• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

फुल्ल टाइमपास कॉमेडी!

- संजय डहाळे (धनंजय माने इथंच राहतात)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2022
in तिसरी घंटा
0
फुल्ल टाइमपास कॉमेडी!

जमेची बाजू म्हणजे, विनोदाची उत्तम जाण असणारे दोन हुकमी एक्के. प्रिया बेर्डे आणि प्रभाकर मोरे. लक्ष्मी-नारायणाचा जोडा जेंव्हा रंगमंचावर पोहचतो तेंव्हा रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी केलेले त्यांचे स्वागत बोलके ठरते. त्यांच्या निवडीला जशी मान्यताच मिळते. अभिनयातली लवचिकता तसेच टायमिंगची उत्तम जाण या दोघांच्या ट्युनिंगमधून नजरेत भरते. यात एकीकडे फसवी अगतिकता तर दुसरीकडे आक्रमकता आहे. या दोन टोकाच्या मुखवट्यातून ही जोडी हसे अन् टाळ्या वसूल करते.
– – –

कोरोनाच्या बंदीकाळामुळे बंद पडलेली नाटके पुन्हा एकदा रसिकांपुढे नव्या दमात येत असून त्यात ‘धनंजय माने इथंच राहतात’ हे रंगमंचावर नव्या इनिंग्जसाठी सज्ज झालंय. दोन वर्षांच्या कडवट घटना विसर्जित करून ‘फुल्ल टाइमपास कॉमेडी’ हा एकमेव पक्का इरादा या एकूणच निर्मितीमागे दिसत आहे.
नाटकाचं शीर्षक भूतकाळात घेऊन जाणारं. ते रसिकांना आकर्षित करण्यासाठी मुद्दाम निवडल्यागत आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ हा सचिन पिळगावकरांनी दिग्दर्शित केलेला १९८८-८९च्या सुमारास गाजलेला चित्रपट. त्याचं मूळ ‘बिबी और मकान’ या हृषिकेश मुखर्जींच्या हिंदी चित्रपटातून घेतलेलं. मराठी चित्रपटासाठी कथारचना वसंत सबनीस यांची आणि अशोक सराफ, लक्ष्या बेर्डे, सचिन ही बडी स्टारकास्ट त्यात होती. तर लक्ष्याच्या तोंडीचा ‘बनवाबनवी’साठी वापरलेला परफेक्ट टायमिंगचा ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हा संवाद या नाटकाचं शीर्षक बनला आहे. नाटकाची संकल्पना चेतन चावडा यांची तर नाटककार आहेत नितीन चव्हाण. अशी ही पडद्यामागली संहितेसाठीची जमवाजमवी!
मृत्युपत्रावर ते करणार्‍याची स्वाक्षरी नसल्याने निर्माण झालेला गोंधळ हा जसा भरत जाधव-केदार शिंदे या रंगयुतीच्या ‘सही रे सही’त होता, तसाच दत्तक घेतलेल्या वयोवृद्ध दांपत्याची चांगली सेवा केल्याबद्दल पुरावा म्हणून ‘सही’ घेण्याचा सावळा गोंधळ यातही आहे. तो ‘सही रे सही’च्या विनोदी नाट्यकृतीच्या पठडीत फिट्ट बसणारा.
परदेशी असणारा धनंजय माने आणि त्याची पत्नी एका आलिशान बंगल्यात पोहोचतात. त्यांना मूलबाळ नाही. कर्जात पुरते बुडलेले. कोट्यवधी रुपयांच्या बंगल्याचे वारसदार म्हणून आता सारी मालमत्ता त्यांची झालेली असते. असा त्यांचा समज. त्याचे वडील आई दोघांचे निधन झालेले. जिवंतपणी जन्मदात्यांकडे ढुंकूनही न बघणारे, त्यांची जराही काळजी न घेणारे मालमत्तेच्या हव्यासापोटी प्रगटतात खरे, पण इच्छापत्रानुसार दिवंगत वडिलांनी एका वयोवृद्ध गरजू दांपत्याला वर्षभर दत्तक घेण्याची आणि त्यांची लेखी मर्जी संपादन करण्याची जाचक अट घातलेली असते. आता ही अट पूर्ण करण्यासाठी ‘लक्ष्मी-नारायण’ यांना वृद्धाश्रमातून निमंत्रित करण्यात येते आणि सुरू होतो ‘घोळात घोळ’ अन् ‘बनवाबनवी’चा धम्माल वेगवान खेळ! या कथेभोवती नाटककार नितीन चव्हाण यांनी नाट्य रंगवलं आहे.
कथानक तसे एकांकिकेच्या आवाक्यात बसणारे आहे, पण ते ताणून दोन अंकात आणण्यासाठी उपकथानके तसेच काही विचित्र पात्रांचे चाळे घुसवण्यात आले आहेत. नाटककाराने दिग्दर्शकाच्या हाती सबकुछ सोडून दिलंय. नाटककार वसंतराव कानेटकरांच्या दर्जेदार ‘हिमालयाची सावली’ या नाटकानंतर दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नव्या दिग्दर्शनात कॉमेडीची भट्टी जमवली असून त्यात नृत्य, गाणी, ताल-ठेका याने विलक्षण गती दिलीय. तर्कशास्त्राच्या किंवा युक्तिवादाच्या फंदात न पडता फक्त आणि फक्त दे धम्माल वेगवान अ‍ॅरक्शन ड्रामा रंगवण्यासाठी सारे कसब व कौशल्य दिग्दर्शकांनी पणाला लावलंय. जे नजरेत भरतं. त्याने नाटक सतत हलवत अन् हसवत ठेवलंय. नाहीतर हे ‘माने’ अनाथ होण्याचं भय अधिक होतं.
