• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
June 1, 2022
in टपल्या आणि टिचक्या
0

□ देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार. भाजपच्या जोरबैठका सुरू.
■ तो नावापुरताही ‘आदिवासी’ नसणार, कारण भाजपवाले हुशारीने आदिवासींचे मूळनिवासीपण आणि त्यातून येणारे हक्क नाकारायला त्यांना ‘वनवासी’ म्हणतात.

□ कश्मीरमधील जिहादींना भडकवून घातपात करण्याचा आयएसआयचा कट. बीएसएफच्या महासंचालकांचा इशारा.
■ महत्त्वाच्या निवडणुकांच्या तोंडावर होणार का घातपात? पुलवामाप्रमाणे?

□ महिला वृत्तनिवेदकांना चेहरा झाकण्याची अफगाणिस्तानात सक्ती. अंमलबजावणी सुरू. तालिबानकडून जबरदस्ती.
■ आपण त्यांना का हसा? आपल्या केंद्रीय सत्ताधार्‍यांची मानसिकता बायकांना चूल आणि मूल यांच्यात जखडून टाकणारी आहे. ती तालिबानांपेक्षा वेगळी कशी?

□ इम्रान यांच्याकडून भारताची इंधन दरकपातीबद्दल स्तुती.
■ दरवाढ झाली तेव्हा टीका केली होती का पण त्याने?

□ ईशान्येकडील भ्रष्टाचाराची संस्कृती भाजपकडून नष्ट – अमित शहा
■ जय अमित शहा यांची आकस्मिक भरभराट झालेली कंपनी ईशान्येत नव्हती हे केवढं सुदैव त्यांचं.

□ पंतप्रधान मोदी १४ जूनला देहूत. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे होणार लोकार्पण.
■ आता इंद्रायणीत अभंग तरून वर आले, तेव्हा मी तिथेच उभा होतो, मीच ते धावत जाऊन तुकाराम महाराजांना दिले, अशी कहाणी ऐकायला मिळणार तर.

□ सायकलला अच्छे दिन. देशात सायकल वापराची टक्केवारी वाढली
■ काही दिवसांनी तीही परवडेनाशी होईल आणि लोक पायी चालू लागतील… तेव्हा बिकाऊ पेपरवाले ‘पायांना अच्छे दिन’ असं हेडिंग देणार का?

□ इंधन दरकपात ही केंद्र सरकारची धूळफेक.
■ नसती तरच आश्चर्य होतं…

□ विद्वानांच्या लबाडीने शिवचरित्र कलंकित : श्रीपाल सबनीस
■ छत्रपती शिवाजी महाराज नावापुरते, त्यांच्यामागून आपला अजेंडा रेटायचा हा मुख्य उद्देश.

□ पारा वाढला; मद्याचा प्याला चढला! गेल्या काही दिवसांत मागणी वाढली
■ बियर प्यायली की गार वाटतं, व्हिस्की, रम अशी गरम पेयं पिणारे म्हणणार, लोहा लोहे को काटता है… एकूणात काय तर पीनेवाले को, पीने का बहाना चाहिए…

□ आता कर्जही घ्यायला नको; व्याजदर वाढणार. जूनचा ईएमआय वाढीव दराने. रिझर्व्ह बँकेचे संकेत
■ कणाहीन गव्हर्नरच्या काळात वेगळे काय घडणार?

□ दर ३३ तासांनी १० लाख लोक गरीब होणार : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दावा
■ त्या काळात अब्जाधीशांची संख्याही वाढणार आहे, हे भयंकर.

□ केंद्रातील मोदी सरकार हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिनपेक्षा वाईट – ममता बॅनर्जी
■ आपल्याला लोकशाही मार्गाने त्यांना दूर करावे लागणार आहे, त्यासाठी कोणी तिसरे महायुद्ध सुरू करणार नाही.

□ घटत्या लोकसंख्येने चीन टेन्शनमध्ये. नागरीकांवर लवकर लग्न करण्याची, तीन मुले जन्माला घालण्याची सक्ती.
■ आधी मुलं जन्माला न घालण्याची सक्ती, मग एका मुलाची सक्ती आता तीन मुलांची सक्ती… ‘मायबाप’ सरकारच निर्णय घेणार असेल तर टेस्ट ट्यूब बेबीच का नाही जन्माला घालत सगळ्या?

□ ‘ती’ पोस्ट हटवण्यास केतकी चितळेचा नकार
■ तुरुंगातून बाहेर येऊ द्या, सत्कार सोहळे होतात की नाही, पाहा.

□ श्रीलंकेसारखे ६९ देश कंगाल; गृहयुद्ध भडकण्याची भीती; बेरोजगारी, कर्ज भयंकर वाढल्याने संकटे
■ विषमतेतून जन्माला येणार्‍या नव्या वसाहतवादाची ही सुरुवात असणार आहे…

□ भारतात केवळ १० टक्के लोक कमावतात महिना २५ हजार रुपये; १५ टक्के कामगारांचा पगार पाच हजार रुपये महिना; श्रीमंतांच्या उत्पन्नात मात्र झाली मोठी वाढ.
■ सरकारला हाताशी धरून गरिबांना गरीब ठेवल्याशिवाय श्रीमंत श्रीमंत कसे होतील?

□ चित्रपट कलाकारांचीही नव्या पर्यायांमध्ये गुंतवणूक; वेगवेगळे व्यवसाय आणि स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक
■ सिनेमातला पैसा सिनेमातच पैसे गुंतवणारा राज कपूर एखादाच असतो…

□ लाल परी पुन्हा जोमात. तब्बल आठ लाख फेर्‍यांमध्ये ३६ कोटींचे उत्पन्न तिजोरीत जमा; दररोज सरासरी १५ कोटींची मिळकत.
■ चांगल्या गाड्यांचा ताफा आला तर रोज १५० कोटी कमावण्याची क्षमता आहे तिची.

□ देशात गुजरात, उत्तर प्रदेशचे मॉडेल बनवण्याची स्पर्धा सुरू आहे – मेहबुबा मुफ्ती
■ कश्मीरमध्ये यांच्याशी असंग केलात तेव्हा हे कळले नव्हते.

Previous Post

शेतीचे नेमके दुखणे काय?

Next Post

शंभर नंबरी सराफ – अशोक सराफ

Next Post
शंभर नंबरी सराफ – अशोक सराफ

शंभर नंबरी सराफ - अशोक सराफ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.