• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मराठीतला पहिला अंडरवॉटर सिनेमा

- सिनेमावाला

Nitin Phanse by Nitin Phanse
February 2, 2023
in मनोरंजन
0

उघड्या डोळ्यांनी जमिनीवर आपण बरेच काही पाहतो. आकाशातही काहीतरी दिसतेच, पण समुद्रात पाहिलं तर फक्त पाण्याच्या वरच आपण पाहू शकतो. त्याच्या तळाशी काय रहस्ये दडली आहेत ते दिसत नाही. त्यासाठी समुद्राचा तळ गाठावा लागतो. हा तळ गाठल्यावरच रहस्यांचा पर्दाफाश होतो. समुद्राखालची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार्‍या ‘गडद अंधार’ या चित्रपटात करण्यात आला आहे. हा संपूर्ण सिनेमा अंडरवॉटर शूट करण्यात आला असून हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. या सिनेमाची निर्मिती कॅप्टन अवधेश सिंह चौहान आणि वर्षा सिंह चौहान यांनी केली आहे, तर दिग्दर्शन प्रज्ञेश रमेश कदम यांनी केलंय. दिग्दर्शक कदम म्हणाले, हा मराठीतला पहिलाच सिनेमा आहे, जो आम्ही पूर्णपणे अंडरवॉटर शूट केला आहे. त्यासाठी माझ्या कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि निर्मात्यांनीही त्यासाठी मोकळ्या हाताने खर्च केला आहे. या सिनेमातून प्रेक्षकांना व्हिज्युअल ट्रीट तर मिळेलच, पण ते साऊन्ड ट्रीटही नक्की अनुभवतील याची मला खात्री आहे. कारण आमच्या संगीत विभागानेही यावर खूप मेहनत घेतली आहे.
निर्माते अवधेश सिंह म्हणाले, साधारणपणे २००५ साली मी महाराष्ट्रात आलो. येथे शिक्षण पूर्ण केले. मग १५ वर्षांचा समुद्रात काम केल्यानंतर २०२० साली काम थांबलेले असतानाच सिनेमानिर्मितीचा विचार मनात आला. कॅप्टनचं काम जबाबदारीचं असतं. तो अनुभव मला होताच. सिनेमाबाबतही समाजाला काहीतरी वेगळं दाखवायचं ही मला माझी जबाबदारी वाटली. याच विचारात कथानक शोधत असताना ‘गडद अंधार’ या सिनेमाची संकल्पना माझ्यासमोर आली. हे कथानक माझ्याच क्षेत्राशी संबंधित होतं ही चांगली गोष्ट होती. या विषयावर मी प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि चांगलं देऊ शकतो ही मला खात्री होती. हा सिनेमा मराठीतच करण्याचं कारण असं की मराठीत बहुतांश फॅमिली ड्रामा, लव्ह स्टोरीज वगैरेच होते. टेक्नॉलॉजी बेस्ड कथानक मराठीत नव्हतेच. त्यामुळे हा सिनेमा मराठीतच बनवला. मराठीतल्या प्रेक्षकांना हॉलिवुड धर्तीचा सिनेमा पाहायला मिळेल ही मला खात्री आहे.
या चित्रपटात जय दुधाणे, नेहा महाजन, आकाश कुंभार, चेतन मुळ्ये, आरती शिंदे आणि बालकलाकार आस्था यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जय दुधाणे म्हणाला, मराठीत अनेक चित्रपट आलेत. येथे कंटेन्ट आणि टॅलेन्टची कधी कमतरता नव्हतीच. पण या सिनेमासारखे कथानक अजूनही मराठीत आलेले नाही. प्रज्ञेशने जेव्हा मला ही कथा ऐकवली तेव्हाच मला कथेचं वेगळेपण जाणवलं. दिग्दर्शक प्रज्ञेशने ही भूमिका मला दिली यासाठी त्यांचे आभार मानतो. सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि सर्वांच्या सहकार्याने आता हा सिनेमा रिलीज होतोय. नेहा महाजन म्हणाली, येथे आत्तापर्यंत अनेकांनी जे जे सांगितलं ते त्यांच्या मनातून आलेलं होतं. आमच्यासाठी हा सिनेमा म्हणजे अनेक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या सिनेमाचं कथानक. समुद्र आपण अनेकदा पाहिला आहे. पण प्रज्ञेशच्या मनात आलं या समुद्राच्या पोटात काय आहे ते लोकांना दाखवावं. पॅडीनं ते करून दाखवलं. दुसरं म्हणजे निर्मात्याचा दिग्दर्शकावर असलेला विश्वास. कॅप्टन अवधेश सिंह यांनी प्रज्ञेश आणि आम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास टाकला ही मोठी गोष्ट आहे. आजच्या काळात असे निर्माते सापडत नाहीत. तिसरं म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने मी स्कुबा डायव्हिंग करायला शिकले. श्वास कसा घ्यायचा याचं प्रशिक्षणही मला या सिनेमामुळे घेता आलं. पाण्याखाली असताना श्वास किती महत्वाचा असतो त्याचा प्रत्ययही मला आला. त्यातच एकमेकांना समजून घेत एकमेकांना मदत करणारे सर्वजण होते म्हणून ही भूमिका करता येणं मला सोपं गेलं.

Previous Post

‘जग्गू आणि ज्युलिएट’चा ट्रेलर लाँच

Next Post

दुजा घरी डोकावी, तो एक सूज्ञ

Next Post

दुजा घरी डोकावी, तो एक सूज्ञ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.