• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home फ्री हिट

खेळांचे सामने नव्हे, आधुनिक युद्ध?

- प्रा. अविनाश कोल्हे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
August 5, 2021
in फ्री हिट
0
खेळांचे सामने नव्हे, आधुनिक युद्ध?
Share on FacebookShare on Twitter

ज्या चिमुकल्या इंग्लंडच्या साम्राज्यावरून एकेकाळी सूर्य मावळत नव्हता त्या बलाढ्य इंग्लंडला आज इटलीसारख्या युरोपातल्या एका नगण्य देशाकडून पराभूत व्हावे लागले! हा धक्का इंग्लंडच्या चाहत्यांना सहन झाला नाही. म्हणून मग रविवार, ११ जुलैला प्रचंड हिंसाचार झाला. एके काळी असे प्रकार भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांच्या वेळी हमखास होत असत.
—-

एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक संपताना जागतिक पातळीवर जे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बदल होत आहेत, त्याने अनेकांना अंतर्मुख केलं आहे. मागच्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊसमध्ये घातलेला गोंधळ बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हे दृश्य अमेरिकेतील आहे की उत्तर प्रदेश, बिहार विधानसभेतील, हेच काही क्षण समजेना. तसंच मे २०२०मध्ये अमेरिकेतील घटना आठवा. डेरेक चौवीन या गौरवर्णीय पोलिस अधिकार्‍याने अमानुषपणे, दिवसाढवळया जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन–अमेरिकन तरुणाच्या मानेवर गुडघा ठेवून त्याचा जीव घेतला. आपल्या देशात अशा पोलिसी अत्याचाराच्या घटना नेहमी घडत असतात. अशा अमानुष घटना भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश वगैरेसारख्या आशियाई देशांत घडल्या तर जगाला फारसं आश्चर्य वाटत नाही. पण अमेरिका/युरोपात? प्रगत लोकशाही शासनव्यवस्था, टोकाचं आविष्कार स्वातंत्र्य, निर्भीड माध्यमं, सतत दर्जेदार कला/साहित्याची निर्मिती, ज्ञानविज्ञानातील थक्क करणारी प्रगती वगैरे म्हणजे युरोप/अमेरिका, असं समीकरण दृढ झालेलं आहे. या स्थितीत अशा काही घटना समोर आल्या की मग विचार करावा लागतो : कोण प्रगत आहे आणि कोण मागासलेले?
एकूण असं समजण्याची पद्धत आहे की पाश्चात्य संस्कृती ही सर्वार्थाने पौर्वात्य संस्कृतीपेक्षा उजवी आणि वरचढ आहे. साहेबाच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नसे तेव्हा हा समज विशेष प्रचलित होता. नंतर मात्र हळूहळू का होईना प्राचीन तसेच अर्वाचीन पाश्चात्य संस्कृतीची नकारात्मक बाजू समोर यायला लागली. रविवार ११ जुलै २०२१ रोजी इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये इटली विरूद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंडच्या समर्थकांनी जो धिंगाणा घातला तो अनेक अर्थांनी अभूतपूर्व होता. या सामन्यात इंग्लंडाचा एका गोलने (३ विरूद्ध २ गोल) पराभव झाला. वेम्ब्ली स्टेडियममध्ये सामना बघायला आलेल्या इंग्लंडच्या चाहत्यांना आपल्या देशाचा पराभव सहन झाला नाही. त्यातले अनेक तर तिकीट न काढताच, दंडेली करत स्टेडियममध्ये घुसले होते. सामना संपल्यानंतर त्यांनी इटलीच्या संघाच्या चाहत्यांना जबरदस्त बडवले, अनेकांनी इटलीच्या राष्ट्रध्वजाचे जाहीर दहन केले. या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. ते बघितले की हे चाहते इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये राहतात आणि इंग्लंडसारख्या सुसस्कृंत देशाचे नागरिक आहेत, यावर विश्वासच बसत नाही.
आता या घटनेची जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे कदाचित इंग्लंडला २०३० साली होणार्‍या जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद गमवावे लागेल, अशी कुणकुण आहे. एवढंच नव्हे तर जागतिक फुटबॉल संघटना इंग्लंडवर दंड ठोठावणार असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध होत आहेत. समाजशास्त्रज्ञ या घटनेचा उलगडा करण्यात मग्न आहेत. एका विश्लेषणानुसार कोविडमुळे गेले सव्वा वर्ष घरी बसून सर्वजण कंटाळलेले होते, चिडचिड करत होते. अशा स्थितीत `युरो २०२० फुटबॉल’ स्पर्धेत देश अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्यामुळे इंग्लंडचे चाहते कमालीचे उत्तेजित झाले होते. अशा अवस्थेत इंग्लंड हरला तेव्हा त्यांना निराशेवर नियंत्रण ठेवता आले नाही.


