• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

शेअर निवडायचे कसे?

- उदय कुलकर्णी (ओळख शेअर मार्केटची - ५)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2022
in शेअर मार्केट
0

आपल्याला फायदा देणारी कंपनी कशी ओळखायची? हमखास नफाच होईल याची हमी कोणी देणार नाही, पण हमखास तोटा होणे तर टाळण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्यासाठी काही पथ्ये आहेत. सहसा शेअर मार्केटमध्ये सुरवात करताना मित्र, नातेवाईक असं कोणाचं बघून ती केली जाते आणि मग शेअर घेतानाही त्याने दिलेल्या टिपप्रमाणे गुंतवणूक केली जाते. ती वाईटच असते असे नाही, परंतु स्वतःचा अभ्यास हवा. दुसरी गोष्ट आता टेलिग्राम अ‍ॅप, व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक इथेसुद्धा कोणता शेअर घ्यायचा याची शिफारस करणारे ग्रूप दिसतील, त्यावरही आंधळा विश्वास ठेवू नये. स्वतः अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
– – –

शेअरमार्केटबद्दल प्राथमिक माहिती घेतली, खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट आवश्यक आहे ते बघितलं. आता सर्वात महत्त्वाची, कळीची गोष्ट आहे ती म्हणजे शेअर घेताना योग्य शेअर निवडणे आणि तो योग्य भावात घेणे. नाही तर सगळेच मुसळ केरात. नफ्याऐवजी तोटा पदरात पडायचा.
२३ मार्च २०२०च्या तळापासून सेन्सेक्स व निफ्टीने २ डिसेंबर २०२१पर्यंत २२५ टक्के वाढ साधली, पण ही त्या निर्देशांकांची वाढ आहे. एक्स्चेंजवर नोंदणी झालेल्या सर्व कंपन्यांची कामगिरी समान नसते. काही कंपन्यांच्या शेअरचे भाव खूप वाढतात, काहींचे कमी प्रमाणात का होईना वाढतात, तर काही कंपन्यांच्या शेअरचे भाव खाली येतात, त्यातही काहींचे खूपच खाली येतात, गुंतवणूकदारांचा घसघशीत तोटा करतात, तर काहींचे आहे तिथेच स्थिरही राहतात. दोन कंपन्यांचे तुलनात्मक उदाहरण बघू. एचडीएफसी लिमिटेड आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) या गृहकर्ज या एकाच क्षेत्रातील दोन कंपन्या. एचडीएफसी लिमिटेड ही गृहकर्ज क्षेत्रातील बलाढ्य व पथदर्शी कंपनी. हिचे मॅनेजमेंट विश्वासार्ह आहे, त्यांच्या नावाला प्रतिष्ठा आहे. डीएचएफएल ही तुलनेने छोटी कंपनी. या कंपनीच्या शेअरचा ऑगस्ट २०१८मध्ये भाव ६६७ होता, तर एचडीएफसी लिमिटेड कंपनीच्या शेअरचा भाव १९३५ होता. डीएचएफएल कंपनी अनेक वर्ष चांगली काम करत होती व कंपनीत ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना शेअरचा भाव वाढल्यामुळे चांगला लाभही झालेला होता. परंतु आयएलएफएस नावाची एक मोठी कंपनी २०१८मध्ये बुडाली, साखळी परिणाम म्हणून काही इतर कंपन्या गोत्यात आल्या, त्यात डीएचएफएलसुद्धा आली. सप्टेंबर २०१८मध्ये ही कंपनी कर्जावरचे व्याज देऊ शकणार नाही अशी बातमी आली आणि हिच्या शेअरचा भाव एका दिवसात ४२ टक्क्यांनी घसरून ६६७वरून २७४ वर आला. आमची स्थिती चांगली आहे वगैरे खुलासा कंपनीने केला, परंतु मार्वेâटने त्यावर विश्वास ठेवला नाही. या शेअरची जी घसरण सुरू झाली ती इतकी होती की मार्च २०२०मध्ये मार्वेâटने तळ गाठला होता, तेव्हा तो नऊ रुपयापर्यंत खाली घसरला. शेवटी सप्टेंबर २०२१मध्ये त्याचा १६ रुपये भाव होता, परंतु ते विकत घ्यायला कोणी खरेदीदार नव्हते. ही कंपनी शेवटी पिरामल एंटरप्राइजेसने विकत घेतली, परंतु शेअरधारकांना त्याचे काहीही पैसे मिळाले नाहीत. उलट एचडीएफसी लिमिटेडचा भाव रुपये १९३५पासून वर-खाली होत आता नोव्हेंबर २०२१मध्ये २६७३ झाला. शेअर खरेदी करताना एक लाख रुपयाचे डीएचएफएलचे शेअर घेतले असते, तर पैसे बुडाले असते, शून्य हातात आले असते. तेच एचडीएफसी लिमिटेडचे शेअर घेतले असते तर त्याच एक लाखावर तीन वर्षात एकूण ३६ टक्के रिटर्न मिळाले असते, म्हणजे प्रतिवर्ष १२ टक्के.
