• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे…

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2022
in बाळासाहेबांचे फटकारे
0

प्रगल्भ लोकशाही असलेल्या अनेक देशांमध्ये सत्तापक्षाचे लोकप्रतिनिधी आपल्याच पक्षाच्या ध्येयधोरणांवर खरपूस टीका करतात आणि काही वेळा पक्षाचा आदेश धुडकावून विरोधात मतदानही करतात. आपल्याकडे लोकशाहीच्या बुरख्यात सरंजामशाही आणि व्यक्तिपूजक राजेशाहीच वावरत असल्याने आपल्याला मतभेदांचे वावडे आहे. हल्ली तर दिल्लीतल्या सत्तापक्षाच्या विरोधात इतरांनी ब्र काढलेलाही चालत नाही; त्यांची रवानगी पाकिस्तानात होते- तर स्वपक्षीयांनी तोंड उचकटून कसं चालेल? ती हिंमत मोदीनामावर नौका तरलेल्या होयबांमध्ये कुठून येणार? तरीही मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक, खासदार सुब्रम्हण्यम स्वामी आणि खासदार वरूण गांधी हे सत्तापक्षाला अधूनमधून घरचा अहेर देत असतात. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुखांच्या अमोघ कुंचल्यातून साकारलेलं हे अफलातून व्यंगचित्र पाहून त्यांचीच आठवण येते. काँग्रेस पक्षाच्या तेव्हाच्या गायवासरू या निवडणूक चिन्हाचा कल्पक वापर करून बाळासाहेबांनी गायीच्याच अंगावर धावून येणारं वासरू चित्रित केलं आहे. त्यात गायीच्या चेहर्‍यावरही आश्चर्याचे भाव दाखवण्याचे त्यांचे अलौकिक कसब पाहून थक्क व्हायला होते.

Previous Post

वृक्षारोपणासाठी आदर्श संकल्पना : स्मृतिवन

Next Post

शेअर निवडायचे कसे?

Next Post

शेअर निवडायचे कसे?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.