• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वात्रटायन

- श्रीकांत आंब्रे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 6, 2021
in वात्रटायन
0

नरेंद्र मोदी

निवडणुका जवळ येतील
तसे करू सगळे स्वस्त
बराच माल विकून झाला
उरला सुरला होईल फस्त

मी कित्ती आहे दयाळू
मला दयेचा फुटतो पाझर
लोक आशेने बघतात तेव्हा
त्यांना दाखवतो मी गाजर

वेळ फार थोडा आहे
काय हवे ते मागून घ्यावे
पंधरा लाख पडतील बँकेत
रोज खाते चेक करावे

—–

देवेंद्र फडणवीस

फुग्यासारखा पक्ष फुगवला
इकडून तिकडून वायू भरला
आता हवा जात चालली
लोक म्हणतात वायू सरला

कसे होणार आता पुढे
दोन वर्षे निघून गेली
वाट पाहून डोळे थकले
इच्छाच आता सगळी मेली

विक्रमाने दिला होता
अडीचकीचा मोठा सल्ला
त्याचेच ऐकले असते तर
आज नसता हल्लागुल्ला

—–

अमित शहा

आमची दोस्ती भावांसारखी
भाई हो तो ऐसा म्हणती
आमचे शत्रू कॉमन असतात
संपल्यावर तर लावतो पणती
आत्ता काळ कठीण आला
आत्ता लागेल खरी कसोटी
एकमेकांना सावरताना
नाटके करतो खोटी खोटी

अभिनयात माझ्यापेक्षा
तेच आहेत खरे हुशार
डॉयलॉगबाजी बघा त्यांची
ऐकून मीही होतो गार

—–

कंगना राणावत

बोलो बच्चो बोलो बोलो
देश कब आजाद हुआ?
ते सुद्धा माहीत नाही!
आठवा दाढीवाले बुवा

देशासाठी त्यांनी किती
माहीत आहे केला त्याग
घर सोडून बाहेर पडले
दिसता परवशतेची आग

एकोणीसशे चौदा साली
देश त्यांनी स्वतंत्र केला
तेव्हापासून भारताचा
नवा इतिहास लिहिला गेला

—–

किरीट सोमय्या

रोज नवा बकरा शोधणे
नाही बरे खायचे काम
रोजंदारीसारखे झाले
जरी निघत असला घाम

खरे खोटे असण्याचाही
नाही बसत पक्का मेळ
तरीही कोटा पूर्ण करून
नंतरच खातो भेळ

एक दिवस मला सुद्धा
मोदी दिल्लीला बोलावतील
राणेंसारखे सुक्ष्मात नेऊन
बिनखात्याचे मंत्री करतील

—–

नारायण राणे

उगाच यांच्या नादी लागलो
यांना माणसे हवीच असतात
यांच्या कमळास पाकळ्याच नाहीत
बाहेरून पाकळ्या लावत असतात

नुसताच देठ कसा चालेल
चिखलात सुद्धा कसा फुलेल
आवाज करून चालणार नाही
दिल्लीत मूड कसा खुलेल

मी मंत्री होऊनसुद्धा
पॅनलचा जर उडतो धुव्वा
सिंधुदुर्गात काय होईल
डोळ्यासमोर दिसतो चुव्वा

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

मक्तेदारीची फळे भोगावी लागणार

Next Post

मक्तेदारीची फळे भोगावी लागणार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.