• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सेंद्रिय शेतीतील मार्केटिंग

- अनिता घाटणेकर (मार्ग माझा वेगळा)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 1, 2022
in मार्ग माझा वेगळा
0

नोकरीची गाडी व्यवस्थितपणे सुरु असतानाही अनेकजणांना चाकोरीबाहेर जाऊन जरा हटके काहीतरी काम करण्याची इच्छा असते. काहीजणांना तो मार्ग झटकन सापडतो तर काहींना तो सापडायला वेळ लागतो. नोकरी करत असताना मला देखील काहीतरी वेगळे करावे असे वाटायचे. तसा विचारही अनेकदा डोक्यात यायचा, पण त्यावर थोडा विचार व्हायचा आणि नंतर पुन्हा तो मागे पडायचा. आपल्याला शेती, पर्यावरण या क्षेत्रात काय करता येईल का, याचा विचार माझ्या डोक्यात कायम घोळत असायचा. त्या क्षेत्रात काम करायला मिळाले तर ते खूपच चांगले राहील. अनेक दिवसांपासून सुरु असणार्‍या या विचाराला खर्‍या अर्थाने आकार मिळाला तो २०२०मध्ये… एका चांगल्या आयटी कंपनीत काम करत असणार्‍या माझ्या भावाने नोकरी सोडून शेतीच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. म्हणतात ना, मनात इच्छा असली की मार्ग आपोआपच सापडतो, माझ्या बाबतीत तसंच झाले. भावाने आणि मी आम्ही दोघांनी सेंद्रीय शेतीमधून पिकवण्यात येणार्‍या धान्याचे मार्केटिंग करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशुद्धम नावाचा ब्रँडच्या माध्यमातून या व्यवसायाची सुरवात केली. दोन वर्षांपूर्वी सुरु केलेला हा व्यवसाय आता चांगला नावारूपाला येऊ लागला आहे. आपल्याला या व्यवसायात किती फायदा मिळतो आहे, याकडे ना पाहता शेतीमध्ये अहोरात्र राबणार्‍या शेतकर्‍यांचे कष्ट पाहून याच कार्याला वाहून घेण्याचा निर्णय मी घेतला आहे.

मार्केटिंग अ‍ॅनालिस्ट आणि सोशल सर्व्हिस

पुणे विद्यापीठामधून १९९२मध्ये एमएससीची पदवी घेतल्यानंतर १९९४पासून पूना बॉटलिंग कंपनीमध्ये मार्केटिंग अनॅलिस्ट म्हणून नोकरीला सुरुवात केली. मार्केटिंग फील्ड किती मोठे आहे, तिथं काम करणं किती आव्हानात्मक आहे, याचे अनुभव तिथे येत गेले. सात वर्षं नोकरी केली, त्यानंतर २००० ते २००६ या दरम्यान इंडिया प्रॉपर्टीमध्ये रिसर्च अनॅलिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर काही काळ सुझलॉन इंडिया कंपनीत विंडोज डाटा अनॅलिस्ट म्हणून काम केले. २००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या काळात किर्लोस्कर ब्रदर्समध्ये डाटा अनॅलिस्ट म्हणून काम केले. दरम्यान, नोकरी सुरु असताना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे सेवा सहयोग फौंडेशनच्या माध्यमातून त्या क्षेत्रात काम सुरु केले. पर्यावरण, शेती यामध्ये काही करता येईल का याची चाचपणी करत होते.

सेंद्रिय शेतीतील मार्केटिंगचा मार्ग

माझ्या भावाच्या डोक्यात सेंद्रिय शेती उत्पादनांचे मार्केटिंग करण्याची कल्पना आली, त्याला आम्ही दोघांनी आकार देण्याचे ठरवले. २०२० साली माझ्या भावाने आयटी कंपनीतील नोकरी सोडली. सेंद्रिय उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी विशुद्धम नावाचा ब्रँड सुरु केला.

अभ्यास आणि गाठीभेटी

आपल्या राज्यातले अनेक शेतकरी हे सेंद्रिय प्रकाराने शेती करतात. ती ठिकाणे शोधून आम्ही त्या ठिकाणांना भेटी दिल्या. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, या भागातील गावांना भेटी दिल्या. सेंद्रिय पद्धतीने धान्य, फळे, कशी पिकवली जातात. त्याचे सर्टिफिकेशन तपासून, मालाची गुणवत्ता अभ्यासून आम्ही या व्यवसायात उतरलो. सेंद्रिय उत्पादनांना चांगली बाजारपेठ आहे. लोकांना चांगल्या दर्जाचे धान्य, फळे हवी आहेत. बाजारपेठेचा नेमका अभ्यास करून आम्ही विशुद्धमच्या माध्यमातून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरवात केली. अवघ्या काही काळात सेंद्रिय पद्धतीनं शेती करणार्‍या ३०० शेतकर्‍यांशी आम्ही जोडले गेलो. त्याच्या उत्पादनांना बाजरपेठ मिळत गेली. लोकांमध्ये सेंद्रिय धान्याचे महत्व पटवून देण्यासाठी घेतलेल्या जनजागरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत गेला. अनेक ग्राहक आमच्याशी जोडले गेले.