या घटनेच्या अगोदर म्हणजे आठ जुलै रोजी इंग्लंड विरूद्ध डेन्मार्क हा सामना झाला. तेव्हा इंग्लंडच्या चाहत्यांनी डेन्मार्कचे राष्ट्रगीत सुरू असताना असभ्य वर्तवणूक केली. एवढेच नव्हे तर इंग्लंडच्या एका चाहत्याने डेन्मार्कचा गोलकीपर कास्पर याच्या डोळ्यांवर लेसर किरण सोडले होते. याबद्दल इंग्लंडला `युनियन ऑफ युरोपीयन फुटबॉल असोसिएशन्स’ या संघटनेने तीस हजार युरो एवढा दंड ठोठावला आहे.
वेम्ब्ली येथील घटनेला अनेक पदर आहेत. इंग्लंडमधील उच्चभ्रूंचा खेळ म्हणजे क्रिकेट तर कामगार वर्गाचा, कष्टकर्‍यांचा खेळ म्हणजे फुटबॉल, अशी ढोबळ विभागणी आहे. दुसरं म्हणजे इंग्लंड वगळता युरोपात क्रिकेट हा खेळ कोठेही फारसा लोकप्रिय नाही. युरोपभर कमालीचा लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. म्हणूनच `युरो कप’ जिंकणे हे प्रत्येक युरोपियन देशाचे स्वप्न असते. या खेपेला इंग्लंड तब्बल ५५ वर्षांनंतर युरो कपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला होता. `युरो कप’साठी सामने दर चार वर्षांनी होतात. यासाठी सर्वच युरोपियन देश जीव तोडून प्रयत्न करत असतात. अंतिम सामन्यापर्यंत धडक मारलेल्या इंग्लंडकडून त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या होत्या.
असे असले तरी असा तमाशा इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात आणि अनेकदा घडलेला आहे. याच इटलीने २००६ साली घेतलेल्या जागतिक फुटबॉलच्या अंतिम सामन्यात जर्मनीचा पराभव केला होता. तेव्हा जर्मनीच्या चाहत्यांनी असा धिंगाणा घातला नव्हता. याचा अर्थ फुटबॉलच्या प्रत्येक सामन्यानंतर असा गोंधळ होतो, असं नाही. ही खास इंग्लंडमधील परंपरा आहे. इंग्लंडमधील फुटबॉलपेमी फुटबॉलवर वेड्यासारखं म्हणजे अक्षरश: वेड्यासारखं प्रेम करतात.
या घटनेला असलेला दुसरा पदर म्हणजे वांशिकतेचा. आता पराभूत झालेल्या इंग्लंडच्या संघात तीन खेळाडू आप्रिâकन वंशाचे आहेत. इंग्लंड-इटलीमध्ये झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. अशा वेळी नियमाप्रमाणे `पेनल्टी शूट-आऊट’चा वापर करून विजेता ठरवला जातो. यात प्रत्येक संघाला पाच पेनल्टी किक मिळतात. जो संघ जास्तीत जास्त गोल करेल तो विजेता ठरतो. यात इंग्लंडने पाच संधींपैकी दोनदा गोल केले तर इटलीने पाचपैकी तीनदा. परिणामी इटली विजेता ठरला. इंग्लंडच्या वाया गेलेल्या तीन संधी मार्क्स रॅशफोर्ड, जेडन सांचो आणि बुकायो साका या तीन आफ्रिकन फुटबॉलपटूंमुळे गेल्या, हे इंग्लंडच्या चाहत्यांना दिसले होते. परिणामी सामना हरल्यानंतर या तीन कृष्णवर्णीय खेळाडूंना समाजमाध्यमांतून गलिच्छ टीकेला सामोरे जावे लागले. हा प्रकार एवढा वाढला की शेवटी इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांना कडक शब्दांत हजेरी घ्यावी लागली.
अशा घटनांतून आधुनिक ब्रिटीश समाजाच्या मानसिकतेवर प्रकाश पडतो. चौदाव्या शतकात युरोपात प्रबोधनचा (रेनेसांस) काळ इटलीत सुरू झाला. काही शतकं युरोपचे नेतृत्व इटलीकडे होते. नंतर अठराव्या शतकात औद्योगिक क्रांती सुरू झाली. या क्रांतीचे जनकत्व इंग्लंडकडे जाते. तोपर्यंत युरोपच्या राजकारणात इंग्लंडचे वर्चस्व वाढत होते. शिवाय इंग्लंडने आशिया, आफ्रिकेत वसाहती निर्माण केल्या होत्या. ज्याकाळी इंग्लंडच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नसे, त्या काळी युरोपच्या राजकीय जीवनात इटली हा नगण्य देश होता. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मात्र जागतिक राजकारणात इंग्लंडची घसरण सुरू झाली आणि बघता बघता इंग्लंडचे साम्राज्य लयाला गेले. हा धक्का सर्वसामान्य ब्रिटीश माणूस आजही पचवू शकलेला नाही.
