरांमध्ये डिझेलने गाठले शतक
■ अजून लंकेइतकी महागाई झालेली नाहीये ना, मग हेच अच्छे दिन आहेत भक्तजनांसाठी!

□ महाराष्ट्रात १४ वर्षात `ईडी’ची ८० प्रकरणे. एकही सुनावणी नाही. विशेष पीएमएलए न्यायालयाच्या आदेशातून उघड झाली रखडपट्टी
■ हे ईडी नावाचं प्रकरणच एकदा नीट मार्गी लावायला लागणार आहे मराठीजनांना.

□ कोरोना कॉलरट्यूनपासून लवकरच होणार सुटका!
■ कॉल नको, पण ट्यून आवर, अशी वेळ आणलीच होती या ट्यूनने.

□ गुन्हेगारांचीही `कुंडली’. दोषी आरोपींचे जैविक नमुने गोळा करण्याचे अधिकार देणारे विधेयक सादर
■ हळुहळू नागरिकांच्या सगळ्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे… सावधान!

□ चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन. दोन वर्षातील सर्वात मोठे निर्बंध
■ दुसर्‍यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वत: पडायची वेळ येते कधी कधी.

□ काही वर्षांपूर्वी उघड झालेल्या जैन डायरी, बिर्ला डायरीतील भाजप नेत्यांची नावे उघड करून त्यांच्यावर कारवाई करा- संजय राऊत
■ भाजपचे नेते आणि भ्रष्ट? असं कसं होईल राऊत साहेब! अशी कारवाई करायला गेले तर ईडीला वरूनच काडी लागेल!

□ राष्ट्रपतीपदासाठी उत्सुक नाही- मायावती
■ कुणी विचारलंय? आणि समजा असता उत्सुक, तरी काय फरक पडला असता?

□ कितीही आपटा… सरकार पडणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावले
■ आपटून आपटून काळेनिळे झाले आहेत हो… कपडे, कपडे…

□ मुलांना घटस्फोटित आईची जात लावण्याचा अधिकार
■ आईची जात सोयीची असली तरच लागणार…

□ नारायण राणे, कृपाशंकर सिंह गंगास्नान करून पवित्र झाले का?- नाना पटोले
■ त्यांच्याकडे डायरेक्ट नळ बसवलेत गंगेचे!

□ हिंदी सिनेसृष्टीत वर्णभेद- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आरोप
■ आरोप कसला त्यात, वस्तुस्थिती आहे ती.

□ आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन केले? अनुपम खेर यांचा पलटवार
■ अरे, यांच्या डोक्याला काही दुखापत झाली की काय? एकदम ताळ्यावर कसे आले?

□ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाला आपला शत्रू मानत नाही- संघनेते राम माधव
■ यांचे लोक जे काही करतील त्याची जबाबदारी ज्याची त्याची. परमेश्वराप्रमाणे निराकार, निर्गुण वगैरे आहे का संघ?

Previous Post

सेल्फ ड्राइव्ह ट्रिपचा अनोखा व्यवसाय

Next Post

अग्रलेखाच्या बादशहाची स्कूटरसवारी

Next Post

अग्रलेखाच्या बादशहाची स्कूटरसवारी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.