जमेची बाजू म्हणजे, विनोदाची उत्तम जाण असणारे दोन हुकमी एक्के. प्रिया बेर्डे आणि प्रभाकर मोरे. लक्ष्मी-नारायणाचा जोडा जेव्हा रंगमंचावर प्रथमच येतो तेव्हा रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी केलेले त्यांचे स्वागत बोलके ठरते. त्यांच्या निवडीला जणू मान्यताच मिळते. अभिनयातली लवचिकता तसेच टायमिंगची उत्तम जाण या दोघांच्या ट्युनिंगमधून नजरेत भरते. एकीकडे फसवी अगतिकता तर दुसरीकडे आक्रमकता यात आहे. या दोन टोकांच्या मुखवट्यांतून ही जोडी हशे अन् टाळ्या वसूल करते. स्वाक्षरी घेण्यासाठी एकेका प्रसंगातून धनंजय माने याचे सारे डाव त्यांच्यावर कसे काय उलटतात, त्यातील नाट्य चांगले जमले आहे.
यातील पात्ररचना म्हणजे इरसाल सोंगंच! मर्मावर नेमकं बोट ठेवणार्‍या बोलीभाषेतील म्हणी, वाक्प्रचारातून शब्दांची जादू ही ठसक्यात प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीच्या भूमिकेत शिरून पेश केलीय; तर नारायण बनलेले प्रभाकर मोरे यांचा चेहर्याशवरचा भोळेपणा व अभिनयातील सहजता यात बाजी मारली आहे. दोघांच्या वेशभूषेतलं वेगळेपण प्रत्येक प्रसंगात दिसते. स्वानंदी बेर्डे हिने पदार्पणातच ‘सौ. स्वरा धनंजय माने’ बनून रंगभूमीवर आगमन केलंय. तिच्याकडून आशा वाढल्या आहेत. निमिष कुलकर्णीचा धनंजय अतिउत्साही असून त्याची थरकाप उडविणारी मोबाईल रिंग लक्षात राहते. खिडकीतून एंट्री घेणारा अश्लील हावभावाने वावरणारा गोल्डन मॅन सोन्या पाटील चेतन चावडा यांनी साकारला आहे. अशुद्ध बोबडी सानिया- मृगा बोडस, फसलेल्या वेशांतरातला चिन्मय- निलय घैसास या कलाकारांच्या ‘टीम’ने ‘सारे काही हसविण्यासाठी’ हा दिग्दर्शकाचा ‘महामंत्र’ यशस्वीरित्या पार केलाय!
तांत्रिकदृष्ट्या जाहिरातीपासून ते प्रयोगापर्यंत चोख कामगिरी बजावली आहे. अमीर हटकर यांचा संगीत ठेकेबाज आहे. नाटकाच्या जातकुळीला शोभणारं. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य एकाच आलिशान बंगल्याचे आहे. जे भव्य व प्रसन्न आहे. प्रिया बेर्डे या निर्मात्याच्या भूमिकेतही असून त्यात कुठेही तडजोड केलेली नाही. सुपरस्टार लक्ष्याच्या हसवणुकीचा बाणा ‘बेर्डे’ कुटुंबियांनी पुढे चालविला आहे. ‘टायटल साँग’मध्ये लक्ष्याच्या चित्रपटाची नावे खुबीने गुंफली असून गाणं गुणगुणतच रसिक नाट्यगृहाबाहेर पडतात. जन्मदात्यांची सेवा करा असा ‘मेसेज’ शेवटी देण्याचा प्रयत्न यात जरी असला तरी तणाव गायब करणारं एक चैतन्यदायी हसवणूक नाट्य म्हणून रंगभूमीवरला हा ‘धनंजय माने’ नाट्यरसिकांच्या पसंतीला उतरेल!

धनंजय माने इथंच राहतात

लेखक – नितीन चव्हाण
दिग्दर्शन – राजेश देशपांडे
संगीत – अमीर हडकर
नेपथ्य – संदेश बेंद्रे
सूत्रधार – गोट्या सावंत
निर्माते – प्रिया बेर्डे, अमर व सायली गवळी
निर्मिती संस्था – श्रीमंथ एंटरटेनमेंट / व्ही. आर. प्रॉडक्शन

[email protected]

Previous Post

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली…

Next Post

निसटलेलं सुख शोधण्याचा प्रयत्न

Related Posts

तिसरी घंटा

चिंतनशील विचारवंताचा नाट्यआलेख!

October 6, 2022
तिसरी घंटा

नाटकातलं नाटक `प्रशांत’ स्टाईल!

September 22, 2022
तिसरी घंटा

धम्माल बाळंतपणाचे हास्यकुर्रऽऽ!

September 8, 2022
पोरांनो, निसर्गाकडे चला…
तिसरी घंटा

पोरांनो, निसर्गाकडे चला…

August 25, 2022
Next Post

निसटलेलं सुख शोधण्याचा प्रयत्न

रॉकी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.