आणखी एक तुलना, मुकेश अंबानी ग्रूपची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी व अनिल अंबानी ग्रूपच्या रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स कॅपिटल इत्यादी कंपन्या. आज मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी जोरात आहे आणि तिने गुंतवणूकदारांचा भरघोस फायदा करून दिलेला आहे, तर अनिल अंबानी ग्रूपच्या कंपन्या दिवाळखोरीत गेलेल्या आहेत, शेअर गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले आहेत. योग्य शेअर निवडणे किती आवश्यक आहे ते यावरून लक्षात आलं असेल.
आपल्याला फायदा देणारी कंपनी कशी ओळखायची? हमखास नफाच होईल याची हमी कोणी देणार नाही, पण हमखास तोटा होणे तर टाळण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्यासाठी काही पथ्ये आहेत. सहसा शेअर मार्केटमध्ये सुरवात करताना मित्र, नातेवाईक असं कोणाचं बघून ती केली जाते आणि मग शेअर घेतानाही त्याने दिलेल्या टिपप्रमाणे गुंतवणूक केली जाते. ती वाईटच असते असे नाही, परंतु स्वतःचा अभ्यास हवा. दुसरी गोष्ट आता टेलिग्राम अ‍ॅप, व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक इथेसुद्धा कोणता शेअर घ्यायचा याची शिफारस करणारे ग्रूप दिसतील, त्यावरही आंधळा विश्वास ठेवू नये. स्वतः अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तो कसा करायचा? अभ्यास म्हणजे आर्थिक कामगिरी जसे उत्पन्न, नफा किती आहे, कंपनीवर कर्ज किती आहे, तिच्या भागभांडवलाच्या प्रमाणात किती मिळकत आहे असे काही निकष असतात, ते बघणे. याविषयी अधिक माहिती नंतर घेऊ.
या आर्थिक निकषांशिवाय शेअर निवडण्याचे काही सर्वसाधारण निकष आहेत. आपण दोन्हींचा थोडक्यातच आढावा घेऊ. सर्वप्रथम निकष आहे कंपनीचे व्यवस्थापन- मॅनेजमेंट हे चांगलेच हवे व त्यांचा कारभार पारदर्शी हवा. डीएचएफएल आणि अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांच्या उदाहरणावरूनही हे दिसून येईल. व्यवस्थापन म्हणजे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, सीईओ, प्रवर्तक, सीएफओ अशी कंपनीची बडी मंडळी. टाटा ग्रूप, एचडीएफसी ग्रूप, एलअ‍ॅन्डटी ग्रूप, महिंद्रा ग्रूप, इन्फोसिसचे नारायण मूर्ती, विप्रोचे अझिम प्रेमजी ही आदर वाटतील अशी नावे. यांनी एका रात्रीत ही विश्वासार्हता प्राप्त केलेली नाही. सातत्याने चांगली वर्तणूक असल्यामुळे, उत्तम व्यवसाय केल्यामुळे त्यांचे नाव चांगले आहे. ही मोठी नावे, पण मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या उच्चपदस्थांनीही चांगले नाव कमावलेले आहे. पर्सिस्टंट सिस्टम्स ही पुण्याची आयटी क्षेत्रातील कंपनी. आनंद देशपांडे ही मराठी व्यक्ती या कंपनीची संस्थापक व चेअरमन, यांचेही चांगले नाव आहे. कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड ही बांधकाम, रियल इस्टेट या क्षेत्रातील पुण्याची कंपनी. या कंपनीच्या बांधकामांचा, रेसेडेन्शियल प्रोजेक्ट- गृहसंकुलाचा दर्जा फार चांगला असतो, ते भव्य, देखणे असतात. या कंपनीचेही चांगले नाव झालेले आहे. सोभा लिमिटेड हीसुद्धा बांधकाम, रियल इस्टेट क्षेत्रातील बेंगळुरूमधील कंपनी. या कंपनीनेही विश्वास कमावलेला आहे. उलट एचडीआयएल ही याच क्षेत्रातील मुंबईची कंपनी. ती एसआरए प्रोजेक्टवर काम करायची, कंपनी दिवाळखोरीत गेली, तिच्याबरोबरच कंपनीला पीएमसी बँक या सहकारी बँकेने सुमारे ६००० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, ती बँकही गोत्यात आली आणि तिच्या ग्राहकांचे व डिपॉझिटरचे पैसे अडकून पडलेले आहेत. वर डीएचएफएलचा उल्लेख केला. एचडीआयएल व डीएचएफएल या कंपन्यांचे प्रवर्तक हे सख्खे भाऊ आहेत.
