मेष – नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मर्जीप्रमाणे काम न झाल्याने चिडचिड होईल. मन शांत ठेवले तर बहुतेक प्रश्न सहजपणे मार्गी लागतील. कामात बदल होऊन नवीन जबाबदारी मिळू शकते. भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल. कलाकारांसाठी आठवडा चांगला राहील. आर्थिक आवक वाढेल. संततीकडून गुड न्यूज कानावर पडेल. व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. गुंतवणुकीमधून चांगला लाभ होईल, नवीन खरेदी होऊ शकते. दुखापतीपासून सांभाळा.
वृषभ – येणारा आठवडा तरुणांसाठी भरभराटीचा जाईल. चांगल्या नोकरीची संधी चालून येईल. शिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. सामाजिक कार्यातील मंडळींचा मान सन्मान होईल. कुटुंबात वादाचे प्रसंग घडू शकतात. अशा घटना झाल्या तर तुटेपर्यंत ताणू नका, त्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडू शकते. आंधळा विश्वास ठेवून व्यवहार करू नका, फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावधान राहा. प्रवासात काळजी घ्या.
मिथुन – अडकून राहिलेली कामे पटापट मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची आयडिया सुचेल. भागीदारीत जाणकारांचा सल्ला घेऊन पुढे जा. शेअर, सट्टा, जुगार, लॉटरी यापासून दोन हात दूरच राहा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना घाई करू नका, ते महागात पडू शकते. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमप्रकरणात जपूनच राहा. वादाचे प्रसंग घडू शकतात.
कर्क – आगामी काळात संमिश्र घटनांचा अनुभव येईल. अडकलेले काम नवीन ओळखीतून पुढे सरकेल. उच्चशिक्षणासाठी मुलाच्या प्रवेशाचा मार्ग सहजपणे सुकर होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. शुभकार्य होईल. त्यानिमित्ताने नातेवाईक, मित्रांच्या गाठीभेटी होतील. सामाजिक जीवनात वाणीवर नियंत्रण ठेवा, चुकून वादाचे प्रसंग उद्भवले, तर पोलीस चौकीची पायरी चढावी लागू शकते. खेळाडू, कलाकार, वकिलांसाठी उत्तम काळ आहे.
सिंह – बर्याच दिवसांनी कुटुंबासमवेत सहलीला जाल. कुटुंबाला भरपूर वेळ खर्च कराल. महागड्या वस्तूची खरेदी होईल. जुने येणे वसूल झाल्यामुळे खिसा भरलेला राहील. पैसे कसेही खर्च करू नका. नवीन गुंतवणूक कराल. व्यावसायिक मंडळींसाठी उत्तम काळ. पत्रकार, खेळाडू, लेखकांना यश मिळवून देणारा काळ. संततीकडून सुवार्ता कानावर पडेल. नोकरीची संधी चालून येईल.
कन्या – ग्रहांची चांगली साथ लाभेल. नव्या संधी चालून येतील. लग्नाची बोलणी मार्गी लागतील. विवाहेच्छुक मंडळींसाठी चांगला काळ आहे. संशोधकांच्या हातून एखादे मोठे काम होईल. राजकारणात मनासारखे पद मिळू शकते. कोर्टकचेरीची कामे प्रलंबित राहतील. जुना आजार डोके वर काढेल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, अन्यथा पोटाचे विकार टाळा. नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढ मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.
तूळ – कोणावरही विश्वास टाकून निर्णय घेऊ नका, फसगत होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीत वादाचे प्रसंग झाले तरी नाराज होऊ नका. मन शांत ठेवून ध्यानधारणेत वेळ घालवा. नोकरीत अडचणीचे प्रसंग निर्माण होतील, पण त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. तणावाचे प्रसंग निर्माण होतील. संततीकडून चुकीचे काम होईल. व्यावसायिकांना चांगला लाभ मिळेल. भागीदारीत कटकटीचे प्रसंग घडतील. उन्हाळयाचे दिवस आहेत, ज्येष्ठांची काळजी घ्या.
वृश्चिक – अनपेक्षित लाभ होतील. नवीन वास्तू घेण्याच्या विचारांना गती मिळेल. व्यवसायात चांगली आर्थिक उलाढाल होईल, चार पैसे शिल्लक पडतील. नोकरीत बदली होईल. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन उत्तम राहील. सरकारी कामे नियमात राहूनच करा. शब्द हे शस्त्र आहे, हे लक्षात घ्या आणि सगळीकडे जपून बोला.
धनु – प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडून वाद विकोपाला जाऊ शकतो. शेअर, सट्टा, लॉटरीतून आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायात काळजीपूर्वक व्यवहार करा. फसवणुकीची शक्यता आहे. एरवी तुमच्या मनासारख्या घटना घडतील. उच्चशिक्षणाच्या संधी चालून येतील. वाहनखरेदीचा योग आहे. नोकरीत उत्तम स्थिती राहील, एखादी नवीन ऑफर मिळू शकते, पण सारासार विचार करून मगच निर्णय घ्या.
मकर – उधारीने पैसे देण्याचे टाळा. संमिश्र अनुभव येतील. कर्जप्रकरणे मार्गी लागतील. शेतकर्यांसाठी चांगला काळ. कलाकार, अभियंत्यांनाही चांगले अनुभव येतील. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. खेळाडूंकडून चमकदार कामगिरी होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येईल, पण ते करताना जपूनच पावले टाका. उन्हाळ्यात काळजी घ्या, आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
कुंभ – मित्रमंडळींशी वादविवाद होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात चांगला काळ राहील. उल्लेखनीय काम पूर्ण झाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते, योग्य नियोजन केल्यास त्रास होणार नाही. मिष्टान्न भोजनाचा योग आहे. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या. अरबट-चरबट खाणे टाळा. पोटाचे विकार होऊ शकतात.
मीन – धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च कराल. त्यातून मानसिक शांतता मिळेल, मन आनंदी राहील. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च कराल. संततीकडून चांगले काम होईल, स्पर्धेत यश मिळेल. खेळाडूंसाठी चांगला काळ आहे. शिक्षक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ राहील. वास्तू थोड्या कालावधीने घ्या. नवीन गुंतवणूक सल्लामसलत करूनच करा.