• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गजवदना सुखसदना विघ्नसुरदमना…

- नंदन रहाणे

Nitin Phanse by Nitin Phanse
September 1, 2022
in भाष्य
0

गजवदना सुखसदना विघ्नसुरदमना…

गजवदना सुखसदना विघ्नसुरदमना
गणरंजक भयभंजक अशुभासुरशमना
शुभवसना श्रुतिरसना हे मुनीवरभजना
यावे… यावे भवना… ऐकावे स्तवना!
जय देवा गणदेवा करुनी आगमना।।
सप्रेमें स्वीकारी अमुच्या या नमना ।।धु।।

प्रथमेशा परमेशा परिपूर्ण विशाला
प्रलयानंतर तूची आकारा आला
सृष्टिरचनेचा वर ब्रह्म्यासी दिधला
सामर्थ्याने ब्रह्मा गर्वोेद्धत झाला
विचित्र विकृत सृष्टी भवती अवतरली
नाना विद्रूप सृजने ब्रह्मांडे भरली
ते पाहूनी ब्रह्म्याची संभ्रांती सरली
आशीर्वादे त्यांची चिंता त्वा हरली
प्रियकारक, यशकारक एकचि तू सधना ।।
सप्रेमें स्वीकारी अमुच्या ना नमना ।।१।।

दोघा द्विजपुत्रांसी मृत्युभय नुरले
देवांतक, जीवांतक मदोन्मत्त झाले
अस्रेशस्रे आणिक रोखूनींया भाले
त्रिभुवनी घोरांदर ते चालूनीया गेले
जिंकूनी स्वर्गा, मृत्यूलोका, पाताळा
स्वामी दोघे झाले उच्छेदूनी सकळा
त्याची वधिले मग तू मायावेल्हाळा
बुद्धी, सिद्धी, शक्ती जागवूनी प्रबळा
दुष्टान्तक, भ्रष्टान्तक हे अरिष्टहनना।।
सप्रेमें स्वीकारी अमुच्या या नमना ।।२।।

जेव्हा जगीं या दैवी समतोल ढळता
क्रोधासूर, लोभासूर, मोहासूर छळला
कामासूर मातूनीया जग अवघे जळता
नाना अवतारें त्वा भेदियले दुरिता
ऐसा उपकारक तू सुखकारक सार्था
कर्ता, हर्ता, धर्ता, त्राता अन् भ्राता
यावे… यावे नाथा, श्रवणां गुणगाथा
प्रसन्न व्हावे देवा महिमा तव गाता
अनिरुद्धा, गुणवृद्धा घ्यावे स्तुतिसुमना ।।
सप्रेमें स्वीकारी अमुच्या या नमना ।।३।।

गजवदना सुखसदना विघ्नासुरदमना
गणरंजक भयभंजक अशुभासुरशमना
शुभवसना श्रुतिरसना हे मुनीवरभजना
यावे… यावे भवना…ऐकावे स्तवना!
जय देवा गणदेवा करुनी आगमना ।।
सप्रेमें स्वीकारी अमुच्या या नमना ।।धु।।

 

गणनायका मनमोहका…

गणनायका मनमोहका
वरदान दे भवतारका
मनीं भावभक्ती जागू दे
सुखशांती सदनीं नांदू दे
यशकीर्ति आम्हा लाभू दे
हे चरावर विश्व अवघे तूच देवा कल्पिले
पंचतत्वांच्या क्रीडेतून तूच सकला निर्मिले
नभ, शैल तू, जल स्थूल तू
सर्वत्र तुजला पाहू दे
मनीं भावभक्ती जागू दे
ब्रह्मविद्या वेद शाश्वत वर्णिती गरिमा तुझा
नाट्यनर्तन संगीताच्या उत्सवीं महिना तुझा
रस, शब्द तू, स्वरछंद तू
स्तुतिबंध हा तव गाऊ दे
मनीं भावभक्ती जागू दे
भेद अवघे लुुपत होवो, वाढू दे समभावना
सवस्तिकासम अर्थ येवो आमुच्या सहजीवना
व्रत. धर्म तू, श्रमकर्म तू
सहयोग आम्हा साधू दे
मनीं भावभक्ती जागू दे
देह तीर्थक्षेत्र होवो, हृदय मंदिर आमुचे
नित्य पुजनाने घडो आयुष्य सुंदर आमुचे
फल, पुष्प तू, दल, पत्र तू
सारे तुझे तुज वाहू दे
मनीं भावभक्ती जागू दे

Previous Post

देवा ट्री गणेशा…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.