काही अभ्यासकांच्या मते जे प्रत्यक्षातून गेलं त्याचं इतरत्र आणि प्रसंगी काल्पनिक पातळीवर पुनरूज्जीवन करणं, ही ब्रिटीश समाजाची मानसिक गरज होती आणि आजही आहे. यातून इयान फ्लेमिंग यांचा `जेम्स बाँड’ साकार झाला जो अशक्य ते शक्य करू शकतो. स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्याचे दुसरे महत्वाचे क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र. येथेसुद्धा इंग्लंडची पिछेहाट होताना दिसते. १९३० सालापासून जागतिक फुटबॉल चषकसाठी सामने सुरू झालेले आहेत. २०१८ साली झालेली स्पर्धा ही २१व्या जागतिक चषकासाठी होते. हा चषक इंग्लंडने आजपर्यंत फक्त एकदा म्हणजे १९६६ साली जिंकला होता. असाच प्रकार क्रिकेटबद्दलही दाखवता येतो. जागतिक क्रिकेट स्पर्धा १९७५ साली पहिल्यांदा भरल्या होत्या. आजपर्यंत या चषकाच्या एकूण बारा स्पर्धा झालेल्या आहेत. यापैकी इंग्लंडने फक्त एकदा म्हणजे २०१९ साली हा चषक जिंकला होता.
ज्या चिमुकल्या इंग्लंडच्या साम्राज्यावरून एकेकाळी सूर्य मावळत नव्हता त्या इंग्लंडला आज इटलीसारख्या युरोपातल्या एका नगण्य देशाकडून पराभूत व्हावे लागले! हा धक्का इंग्लंडच्या चाहत्यांना सहन झाला नाही. म्हणून मग ११ जुलैला प्रचंड प्रमाणात दंगे, हिंसाचार झाला. एके काळी असे प्रकार भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांच्या वेळी हमखास होत असत. या संदर्भात `१८ एप्रिल १९८६’ हा दिवस विसरलेला भारतीय सापडणे विरळा. याच दिवशी शारजा येथे झालेल्या भारत–पाक क्रिकेट सामन्यात जावेद मियांदादने चेतन शर्माच्या शेवटच्या बॉलवर षटकार ठोकून सामना जिंकला होता. यानंतर भारतात अनेक ठिकाणी ताणतणाव निर्माण झाला होता.
अशा घटना एका वेगळ्या आणि आधुनिक वास्तवाकडे बोट दाखवतात. ते वास्तव म्हणजे अशा सामन्यांच्या निमित्ताने समाजातले वैफल्य हिंसक मार्गाने व्यक्त होते. भारत-पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेटचे सामने काय किंवा युरोपातले फुटबॉलचे सामने काय, ही नवीन युद्ध आहेत जेथे बंदुका, रणगाडे नसतात. पण वातावरण युद्धसदृश्य असतं आणि सामना संपल्यानंतर तर प्रत्यक्ष युद्ध सुरू होतं. अकरा जुलैला लंडनमध्ये जे घडलं हे या नव्या वास्तवाचा पुरावा होय.

– प्रा. अविनाश कोल्हे

(लेखक निवृत्त प्राध्यापक, लेखक आणि नाट्य समीक्षक आहेत.)

Previous Post

लढा मंदिरप्रवेशाचा!

Next Post

अत्यंत चुरशीची आणि गाजलेली निवडणूक

Related Posts

फ्री हिट

नेतृत्वक्षम स्मिथ!

March 23, 2023
फ्री हिट

क्रीडा पत्रकारितेचे भीष्म पितामह

March 16, 2023
लीग आटवा, क्रिकेट वाचवा!
फ्री हिट

लीग आटवा, क्रिकेट वाचवा!

March 16, 2023
फ्री हिट

शर्माजींची शर्मनाक गच्छंति!

February 24, 2023
Next Post

अत्यंत चुरशीची आणि गाजलेली निवडणूक

कविता असते अशीच धूसर

कविता असते अशीच धूसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.