सेंद्रिय उत्पादनाचे महत्व वाढतंय

सध्या प्रत्येकाची जीवनशैली बदललेली आहे, तिचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे आपण सकस, पौष्टिक आणि चांगले खावे याकडे लोकांचा कल वाढतो आहे. आपल्याला थोडे महाग पडले तरी चालेल, पण सेंद्रिय फळे, कडधान्य कुठे मिळेल, याच्या शोधात अनेकजण असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकजण हेल्थ कॉन्शस झाला आहे, त्याचा चांगला फायदा सेंद्रिय उत्पादनांना होत आहे. असे असले तरी सेंद्रिय उत्पादनाचे मार्केटिंग करणे शक्य होत नाही. बर्‍याचदा लोकांना सेंद्रिय उत्पादने हवी असतात. पण त्याची अन्य उत्पादनाच्या तुलनेत त्यांची किंमत महाग आहे, असे म्हणणारे अनेकजण भेटतात. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या धान्यामध्ये किडे लवकर पडतात, त्यामुळे त्याची साठवणूक करणे ही फार मोठी अडचण आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये, अशाच प्रकारे त्याच्या विक्रीचे नियोजन करावे लागते.

लोकांनी जागरूक होणे महत्वाचे

सेंद्रिय धान्य आणि फळांच्या बाबतीत लोकांनी जागरूक होणे अधिक गरजेचे आहे. अलीकडच्या काळात लोकांमध्ये त्याबाबत सजगता येत चालली आहे. भविष्यात त्यामध्ये वाढ व्हायला हवी. सेंद्रिय उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी आम्ही सोशल मीडिया, ब्लॉग या माध्यमातून जाहिरात केली त्याला चांगला प्रतिसाद आला. सेंद्रिय उत्पादनांना शहरी भागातून मोठ्या प्रमाणात डिमांड वाढताना दिसत आहे. ही मागणी पुण्यामुंबईपुरती मर्यादित न राहता आता ती छोट्या शहरांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

शेतकर्‍यांसाठी काम करताना आनंद

सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देताना मिळणारा आनंद खरोखरच शब्दात वर्णन करता येत नाही. शेतकरी मंडळी उत्पादन घेण्यासाठी जे एफर्ट घेतात, ते पहिले की मन भरून येते. व्यवसाय वाढेल, पैसे मिळतील, हे तर आहेच; पण शेतकर्‍यांसाठी काम करण्याचा आनंद नोकरीच्या कामापेक्षा नक्कीच मोठा असतो.

वेगळी चव… वेगळा गंध

सेंद्रिय उत्पादनाची चव वेगळी असते, त्याचा गंध देखील वेगळा असतो. त्यामध्ये केमिकल नसतात, त्यामुळे या उत्पादनाचा वापर करणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्याचा विचार करून सेंद्रिय उत्पादनासाठी आकर्षक पॅकिंग करून त्याची विक्री करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामध्ये धान्य, कडधान्य, फळे यांचा समावेश आहे. सेंद्रिय उत्पादनांना महाराष्ट्राबरोबरच बेंगळुरू, हैद्राबाद, चेन्नई, दिल्ली या भागातून देखील चांगली मागणी आहे.

असाही एक अनुभव

औरंगाबादच्या एका शेतकर्‍याने सेंद्रिय केसर आंब्याची बाग केली आहे. तिथल्या केसर आंब्यांना गेल्या वर्षी बेळगावच्या ग्राहकाने पसंती दिली होती. यंदाच्या वर्षी देखील हा ग्राहक या आंब्याची खरेदी करण्यासाठी इथे आला होता. यावरून सेंद्रिय फळे किती उत्तम चांगली असतात, याचे प्रत्यंतर येते.

शब्दांकन – सुधीर साबळे

Previous Post

कोण होतास तू, काय झालास तू…

Next Post

येवा `शोले’ आपलोच असा!

Next Post
येवा `शोले’ आपलोच असा!

येवा `शोले' आपलोच असा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.