• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कसा पण टाका… 9-10

प्रश्न तुमचे... उत्तरं हृषिकेश जोशी यांची...

Nitin Phanse by Nitin Phanse
October 7, 2021
in कसा पण टाका
0

प्रत्येक टीव्ही मालिकेत खलनायकी व्यक्तिरेखा असणं आवश्यक आहे का? त्याशिवाय मालिकेला परवानगीच मिळत नाही की काय?
अभिजीत देशपांडे, दादर
– त्याशिवाय चांगली माणसं म्हणजे नक्की कशी? कोणती? हे कसं कळणार तुम्हाला?

भाषण करणं सोपं आहे की अभिनय करणं?
सोपान डोंगरे, करमाळा
– सोपं काहीच नसतं यातलं.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या शक्यतेला लोक फारसे जुमानताना दिसत नाहीत- ही बेपर्वाई की लसीकरणामुळे आलेला विश्वास की काय होईल ते होऊ दे, अशी लढाऊ वृत्ती?
निलेश लोपीस, वसई
– ते तिसर्‍या लाटेचं काय ठरलंय नक्की? इतक्या वेळा तारखा पोस्टपोन्ड होतायत. वाट बघूनच कंटाळा आलाय. जमत नसेल तर कॅन्सलतरी करा म्हणावं ती. निदान नाईलाजानं कामाला तरी लागता येईल.

कसं काय जोशी, बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?
विलास सुभेदार, सोनगाव
– कालचं लक्षात आहे अजून? आणि कुणाकडून ऐकलंय त्यावर ठरवा.

सलमान खान दारू प्यायला होता की नव्हता, हे कोर्टाने तपास करूनही कळू शकलं नाही; माझ्या बायकोला फोनवरून फक्त ‘हॅलो’ ऐकल्यावर कसं कळतं? ती लगेच ‘जास्त पिऊ नका,’ असं कसं सांगते?
विनय गाडगीळ, राजावाडी
– तुमच्याकडून सलमानसारखं काही झालं तर तुम्ही चुकूनही सुटू शकणार नाही याची तुमच्या पत्नीला खात्री असल्याने त्यांना दक्ष राहणं गरजेचंच आहे.

तुमच्यासाठी एक रॅपिड फायर… फक्त दोन्ही उत्तमच आहेत, असं म्हणू नका… एकच निवडायचाय तर कुणाला निवडाल?
अशोक सराफ की लक्ष्या
महेश कोठारे की सचिन
वर्षा उसगावकर की अश्विनी भावे
थरथराट की धुमधडाका
सुनंदा शिरगावकर, हरचेरी
– हा म्हणजेच काही मराठी चित्रपटसृष्टीचा काळ नाही. मी यांच्या मागच्या, पुढच्या काळातलंही पाहिलंय. म्हणून,
अरुण सरनाईक,
शरद तळवलकर,
राजदत्त,
रंजना,
एक गाव बारा भानगडी.

यंदाच्या सीमोल्लंघनाला तुमचा संकल्प काय?
श्रावण बोडस, शिरपूर
– आता कोरोना नावाच्या काळावर हसत, फक्त आणि फक्त मनसोक्त काम करणे.

लतादीदींचा आणि आशाताईंचा नुकताच वाढदिवस झाला… या दोघींचं तुम्हाला सगळ्यात प्रिय असलेलं एकेकच गाणं सांगायचं झालं तर तुम्ही कुठलं सांगाल?
दीनानाथ वैजापूरकर, सावर्डी
– संबंध आयुष्यात एकदाच जेवायचं असेल तर काय आवडेल असा प्रश्न आहे हा. एवढं संकुचित राहणं मला जमलंही नाही आणि मी एवढा तज्ज्ञही नाही.

लोकांना ऑनलाइन मनोरंजनाची इतकी सवय झाली आहे, आता थिएटर उघडल्यावर लोक सिनेमा-नाटक पाहायला पूर्वीसारखी गर्दी करतील, असं वाटतं का तुम्हाला?
दिव्या सोनार, कांदेवाडी
– पिंजर्‍यातल्या पक्ष्यांना उडायला आवडेल का असं विचारण्यासारखं आहे हे.

मुलांना मातृभाषेतच शिकवलं पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. मुलांचं इंग्रजी कच्चं राहिलं तर त्यांना जगाच्या बाजारात किंमत नाही, हे अनुभव सांगतो. आम्ही पालकांनी करावं काय?
विश्वेश गांधी, अहमदनगर
– मातृभाषा असली तरीही जन्माला आल्या आल्याच ट्याहँ करायच्या आधीच कुणी बोलल्याचा मानवी इतिहास सांगत नाही. तीही पुढच्या काही वर्षात शिकूनच येत असते. आणि इतर भाषांबाबतीत, १८ वर्षांनंतर उंची वाढत नाही असं काही भाषेचं नसतं.

गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो दस लाख देगा, हे गाणं ऐकलं की कायम वाटतं की लोक लाखाच्या आशेने तर एक पैशाचा दानधर्म करत नसतील ना? दानाच्या माध्यमातून कुणाला तरी मदत करण्याचा आनंद कमी आहे का?
विश्वास पटवर्धन, चांदिवली
– आज सेन्सेक्स ६०,०००ला पोहचला असताना, गरिबाला एक रुपया दान देऊन लाख मिळतील या भ्रमात आजचा गरीबही नाहीये. मग त्यानेच दिवसाला मिळालेल्या भिकेमधले दोन रुपये अधिकच्या गरिबाला देऊन २० लाख मिळतील या आशेने आपला धंदा सोडला नसता? दान हा वृत्तीचा विषय आहे आणि करणारे सगळं करत असतात.

Previous Post

बंद दाराआडचा गरबा

Next Post

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

Next Post

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.