दुसरा मुद्दा आहे, कंपनी काय व्यवसाय करते ते समजून घेतले पाहिजे. उदा. कंपनी आयटी क्षेत्रात आहे इतकं पुरेसं नाही, ती काय करते, ग्राहक कंपन्या आऊटसोर्सिंग करतात त्यांना सेवा देते की हार्डवेअर विकते हे लक्षात घेतले पाहिजे. हार्डवेअर कंपन्यांच्या शेअरना शेअर मार्केटमध्ये कमी भाव असतो. एखाद्या सेक्टरची चलती असते तेव्हा काही कंपन्या नाव बदलवून नावात त्या सेक्टरचं नाव टाकतात, उदा : दहा-पंधरा वर्षांपूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर म्हणजे पायाभूत सुविधा क्षेत्राची चलती होती, तेव्हा एखादी छोटी कंपनी आपल्या नावात इन्फ्रास्ट्रक्चर ह्या शब्दाची भर घालायची म्हणजे त्या सेक्टरमधील तेजीचा लाभ तिलाही मिळेल. हे अर्थातच चुकीचे आहे, तेव्हा अशा उगाचच नाव बदलणार्‍या कंपन्यांच्या बाबतीत जास्त तपास केला पाहिजे. काही वेळा मात्र विलिनीकरण इत्यादीमुळे खरोखर नाव बदलवणं आवश्यक असतं ते अपवाद वेगळे. कंपनीचा व्यवसाय जाणून घेतल्यावर त्या व्यवसायाच्या मार्केटमध्ये त्या कंपनीचा किती टक्के वाटा आहे ते जाणून घेतले पाहिजे. भारतात पॅसेंजर कारचे जे मार्केट आहे, त्यात मारूतीचा वाटा सुमारे ४५ टक्के आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरमधील इतर कंपन्यांच्या तुलनेत मारूतीच्या शेअरचा भाव जास्त असतो. त्या मार्केटमधील लीडर कंपनी असेल तर चांगले, पण अगदी लीडर नसली तरी नगण्य वाटा नको किंवा कंपनीचा शेअर घेण्यासाठी तसेच सशक्त कारण हवे. सिमेंट सेक्टरबाबत बघितले, तर सिमेंट बनवणार्‍या ज्या कंपन्या आहेत त्यात आदित्य बिर्ला ग्रूपच्या अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनीचा सिमेंट मार्केटमधील हिस्सा सुमारे २१ टक्के आहे आणि ती सिमेंट बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे, तर ओरिएंट सिमेंट कंपनीचा सिमेंट मार्केटमधील हिस्सा सुमारे दोन टक्के आहे, पण या कंपनीच्या कामगिरीनुसार व इतर निकषांच्या आधारे हिच्या शेअरला योग्य भाव मिळत आहे.
शेअरची निवड करताना ती कोणत्या सेक्टरमध्ये आहे हा एक महत्वाचा निकष आहे. बँकिंग व फायनान्शियल सेक्टर, स्टील सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, शुगर सेक्टर, पॉवर सेक्टर, सिमेंट सेक्टर असे अनेक सेक्टर आहेत व त्या सेक्टरमध्ये उप-प्रकार आहेत. उदा: आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक या आणि अशा अनेक बँकिंग व फायनान्शियल सेक्टरमधील कंपन्या आहेत. त्यापैकी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक या प्रायव्हेट सेक्टरमधील तर स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक या पब्लिक सेक्टरमधील म्हणजे सरकारी क्षेत्रातील बँका. हा भेदही महत्वाचा आहे. तसेच इन्फोसिस, टीसीएस, विप्रो या आयटी सेक्टरमधील कंपन्या आहेत. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, सेल इत्यादी या स्टील सेक्टरमधील कंपन्या आहेत. काही सेक्टरचे तेजी-मंदीचे दिवस असतात व प्रत्येक सेक्टरची वैशिष्ट्ये आहेत. सेक्टरविषयीसुद्धा थोडी माहिती हवी. शेअर निवडण्याचे आणखी काही निकष पुढील लेखात बघू.

(टिप : ‘शेअर मार्केट – अभ्यास आणि अनुभव’ हे प्रस्तुत लेखकाचे पुस्तक २०१५मध्ये प्रकाशित झालेले असून त्याचा उपयोग इथे केलेला आहे.)

क्रमश:

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

पाऊले चालती… मुजर्‍यांची वाऽऽट

Related Posts

शेअर मार्केट

गुंतवणुकीचे तीन निकष

June 23, 2022
शेअर मार्केट

अभ्यासोनि गुंतवावे धन!

January 24, 2022
शेअर मार्केट

शेअर कसे निवडावे?

January 13, 2022
शेअर मार्केट

कोरोनाकाळाने शेअर बाजार फुलवला…

December 30, 2021
Next Post

पाऊले चालती... मुजर्‍यांची वाऽऽट

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.